Join us

पावसाळ्यात माशा, डास, कीटकांचा घरभर उच्छाद? पाहा प्लॅस्टिकची पिशवी व अ‍ॅल्युमिनियम फॉइलची सोपी व्हायरल ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 18:54 IST

Why Are People Hanging Aluminium Foil in Water Bag On Window : Bag of Water Keep Flies Away : Best Home Remedies for Mosquitoes You Must Try : How to get rid of mosquitoes From house easily : पावसाळ्यात माशा, मच्छर आणि इतर लहान कीटक घरात येऊ नये म्हणून नेमकं काय करायचं ते पाहा...

सध्या ऐन मे महिन्यातच पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असल्याने, सर्वत्र धो - धो पाऊस कोसळत आहे. पाऊस पडल्याने डास, माशा मच्छर लहान कीटक त्रास देतात. आपण बरेचदा पाहिले असेल की, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपल्या घरातील लाईटभोवती माशा, डास, लहान - बारीक कीटकांची झुंड घोंघावत (Bag of Water Keep Flies Away) असते. घराच्या आजूबाजूच्या परिसरातील साचलेल्या पाण्यात किंवा अंधाऱ्या जागेमध्ये हे कीटक, डास फोफावतात आणि घरातील वातावरण अस्वच्छ करतात(Why Are People Hanging Aluminium Foil in Water Bag On Window).

या  माशा, मच्छर आणि इतर लहान कीटकांचा इतका त्रास होतो की, ते सतत आपल्या घरात, किचनमध्ये किंवा घरभर फिरत असतात. यामुळे, त्वचेला खाज येणे, इंफेक्शन होणे, झोप न लागणे अशा त्रासांना (Best Home Remedies for Mosquitoes You Must Try) तोंड द्यावे लागते. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आपण हानिकारक केमिकल्सयुक्त स्प्रे, औषध, गोळ्यांचा वापर करतो. परंतु सतत असे हानिकारक केमिकल्सयुक्त स्प्रे, औषध, गोळ्या वापरणे आपल्याला देखील हानिकारक ठरु शकते. यासाठीच, पावसाळ्यात माशा, मच्छर आणि इतर लहान कीटक घरात येऊ नये म्हणून सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या एका खास ट्रिकचा वापर आपण करु शकतो(How to get rid of mosquitoes From house easily).

पावसाळ्यात माशा, मच्छर,  इतर लहान कीटक घरात येऊ नये म्हणून... 

पावसाळ्यात माशा, मच्छर,  इतर लहान कीटक घरात येऊ नये म्हणून एक खास ट्रिक आपण नक्की ट्राय करुन पाहू शकतो. यासाठी, आपल्याला एक पारदर्शक प्लॅस्टिकची पिशवी, ॲल्युमिनियम फॉइल, पाणी इतक्या ३ गोष्टींची गरज लागणार आहे. 

गॅस लायटरवरील चिकट, तेलकट, मेणचट डाग होतील गायब! फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये गॅस लायटर होईल स्वच्छ...

प्रेशर कुकरचे रबर सैल झाले, वाफ बाहेर येते? सोपे ५ उपाय, एकदम चटकन करा दुरुस्त...

नेमकं करायचं काय ? 

सगळ्यात आधी एक पारदर्शक प्लॅस्टिकची पिशवी घेऊन ती पाण्याने अर्धी भरुन घ्या. त्यानंतर ॲल्युमिनियम फॉइलचे लहान गोळे करून घ्यावेत. आता हे ॲल्युमिनियम फॉइलचे लहान गोळे या पाण्याने भरलेल्या पिशवीत टाकावेत आणि पिशवीचे तोंड दोऱ्याने किंवा रबर बँड लावून बांधून घ्यावे. ही पिशवी खिडकीवर, दारावर किंवा स्वयंपाकघराच्या कोणत्याही कोपऱ्यात वर टांगा. यामुळे पावसाळ्यात माशा, मच्छर, इतर लहान कीटक घरात येत नाही. असे म्हटले जाते की, पिशवीत असलेले पाणी आणि ॲल्युमिनियम फॉइल एकत्रितपणे असा प्रकाश निर्माण करतात की माशा आणि डास घरात प्रवेश करत नाहीत आणि त्या प्रकाशामुळे ते तिथून पळून जातात.   

लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...

माशा, मच्छर आणि कीटक हे त्यांच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून आजूबाजूचं निरीक्षण करतात. अशा प्रकारच्या दृष्टीने त्यांना एका वेळी अनेक कोनांतून दृश्यं दिसतात. जेव्हा पाण्याच्या थेंबांवर किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉइलवर प्रकाश परावर्तित (reflection) होतो, तेव्हा त्या प्रकाशाचे वेगवेगळे किरण त्यांच्या डोळ्यांना गोंधळात टाकतात. त्यांना असं वाटतं की, ही जागा त्यांच्या दृष्टीसाठी धोकादायक आहे, त्यामुळे माशा आणि मच्छर अशा जागांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. सध्या इंटरनेटवर डास, माशा, कीटकांना घरातून पळवून लावण्याची ही ट्रिक फार मोठ्या प्रमाणांत व्हायरल होत आहे, तेव्हा यंदाच्या पावसाळ्यात आपल्या घरात देखील डास, माशा, कीटक सतावत असतील तर ही ट्रिक नक्की वापरुन बघा.

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी