>सोशल वायरल > No high heels: उंच टाचांच्या चपला आम्हाला नकोत असं का म्हणतात जगभरात बायका?

No high heels: उंच टाचांच्या चपला आम्हाला नकोत असं का म्हणतात जगभरात बायका?

No high heels: महिलांमध्ये असणारं उंच टाचांच्या चपलांचं वेड एकदम का कमी होतंय.... जगभरात सुरु झालेला हा No high heels ट्रेण्ड नेमका आहे तरी काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 04:46 PM2021-12-06T16:46:44+5:302021-12-06T16:48:24+5:30

No high heels: महिलांमध्ये असणारं उंच टाचांच्या चपलांचं वेड एकदम का कमी होतंय.... जगभरात सुरु झालेला हा No high heels ट्रेण्ड नेमका आहे तरी काय...

Why there is no high heels trend in the world? History of high heels | No high heels: उंच टाचांच्या चपला आम्हाला नकोत असं का म्हणतात जगभरात बायका?

No high heels: उंच टाचांच्या चपला आम्हाला नकोत असं का म्हणतात जगभरात बायका?

Next
Highlightsबऱ्याच महिन्यांनी जेव्हा अनेक जणींनी हाय हिल्स घातल्या तेव्हा प्रत्येकीला वेगवेगळे त्रास जाणवू लागले.

काही वर्षांपुर्वी अशी परिस्थिती होती, प्रत्येकीकडे किमान एक तरी हाय हिल्सचा (high heels) जोड असलाच पाहिजे. मग यामध्ये ती बॉक्स हिलवाली (box heel) चप्पल पण चालेल किंवा पेन्सिल हिल (pencil heel) असणारी सॅण्डलही चालेल. पण हाय हिल्स तुमच्याकडे नाहीत किंवा हाय हिल्स घालून तुम्हाला चालता येत नाही, म्हणजे मग तुम्ही फारच ओल्ड फॅशन आहात, असं समजण्याचा एक काळ होता. हा काळ काही फार जुना नाही. अगदी ४- ५ वर्षांपुर्वीचा. पण मग हाय हिल्सच्या जमान्यात हे अचानक काय झालं आणि हे कोणतं वेगळंच वारं वाहू लागलं..

 

काही काळापुर्वी स्टाईल (style)म्हणजेच हाय हिल्स असं एक अलिखित समीकरण झालं होतं. पण आता मात्र स्टाईलपेक्षा स्वत:चा कम्फर्ट लोकांना अधिक महत्त्वाचा वाटतो आहे. २०१८ पासून हाय हिल्सच्या विक्रीत जगभरातच सातत्याने घट होत आहे. त्यात कोविडनंतर २०२० या वर्षी तर जगभरातली हाय हिल्सची विक्री तब्बल ७१ टक्क्यांनी कमी (high heels sale downs in year 2020) झाली. या तुलनेत स्निकर्सची विक्री मात्र ३७ टक्क्यांनी वाढली आहे. कोविडनंतर (covid 19) हाय हिल्स वापरण्याचं प्रमाण एवढं झपाट्याने कमी का झालं, याची कारणे देताना असं सांगण्यात आलं आहे की कोविड काळात अनेक जणींचं घराबाहेर पडणं जवळपास बंद झालं होतं. अजूनही अनेक जणींचं वर्क फ्रॉम होम (work from home) सुरू आहे.

 

कोणतंही सेलिब्रेशन, पार्टी असं सगळं कोविड काळात जवळपास बंद होतं. त्यामुळे ज्या महिला यापुर्वी नियमितपणे हायहिल्स वापरायच्या, त्यांचा वापर आपोआपच कमी झाला आणि हळूहळू हाय हिल्सची सवय तुटत गेली. बऱ्याच महिन्यांनी जेव्हा अनेक जणींनी हाय हिल्स घातल्या तेव्हा प्रत्येकीला वेगवेगळे त्रास जाणवू लागले. त्याचवेळी कॅज्यूअल फुटवेअरमध्ये अनेक जणींना अधिक आरामदायी वाटू लागलं. त्यामुळेच २०२० साली एकीकडे हाय हिल्सची मागणी झपाट्याने खालावली तर त्याच वेळी दुसरीकडे स्निकर्सच्या मागणीत मात्र चांगलीच वाढ झाली होती. 

 

हाय हिल्स घातल्याने हे त्रास होऊ शकतात
Health issues due to high heels

- पाठदुखी
- कंबरेत वेदना
- पाठीच्या मणक्याचा आकार बिघडणे
- गुडघ्यांचा त्रास
- पायाचा घोटा आणि तळपाय वारंवार दुखणे
- अनेक जणींना हायहिल्समुळे डोकेदुखीचा त्रासही होतो. 

 

हाय हिल्सबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Interesting facts about high heels

- सध्या महिलांच्या फॅशन वर्ल्डमध्ये एक स्टाईल स्टेटमेंट असणाऱ्या हाय हिल्स या मुळी महिलांसाठी बनविलेल्या नव्हत्याच.  त्या पुरुषांसाठी होत्या. पुरुषांना घोडेस्वारी करण्यासाठी उपयुक्त ठरावीत म्हणून उंच टाचांचे बुट त्यांच्यासाठी बनविण्यात आले होते. कारण सुरक्षेच्या दृष्टीने ते अतिशय मजबूत मानले जायचे. त्यामुळे १० व्या शतकात उंच टाचांचे बुट पुरुष वापरायचे. 
- त्यानंतर पर्शियामधून हाय हिल्स असणारे बुट जेव्हा युरोपमध्ये गेले तेव्हा हळूहळू ते श्रीमंत आणि राज घराण्यातल्या लोकांचे आवडीचे बनत गेले. एवढेच नाही तर फ्रान्सच्या राजाने त्यांची उंची कमी होती म्हणून उंच टाचांच्या बुटांचा वापर सुरू केला. 
- १७४० नंतर मात्र या उंच टाचांवर महिलांची नजर पडली आणि त्यांनी पुर्णपणे त्यावर कब्जा केला. आता तर अशी परिस्थिती आहे की उंच टाचा या केवळ महिलांची फॅशन म्हणून ओळखल्या जातात.  
 

Web Title: Why there is no high heels trend in the world? History of high heels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Eating Habit Reveal About Your Personality : तुम्ही खूप भरभर जेवता की फार हळूहळू ? खाण्याच्या सवयी सांगतात तुमचा स्वभाव, पाहा तपासून... - Marathi News | Eating Habit Reveal About Your Personality: Do you eat too fast or too slowly? Eating habits tell your nature, check it out ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही खूप भरभर जेवता की फार हळूहळू ? खाण्याच्या सवयी सांगतात तुमचा स्वभाव, पाहा तपासून...

Eating Habit Reveal About Your Personality : प्रत्येकाची पदार्थांची आवड, जेवणाची पद्धत यावरुन व्यक्तीचा स्वभाव कसा आहे ते ठरते. पाहूयात कशापद्धतीने जेवणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव कसे असतात... ...

डायपर लिकेज टाळण्यासाठी वापरा ५ ट्रिक्स; बाळाची त्वचा नेहमी राहील सॉफ्ट - Marathi News | How to prevent your baby's diaper leaking : How to prevent your babys diaper leaking overnight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायपर लिकेज टाळण्यासाठी वापरा ५ ट्रिक्स; बाळाची त्वचा नेहमी राहील सॉफ्ट

How to prevent your baby's diaper leaking : डायपर जितका शोषण्यास कमी सक्षम असेल तितकी गळती जास्त असेल आणि डायपर जितके जास्त शोषण्यास सक्षम असेल तितकी गळती कमी होईल.  ...

Home Cleaning Tips : कितीही आवरलं तरी घरभर पसाराच? घर आवरण्याच्या ५ सोप्या टिप्स; घर एकदम चकाचक - Marathi News | Home Cleaning Tips: 5 Simple Home Tips; The house is very bright | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही आवरलं तरी घरभर पसाराच? घर आवरण्याच्या ५ सोप्या टिप्स; घर एकदम चकाचक

Home Cleaning Tips : कामांच्या यादीतही ज्या कामाला फारशी किंमत नाही तरी अतिशय महत्त्वाचे असलेले हे काम सोपे व्हावे यासाठी काही खास टिप्स ...

Yellow Stains On Crockery Set: क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्याचे ३ उपाय, जुन्या डिश दिसतील नव्यासारख्या स्वच्छ, चकचकीत - Marathi News | Yellow Stains On Crockery Set: 3 Ways To Remove Yellow Stains On Crockery Set, Old Dishes Will Look Like New, Clean, Shiny | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्याचे ३ उपाय, जुन्या डिश दिसतील नव्यासारख्या स्वच्छ, चकचकीत

Remedies To Remove Stains on Crockery Set: फायबर किंवा काचेच्या क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा.. पिवळटपणा आलेल्या डिश स्वच्छ होऊन पुन्हा नव्यासारख्या चमकू लागतील.  ...

75th annual Cannes Film Festival: दीपिकाचा ‘वाघीण’लूक! चमचमत्या सिक्विन साडीवर ॲनिमल प्रिंट पाहून कुणी नाराज, कुणी फिदा.. कारण.. - Marathi News | Deepika Padukon's catchy tigeress look in Cannes festival. Her Sequien shimmari saree look makes some disappointment  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिकाचा ‘वाघीण’लूक! चमचमत्या सिक्विन साडीवर ॲनिमल प्रिंट पाहून कुणी नाराज, कुणी फिदा.. कारण..

Deepika Padukon In Cannes festival: आपला देश असो किंवा मग परदेश, साडीतले सौंदर्य नेहमी सगळेकडेच उठून दिसते... त्यामुळेच तर सध्या सगळीकडे गाजतो आहे दीपिकाचा कान्स फेस्टिव्हलमधला साडी लूक. ...

How To Marry Your Crush : प्रेयसीशी लग्न करण्यासाठी भावानं मंडपात घुसून असं काही केलं; व्हिडिओ पाहून कपाळावर हात माराल - Marathi News | How To Marry Your Crush : How to marry your crush this bengali daily soap has a bizarre trick nobody should try | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेयसीशी लग्न करण्यासाठी भावानं भर मंडपात असं काही केलं; व्हिडिओ पाहून कपाळावर हात माराल

How To Marry Your Crush : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक लग्नात वरमाला घालण्याचा कार्यक्रम सुरू असताना एक मुलगा तिथे येतो आणि नवऱ्या मुलाला बाजूला करून मुलीच्या गळ्यात  हार घालतो. ...