Lokmat Sakhi >Social Viral > अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा टॅरिफ फटका बसणार गवारच्या भाजीलाही, ट्रम्पला गवारचं काय वावडं आहे?

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा टॅरिफ फटका बसणार गवारच्या भाजीलाही, ट्रम्पला गवारचं काय वावडं आहे?

guar beans: Trump tariff India: trade war impact on guar beans: अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानं अनेक उद्योगांना फटका बसेल त्यातच गवारच्या भाजीचाही समावेश होऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 18:02 IST2025-08-29T16:12:47+5:302025-08-29T18:02:48+5:30

guar beans: Trump tariff India: trade war impact on guar beans: अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानं अनेक उद्योगांना फटका बसेल त्यातच गवारच्या भाजीचाही समावेश होऊ शकतो.

why did Trump impose tariffs on Indian guar beans impact of US tariffs on guar gum exports from India | अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा टॅरिफ फटका बसणार गवारच्या भाजीलाही, ट्रम्पला गवारचं काय वावडं आहे?

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा टॅरिफ फटका बसणार गवारच्या भाजीलाही, ट्रम्पला गवारचं काय वावडं आहे?

अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आणि अन्य अनेक गोष्टींप्रमाणे ‘गवारीच्या शेंगाना’ त्याचा फटका बसणार अशी चिन्हं आहेत.(Trump tariff India) आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की गवारच्या भाजीचं ट्रम्पना का वावडं? त्यांना आवडत नाही का गवार? तर त्यापलिकडेही त्यांच्यामुळे भारतीय गवारच्या भाजीची चव कडसर होण्याची शक्यता आहे.(US tariff on guar) आणि इकडे जरी आपण गवार म्हणत या शेंगांना नाक मुरडत असलो तरी तिकडे अमेरिकेत गवार गमची चर्चा असते, तो महागडाही असतो. टॅरिफमुळे त्यालाही फटका बसणार आहे.(India guar export)

वय जेमतेम वीस-पण डोक्यावरचे केस पिकले? ‘ही’ हिरवीगार पानं ठरतील वरदान-पाहा खास उपाय

टॅरिफ लागू झाल्यानंतर अमेरिकेत निर्यात होणाऱ्या काही वस्तूंच्या व्यापारावर परिणाम होणार आहे. त्यात हिरे माणकं, आयटी आहे तशीच आपली गवारची भाजीही आहे. गवार म्हणजे Cluster Beans. भारत हा जगातील गवारीच्या शेंगांचा सर्वात मोठा उत्पादक म्हणून ओळखला जातो. आपल्यापैकी अनेकजण गवारीची शेंग खाताना नाक मुरडतात पण, याच गवारीच्या बियांपासून गवार गम तयार केलं जातं. गवार गम हे नैसर्गिक पावडरीमध्ये पावडर म्हणून मिळते. याचा वापर अन्न दीर्घकाळ टिकण्यासाठी, औषधनिर्मितीसाठी, ब्यूटी प्रॉडक्ट , वस्त्रउद्योग आणि कागद उद्योग अशा अनेक क्षेत्रात केला जातो.ऑइल आणि गॅस उद्योगात hydraulic fracturing प्रक्रियेत गवार गमचं मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. गवार गम हे पाण्यात मिसळल्यावर ते घट्ट जेलसारखं तयार होतं. 


अमेरिका ही जगातील सगळ्यात मोठी गॅस आणि ऑइल उत्पादक देशांपैकी एक आहे. तिथे शेल गॅस आणि शेल ऑइल काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली जाते. यासाठी गवार गम अधिक आवश्यक असते. ज्यामुळे अमेरिकेला भारतातून मोठ्या प्रमाणात गवार लागते आहे. भारतातील राजस्थान, हरियाणा, गुजरात या राज्यात गवारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. आणि याच कारणामुळे भारत हा अमेरिकेला गवार पुरवणारा सर्वात मोठा देश बनला आहे. भारतातून गवारची सर्वाधिक निर्यात अमेरिकेत होते. आता टॅरिफमुळे गवार अमेरिकेत पोहचणार की तिलाही फटका बसून निर्यात कमी होणार हे लवकरच कळेल.
 

Web Title: why did Trump impose tariffs on Indian guar beans impact of US tariffs on guar gum exports from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.