Join us

"काटूँ कैसे रातां ओ सावरे...", म्हणत विमानतळावरच केला डान्स, बॉयफ्रेंडचं केलं भन्नाट स्वागत- व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2023 11:18 IST

Social Viral: सुंदर डान्स करून बॉयफ्रेंडचं एकदम हटके पद्धतीने विमान तळावर स्वागत करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (viral video of a woman dancing on airport to welcome her boy friend)

ठळक मुद्देबघा तुम्हालाही आता तुमच्या नवऱ्याचं, बॉयफ्रेंडचं किंवा बायकोचं, गर्लफ्रेंडचं एकदम हटके स्टाईलने स्वागत करायचं असेल तर ही एक मस्त आयडिया आहे...

आपल्या लाडक्या किंवा आवडत्या माणसांचं स्वागत करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. त्यात जर ती व्यक्ती आपल्याला खूप दिवसांनी भेटत असेल तर मग त्या भेटीचा आनंद आणखीनच वेगळा असतो. काही उत्साही मंडळी या भेटीसाठी खास सरप्राईज प्लॅन करतात. सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधल्या (video viral) तरुणीचंही तसंच काहीसं झालं आहे. तिचा बॉयफ्रेंड तिला खूप दिवसांनी भेटणार होता. त्यामुळे तिने तिच्यापरीने त्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. त्याचं विमान तळावर आगमन झाल्यापासून ते त्या दोघांची भेट होईपर्यंतचा तो व्हिडिओ बघायला खरोखरच इंटरेस्टिंग आहे (Woman welcome her boy friend by surprise dance on airport).

 

_nikishah या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अवघ्या काही दिवसांतच तो चांगलाच व्हायरल झाला आहे. परदेशातल्या एका विमानतळावरचा हा व्हिडिओ असला तरी ती डान्स करणारी तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड हे दोघेही भारतीयच वाटतात.

पाडवा- भाऊबीजेसाठी सुंदर ड्रेस घ्यायचा? बघा स्वस्तात मस्त आकर्षक भरजरी ड्रेसचे ३ पर्याय

तर तो जेव्हा विमान तळावर येतो तेव्हा बाकीची इतर मंडळी जाऊन त्याचं फुलं वगैरे देऊन उत्साहात स्वागत करतात. पण त्याच्या नजरा मात्र सतत तिलाच शोधत असतात. तो त्याला भेटायला आलेल्या इतर मंडळींकडे तिची चौकशीही करतो. पण त्याला काही उत्तर मिळत नाही. 

 

काही अंतर चालून आल्यावर त्याला अचानक समोर ती दिसते आणि लगेच म्युझिक सुरू होते...

केस खूपच ड्राय- डल झाले? करा १ साेपा घरगुती उपाय, दिवाळीपर्यंत केस होतील एकदम सिल्की- चमकदार

त्या पाठोपाठ "काटूँ कैसे रातां ओ सावरे जिया नहीं जाता सुन बावरे के रातां लम्बियां लम्बियां रे कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे" या गाण्यावर ती खुपच सहज सुंदर डान्स करते आणि तिच्या बॉयफ्रेंडचं नव्याने मन जिंकून घेते. बघा तुम्हालाही आता तुमच्या नवऱ्याचं, बॉयफ्रेंडचं किंवा बायकोचं, गर्लफ्रेंडचं एकदम हटके स्टाईलने स्वागत करायचं असेल तर ही एक मस्त आयडिया आहे...

 

टॅग्स :सोशल व्हायरलनृत्यविमानतळ