अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आणि अन्य अनेक गोष्टींप्रमाणे ‘गवारीच्या शेंगाना’ त्याचा फटका बसणार अशी चिन्हं आहेत.(Trump tariff India) आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की गवारच्या भाजीचं ट्रम्पना का वावडं? त्यांना आवडत नाही का गवार? तर त्यापलिकडेही त्यांच्यामुळे भारतीय गवारच्या भाजीची चव कडसर होण्याची शक्यता आहे.(US tariff on guar) आणि इकडे जरी आपण गवार म्हणत या शेंगांना नाक मुरडत असलो तरी तिकडे अमेरिकेत गवार गमची चर्चा असते, तो महागडाही असतो. टॅरिफमुळे त्यालाही फटका बसणार आहे.(India guar export)
वय जेमतेम वीस-पण डोक्यावरचे केस पिकले? ‘ही’ हिरवीगार पानं ठरतील वरदान-पाहा खास उपाय
टॅरिफ लागू झाल्यानंतर अमेरिकेत निर्यात होणाऱ्या काही वस्तूंच्या व्यापारावर परिणाम होणार आहे. त्यात हिरे माणकं, आयटी आहे तशीच आपली गवारची भाजीही आहे. गवार म्हणजे Cluster Beans. भारत हा जगातील गवारीच्या शेंगांचा सर्वात मोठा उत्पादक म्हणून ओळखला जातो. आपल्यापैकी अनेकजण गवारीची शेंग खाताना नाक मुरडतात पण, याच गवारीच्या बियांपासून गवार गम तयार केलं जातं. गवार गम हे नैसर्गिक पावडरीमध्ये पावडर म्हणून मिळते. याचा वापर अन्न दीर्घकाळ टिकण्यासाठी, औषधनिर्मितीसाठी, ब्यूटी प्रॉडक्ट , वस्त्रउद्योग आणि कागद उद्योग अशा अनेक क्षेत्रात केला जातो.ऑइल आणि गॅस उद्योगात hydraulic fracturing प्रक्रियेत गवार गमचं मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. गवार गम हे पाण्यात मिसळल्यावर ते घट्ट जेलसारखं तयार होतं.