Join us  

२५ लाखांपेक्षा जास्त पॅकेज असणाराच नवरा पाहिजे म्हणणाऱ्या तरुणीचं चुकतंय का? बघा व्हायरल गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2024 4:47 PM

Viral Story Of Arrange Marriage: लग्न करेल तर २५ लाखांपेक्षा जास्त पॅकेज असणाऱ्या तरुणासोबतच. अशी अपेक्षा एका बेरोजगार तरुणीने व्यक्त केली असून तिचा हा किस्सा सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देकाही जणांनी तिला सरळसरळ चुकीचे ठरवले आहे. पण काही जणांनी मात्र तिचे समर्थनही केले आहे.

सध्या लग्नाळू मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत, अशी चर्चा आपल्या आसपास नेहमीच रंगलेली दिसते. कधी कधी त्यात तथ्यही असतं. कारण बऱ्याचदा असं होतं की ती मुलगी शिक्षण, कमाई या दृष्टीने अगदीच जेमतेम असते. पण तिच्या अपेक्षा मात्र खूप जास्त असतात. अशावेळी मुलींनी आणि त्यांच्या आई- वडिलांनी विचार करणं गरजेचं आहेच. पण जर एखादी मुलगी शिक्षण, कमाई, बँकबॅलेन्स या सगळ्याच बाबतीत तोडीसतोड असेल आणि ती तिच्या अपेक्षा अगदी स्पष्टपणे सांगत असेल तर काय चुकले.. अशीच एक गोष्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

@peacehipeace या सोशल मिडिया अकाउंटवरून नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्याने पोस्ट शेअर केली आहे, तो म्हणतो आहे की त्याच्या एका मित्राला एका मुलीने लग्नासाठी नाकारले. नकार देण्यामागचं कारण हे आहे की त्याच्या मित्राचा वार्षिक पगार ८ लाख रुपये एवढा आहे.

कोण म्हणतं श्रीखंड करायला खूप वेळ लागतो? बघा ५ मिनिटांत कसं करायचं पातेलंभर श्रीखंड

ती मुलगी स्वत: इंजिनियर असून तिने मागच्यावर्षीच नोकरी सोडली आहे. पण तिला मात्र २५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक पॅकेज असणाराच मुलगा पाहिजे आहे. तिने तिची अपेक्षा अतिशय स्पष्टपणे सांगितली असून तिच्या या अपेक्षेवरून सोशल मिडियावर अनेक उलट- सुलट चर्चा रंगल्या आहेत.

 

काही जणांनी तिला सरळसरळ चुकीचे ठरवले आहे. पण काही जणांनी मात्र तिचे समर्थनही केले आहे. त्या मुलीची घरची परिस्थिती कशी आहे, तिला स्वत:ला कितीचे पॅकेज होते, ती कोणत्या शहरात राहते, या सगळ्या गोष्टी जाणून घेणंही अनेकांना गरजेचं वाटलं आहे.

मोठ्यांसारखा लहान मुलींनाही भरमसाठ मेकअप करता? कॉस्मेटिक्स वापरता?- पालकांची हौस मुलांना शिक्षा

या सगळ्या गोष्टी माहिती नसताना तिची अपेक्षा चूक आहे, हे कसं म्हणणार असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. तुम्हाला काय वाटतं सोशल मिडियावर शेअर केलेल्या त्या माहितीवरून तिच्या अपेक्षांवरून तिला चूक किंवा बरोबर ठरवणं योग्य आहे का?

 

टॅग्स :सोशल व्हायरललग्न