Lokmat Sakhi >Social Viral > भयानकच! सुंदर दिसण्यासाठी नाकातल्या केसांचं वॅक्सिंग कोण करतं, पण तिने केलं-पाहा व्हायरल व्हिडिओ...

भयानकच! सुंदर दिसण्यासाठी नाकातल्या केसांचं वॅक्सिंग कोण करतं, पण तिने केलं-पाहा व्हायरल व्हिडिओ...

Woman Faints After Nose Hair Waxing Video Viral Is Nose Hair Waxing Safe : Nose Hair Waxing Goes Horribly Wrong, Woman Trembles & Faints : Woman Uses Nose Wax Sticks, What Happens Next Is Shocking. Terrifying Video Caught On Cam : नाकातील केसांचे वॅक्सिंग करणे कितपत योग्य? डॉक्टर सांगतात काही सोपे उपाय 'अशी' घ्या काळजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 14:36 IST2025-08-21T14:20:41+5:302025-08-21T14:36:49+5:30

Woman Faints After Nose Hair Waxing Video Viral Is Nose Hair Waxing Safe : Nose Hair Waxing Goes Horribly Wrong, Woman Trembles & Faints : Woman Uses Nose Wax Sticks, What Happens Next Is Shocking. Terrifying Video Caught On Cam : नाकातील केसांचे वॅक्सिंग करणे कितपत योग्य? डॉक्टर सांगतात काही सोपे उपाय 'अशी' घ्या काळजी...

Woman Faints After Nose Hair Waxing Video Viral Is Nose Hair Waxing Safe Nose Hair Waxing Goes Horribly Wrong, Woman Trembles & Faints Woman Uses Nose Wax Sticks, What Happens Next Is Shocking. Terrifying Video Caught On Cam | भयानकच! सुंदर दिसण्यासाठी नाकातल्या केसांचं वॅक्सिंग कोण करतं, पण तिने केलं-पाहा व्हायरल व्हिडिओ...

भयानकच! सुंदर दिसण्यासाठी नाकातल्या केसांचं वॅक्सिंग कोण करतं, पण तिने केलं-पाहा व्हायरल व्हिडिओ...

शरीरावरील नको असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी अनेकजणी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. अनावश्यक केस काढण्यासाठी थ्रेडींग, वॅक्सिंग, हेअर रिमुव्हवल क्रीम्स, रेझर असे एक ना अनेक नवीन नवीन पर्याय शोधले जातात. अनेकजणी प्रायव्हेट पार्टपासून ते अगदी नाकातील केसांचीही वॅक्सिंग करून घेतात. सुंदर दिसण्यासाठी (Woman Faints After Nose Hair Waxing Video Viral Is Nose Hair Waxing Safe) कुणी काय करेल तर कुणी कोणती ब्यूटी ट्रिटमेंट घेईल हे सांगता येत नाही. सध्या विविध प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण सुंदर दिसण्यासाठी काही ना काही उपाय किंवा ब्यूटी ट्रिटमेंटचे व्हिडिओ शेअर करतच असतात(Nose Hair Waxing Goes Horribly Wrong, Woman Trembles & Faints).

सुंदर दिसण्यासाठी या उपायांचा काहीवेळा फायदा होतो तर कधी हे उपाय अगदी जीवघेणे देखील ठरु शकतात. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला नाकातील केसांची वॅक्सिंग करताना दिसत आहे. जसे तिने नाकातून वॅक्सिंग स्ट्रिप खेचली, तसे तिचे हात-पाय थरथरू लागले. तिचे गुडघे थरथरत होते आणि बघता बघता ती बेशुद्ध होऊन (Woman Uses Nose Wax Sticks, What Happens Next Is Shocking. Terrifying Video Caught On Cam) खाली पडली. हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नाकातील केसांचे वॅक्सिंग करावे की करु नये, याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.  

नेमकं घडलं तरी काय ?

डेली मेल एंटरटेनमेंटच्या इंस्टाग्राम अकाउंटवर महिलेचा हा व्हायरल व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यात आपण पाहू शकतो की, सॅम नावाची एक महिला तिच्या नाकातील केसांची वॅक्सिंग करत आहे. ती महिला तिच्या सोबतच्या व्यक्तीला वॅक्सिंग स्ट्रिप काढायला सांगते, आणि तो व्यक्ती एका क्षणात ती स्ट्रिप ओढतो. त्यानंतर महिलेचे शरीर थरथरू लागते आणि ती अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळते. या व्हिडिओच्या शेवटी असे सांगितले आहे की, सॅम नावाची महिला बेशुद्ध झाली होती आणि नंतर ती ठीक झाली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, नाकातील केसांची वॅक्सिंग करणे सुरक्षित आहे का?

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ५ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

TOI च्या रिपोर्टनुसार, नाकातील केस आपल्या शरीराचे संरक्षण करतात आणि नाकात धूळ, बॅक्टेरिया आणि ॲलर्जी पसरवणारे कण पोहोचवणे थांबवतात. जेव्हा आपण वॅक्सिंगने हे केस काढतो तेव्हा आपण फक्त हे केसच काढत नाही, तर शरीराची ही सुरक्षा प्रणाली कमकुवत करतो. नाकातील केस हवेतील धूळ, जंतू आणि ॲलर्जीपासून बचाव करतात. हे केस नाकाच्या आत हवा फिल्टर करतात, ज्यामुळे फुफ्फुसांपर्यंत स्वच्छ हवा पोहोचते. जर नाकातील केस पूर्णपणे काढले, तर यामुळे नाकाचा मार्ग संसर्ग आणि ॲलर्जीसाठी अधिक संवेदनशील बनू शकतो. 

नाकातील केसांच्या वॅक्सिंगमुळे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. खरंतरं, नाकाच्या आतली त्वचा खूपच नाजूक असते यामुळे वॅक्सिंगच्या वेळी लहान-लहान जखमा होऊ शकतात, ज्यामधून बॅक्टेरिया आत जाऊन संसर्ग होऊ शकतो. याशिवाय, केस आतल्या बाजूला वाढू शकतात, ज्यामुळे वेदना आणि सूज येऊ शकते. गरम वॅक्समुळे नाकाची त्वचा जळू शकते किंवा तिला सूज येऊ शकते. काहीजणींना तर इतकी वेदना किंवा धक्का बसतो की ते वॅक्सिंगच्या वेळी किंवा नंतर बेशुद्ध होतात असेच काहीसे या महिलेसोबत झाले... 

एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक!  करा 'हा' जुगाड - फॅन चमकेल नव्यासारखा लख्ख...   


जर आपल्याला नाकातील केस स्वच्छ ठेवायचे असतील, तर वॅक्सिंगऐवजी काही सुरक्षित पर्यायांचा देखील वापर करु शकता. नाकातील केस कापण्यासाठी गोल टोकाची लहान कात्री किंवा इलेक्ट्रिक नोज हेअर ट्रिमर वापरा. हे पर्याय जलद आणि वेदनाविरहित आहेत, तसेच नाकाच्या आतील सुरक्षा प्रणाली कायम टिकून राहते. या उपायामुळे केस पूर्णपणे काढले जात नाहीत, फक्त लहान करता येतात ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. नाकातील केसांच्या वॅक्सिंगमुळे वेदना, सूज आणि संसर्गाचा धोका असतो. याशिवाय, वॅक्सिंगच्या वेळी काहीजण बेशुद्ध देखील होतात. म्हणूनच, नाकातील केस काढण्यासाठी वॅक्सिंग टाळा आणि सुरक्षित पद्धतींचा वापर करा.

Web Title: Woman Faints After Nose Hair Waxing Video Viral Is Nose Hair Waxing Safe Nose Hair Waxing Goes Horribly Wrong, Woman Trembles & Faints Woman Uses Nose Wax Sticks, What Happens Next Is Shocking. Terrifying Video Caught On Cam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.