इंडिगोच्या उड्डाणांमध्ये मागच्या काही दिवसांपासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.(IndiGo passengers stuck at airport) देशभरातून ५५० पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या, शेकडो उड्डाणं उशिरा आहेत तर हजारो प्रवासी तासन्तास विमानतळावर अडकले. या सगळ्यात सर्वात धक्कादायक दृश्य समोर आलं ते दिल्ली विमानतळावरुन..(IndiGo flights cancelled)
दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी... लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी ! असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.(father asking sanitary pad IndiGo viral video) एका वडिलांनी आपल्या मुलीसाठी काही गोष्टी डावलत इंडिगोच्या कर्मचाऱ्याला हतबल होऊन विनंती केली. कृपया करुन माझ्या मुलीला सॅनिटरी पॅड द्या. तासन्तास चालेल्या या गोंधळात मुलीला अचानक पीरियड सुरु झाले आणि अशावेळी कुटुंबाकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता.
मला एक्स्ट्रा पॅड पाहिजे, द्या... अशी विनंती त्याने एका पुरुष कर्मचाऱ्याला केली. पण अशावेळी त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तो पुन्हा त्याच ठिकाणावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडे गेला. सिस्टर मला सॅनिटरी पॅड हवा आहे. प्लीज द्या. तिची नुकतीच मासिक पाळी सुरु झाली आहे. मला प्लीज पँड द्या. त्यावर महिला कर्मचाऱ्याने उत्तर दिले, आमच्याकडे नाही.. त्यावर वडिलांची संतप्त प्रतिक्रिया होती. का नाही तुमच्याकडे? तुम्ही काहीही करुन द्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. ज्यामुळे पुन्हा एकदा इंडिगोच्या एअरलाइन्सवर प्रश्न चिन्ह उभे राहिले.
पण हा संपूर्ण गोंधळ अनेकांनी आपल्या कॅमेरामध्ये टिपला. याची सुरुवात तांत्रिक समस्या, पायलट- क्रू शॉर्टेज आणि शेड्यूल चुकल्यामुळे झाली. त्यात परिस्थिती इतकी बिकट झाली की प्रवासी वैतागले. अशावेळी एअरलाइन्सने ना बेसिक सुविधा ठेवल्या, ना वाशरुम स्वच्छता, पिण्याचे पाणी, इमर्जन्सी मेडिकल किट सुद्धा अपेक्षेप्रमाणे उपलब्ध नाहीत.
या वडिलांची आरोळी ऐकून अनेक प्रवासी थक्क झाले. ही फक्त सॅनिटरी पॅडची गोष्ट नाही तर आहे माणुसकीची आहे. अशा गोंधळाच्या परिस्थितीत मूलभूत सुविधा देणं ही एअरलाइन आणि विमानतळ प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी नाही का? असा प्रश्न देखील उभा राहतो.
