अमेरिकन सिनेटमध्ये नुकताच असा एक प्रसंग घडला की संपूर्ण जगाच लक्ष तिकडे वेधलं गेलं. सामान्यत: धोरणं, कायदे आणि राजकीय चर्चा यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सिनेटमध्ये यावेळी एक अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील विषय प्रेग्नन्सी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.(US Senate controversy) या चर्चेमुळे डॉक्टर निशा वर्मा यांच्या नावाची अचानक सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आणि त्या काही तासांतच व्हायरल झाल्या. (Can men get pregnant)अमेरिकन सिनेटमध्ये जेव्हा रिप्रोडक्टिव्ह राईट्सवर चर्चा सुरु होती, तेव्हा अचानक वातावरणात तणाव निर्माण झाला.(Indian-origin doctor Nisha Verma) रिपब्लिकन सिनेटर जोश हॉली यांनी असा प्रश्न विचारला की, ज्याने विज्ञानापासून राजकारणापर्यंत अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रश्न असा होता की, पुरुषही प्रेग्नेंट राहू शकतात? हा प्रश्न साधा जरी वाटत असला तरी यामागे अमेरिकेतलं बदलतं लिंगविषयक राजकारण दडलेलं होतं.
अमेरिकेत गर्भपाताच्या सुनावणीदरम्यान प्रसिद्ध भारतीय- अमेरिकन डॉक्टर आणि रिपब्लिकन सिनेटर जोश हॉली यांच्यात लिंग आणि जीवशास्त्र यावरुन जोरदार वाद झाला. अमेरिकन सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार आणि पेन्शन समितीच्या सुनावणीदरम्यान भारतीय-अमेरिकन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निशा वर्मा साक्षीदार म्हणून हजर झाल्या.
महिलांचे संरक्षण, रासायनिक गर्भपात औषधांच्या धोक्यांवर चर्चा करणं हा विषय होता. प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निशा वर्मा यांनी त्यांच्या सुरुवातीच्या विधानात औषधोपचार गर्भपाताबद्दल चर्चा केली. पण अमेरिकन सिनेटमधील ज्युडिशियरी कमिटीची सुनावणी केवळ गर्भपाताच्या अधिकारांवर नव्हती. ती मानवी ओळखवर येऊन ठेपली होती. या संपूर्ण वादाची ठिणगी पडली ती एका शब्दप्रयोगावरुन. साक्ष देण्यासाठी आलेल्या डॉक्टर निशा वर्मा जेव्हा सातत्याने महिला ऐवजी प्रेग्रंट पीपल असा शब्द वापरत होत्या, तेव्हा सिनेटर जोश हॉली यांनी त्यांना मधेच रोखले.
सिनेटर जोश हॉली यांनी विचारलं की तुम्ही सतत प्रेग्नंट पीपल म्हणत आहात, तुमचा अर्थ महिला असाच आहे का? यावर डॉक्टर वर्मा यांनी म्हटलं की, गर्भधारणा केवळ महिलांपुरता मर्यादित नाही. या उत्तराने संतप्त झालेल्या सिनेटरने विचारले, "तुमच्या मते पुरुषही गरोदर राहू शकतात का?"
त्यावर निशा यांनी उत्तर दिलं, जगभरात असे अनेक ट्रान्समॅन आणि नॉन- बॉयरनी लोक आहेत. ज्यांना मासिक पाळी येते आणि जे गर्भधारणा करु शकतात. त्यामुळे वैद्यकीय उपचार देताना आपण फक्त महिला म्हणणं चुकीचे ठरु शकते. आपल्या विज्ञानामध्ये बायोलॉजिकल सेक्स आणि जेंडर आयडेंटिटी यामध्ये फरक आहे. ज्या व्यक्तीची ओळख पुरुषासारखी आहे, पण ज्याच्या शरीरात गर्भाशय आणि अंडाशय सक्रिय आहेत, अशी व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या गरोदर राहू शकते.
सुनावणीदरम्यान सिनेट सदस्याने डॉक्टर वर्मा यांना गर्भधारणेशी संबंधित अत्यंत थेट आणि वैयक्तिक प्रश्न विचारला. अनेकांच्या मते, हा प्रश्न व्यावसायिक मर्यादा ओलांडणारा होता. उपस्थित प्रेक्षकांमध्ये कुजबुज सुरू झाली, तर काही सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. मात्र या सगळ्या परिस्थितीत डॉक्टर निशा वर्मा यांनी कोणताही आक्रमक सूर न लावता, संयम राखत उत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की, प्रेग्नन्सी हा वैद्यकीय आणि वैयक्तिक विषय आहे आणि त्यावर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार संबंधित महिलेलाच असावा. डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी माहिती देण्याची आणि सुरक्षित पर्याय सुचवण्याची आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या उत्तरानं सभागृहात काही काळ शांतता पसरली पण यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु झाली.
डॉक्टर निशा वर्मा यांचा हा व्हिडीओ काही तासांतच व्हायरल झाला. अनेकांनी त्यांच्या धैर्याचं, स्पष्टवक्तेपणाचं आणि महिलांच्या हक्कांसाठी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. महिलांनी आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यांना पाठिंबा दिला. या घटनेमुळे अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला महिलांच्या शरीरावर निर्णय घेण्याचा अधिकार नेमका कोणाचा? राजकीय व्यासपीठावर असे प्रश्न विचारले जावेत का, की वैयक्तिक गोष्टींचा सन्मान राखला गेला पाहिजे?
Web Summary : US Senate sees heated debate over reproductive rights. Dr. Nisha Verma clarifies trans men's pregnancy potential, sparking controversy over gender, biology, and women's rights.
Web Summary : अमेरिकी सीनेट में प्रजनन अधिकारों पर बहस छिड़ी। डॉ. निशा वर्मा ने ट्रांस पुरुषों की गर्भावस्था की संभावना बताई, जिससे लिंग, जीव विज्ञान और महिलाओं के अधिकारों पर विवाद हुआ।