Lokmat Sakhi >Social Viral > जीन्स घेतल्यावर लगेचच 'हे' काम करा, रंग कधीच फिका पडणार नाही- वर्षांनुवर्षे नव्यासारखी राहील

जीन्स घेतल्यावर लगेचच 'हे' काम करा, रंग कधीच फिका पडणार नाही- वर्षांनुवर्षे नव्यासारखी राहील

How To Wash Jeans?: जीन्सचा रंग उडून फिका पडू नये यासाठी जीन्स घेतल्यानंतर ती पहिल्यांदा धुण्यापुर्वी एक सोपं काम करा. यामुळे तुमच्या जीन्सचा फ्रेशपणा वर्षांनुवर्षे टिकून राहील.(what to do if Black or dark colour jeans faded after detergent wash?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 13:10 IST2025-06-21T13:08:24+5:302025-06-21T13:10:57+5:30

How To Wash Jeans?: जीन्सचा रंग उडून फिका पडू नये यासाठी जीन्स घेतल्यानंतर ती पहिल्यांदा धुण्यापुर्वी एक सोपं काम करा. यामुळे तुमच्या जीन्सचा फ्रेशपणा वर्षांनुवर्षे टिकून राहील.(what to do if Black or dark colour jeans faded after detergent wash?)

what to do if Black or dark colour jeans faded after detergent wash, how to wash jeans? perfect method of washing jeans  | जीन्स घेतल्यावर लगेचच 'हे' काम करा, रंग कधीच फिका पडणार नाही- वर्षांनुवर्षे नव्यासारखी राहील

जीन्स घेतल्यावर लगेचच 'हे' काम करा, रंग कधीच फिका पडणार नाही- वर्षांनुवर्षे नव्यासारखी राहील

Highlightsजीन्सचा रंग अजिबात जाणार नाही आणि ती कितीही जुनी झाली तरी रंग अगदी जसाच्यातसा टिकून राहील.

जीन्स वापरणं सध्या खूप नॉर्मल झालं आहे. अगदी शाळकरी मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळेच जण जीन्स वापरतात. खूप आरामदायी आणि स्टायलिश लूक देणारा हा प्रकार. शिवाय अगदी कॅज्युअली कुठे फिरायला जाण्यापासून ते एखाद्या पार्टीपर्यंत आपण ती कुठेही घालू शकतो. त्यामुळे प्रत्येकाकडे २- ३ जीन्स तर हमखास असतातच. आता आपण जेव्हा डार्क ब्लू, ब्लॅक अशा गडद रंगाच्या जीन्स घेतो, तेव्हा प्रत्येक धुण्यासोबत त्या जीन्सचा रंग जातो. मग हळूहळू नवी जीन्स जुनी दिसायला लागते. म्हणूनच जेव्हा तुम्ही डार्क रंगाची एखादी जीन्स घ्याल तेव्हा ती धुण्याच्या आधी हे एक काम करा (how to wash jeans?).. यामुळे जीन्सचा रंग अजिबात जाणार नाही आणि ती कितीही जुनी झाली तरी रंग अगदी जसाच्यातसा टिकून राहील.(what to do if Black or dark colour jeans faded after detergent wash?)

 

जीन्सचा रंग उडू नये म्हणून काय करावं?

जीन्सचा रंग उडू नये म्हणून नेमका काय उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ womens_wear_and_home_decor या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

सर्दी झाल्यावर प्लास्टिकच्या स्टीमरमधून वाफ घेता? डॉक्टरांनी दिली धोक्याची सूचना, वाफ घ्यायचीच तर...

हा उपाय करण्यासाठी एका बादलीमध्ये ४ ते ५ लीटर थंड पाणी घ्या.

या पाण्यामध्ये १ वाटीभर व्हाईट व्हिनेगर आणि एक मुठभर मीठ घाला.

 

आता पाणी एकदा व्यवस्थित हलवून घ्या. पाण्यामध्ये मीठ पुर्णपणे विरघळलं की मग त्यामध्ये जीन्स भिजत घाला.

फक्त १० रुपये खर्च करा, पिवळट दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील, दाढ दुखणंही थांबेल

२ ते ३ तास जीन्स पाण्यामध्ये तशीच राहू द्या. त्यानंतर घरात असलेलं कोणतंही डिटर्जंट वापरून जीन्स धुवून काढा. प्रत्येकवेळी डार्क रंगाच्या जीन्स पहिल्यांदा धुण्याआधी हा उपाय केल्यास जीन्सचा रंग अगदी पक्का होऊन जातो. एकदा ट्राय करून पाहा. 


 

 

Web Title: what to do if Black or dark colour jeans faded after detergent wash, how to wash jeans? perfect method of washing jeans 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.