सोशल मीडियामुळे जग जवळ आलं. जवळपास प्रत्येक वयोगटातील व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करते. फोटो, व्हिडीओ शेअर करणं, पाहणं यांसारख्या अनेक गोष्टी दिवसभरात सुरु असतात. मात्र कधी कधी Gen-z कडून काही नवीन शब्द ऐकायला मिळतात, ज्याचा ट्रेंड निर्माण होतो. या वयोगटातील लोक शब्दांची फोड करुन किंवा अर्धवट शब्दप्रयोग करुन एक विचित्र प्रकारची भाषा बोलतात. जे समजण्यासाठी खरंतर आपण गुगल करतो किंवा हा शब्द नेमका कुठून बरा आला असावा असा विचार करत बसतो. या शब्दांचे अर्थ काय हे देखील अनेकांना माहित नसतात. त्यातीलच एक शब्द पॅरासोशल.
लग्नात नवरीची हेअरस्टाइल सजवणारे ५ जबरदस्त स्टायलिश हेअर ब्रोच- नजर हटू नये इतके सुंदर आणि स्पेशल
२०२४ च्या शेवटी 'पॅरासोशल' हा शब्द इतका व्हायरल झाला की केंब्रिज डिक्शनरीनं त्याला स्वतंत्रपणे महत्त्व दिलं. आणि एवढंच नाही AI Slop, Delulu, Rizz, Situationship यांसारख्या Gen-Z शब्दांना मागे टाकत ‘पॅरासोशल’ हा शब्द सोशल मीडियावरील सर्वात चर्चेतला शब्द ठरला.
म्हणजे होतं काय की एखाद्या सेलिब्रिटीला म्हणजेच विराट कोहली किंवा शाहरुख खानला आपण कधीच भेटलेलो नसतो, पण रोज त्याच्या पोस्ट दिसतात. रोजचा संपर्क असतो. त्यातून त्यांच्याशी आपलं एक खोलवर नातं असल्यासारखं कायम वाटतं राहतं. आणि नातंच नसलेल्या या नात्याचं नाव आहे पॅरासोशल.
पॅरासोशल ही संकल्पना काही नवीन नाही. १९५० च्या दशकात दोन संशोधक डोनाल्ड हॉर्टन आणि रिचर्ड व्होल यांनी सर्वात पहिल्यांदा या शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर टीव्हीवरील अँकर्स, कलाकार किंवा वाचकांना लोक आपल्या ओळखीचे मानत होते. स्क्रीनवरुन दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल मनात जवळीकता निर्माण होणं. त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही माहित नसताना देखील त्याच्याविषयी चर्चा करणं. या एकतर्फी, काल्पनिक पण भावनिक नात्यास नाव दिलं गेलं Parasocial Relationship.
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात याविषयीची भावना अधिकपटीने वाढली आहे. इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्सपासून सेलिब्रिटी किंवा आपल्या आवडीच्या व्यक्तीला लोक आपलं मानू लागली आहे. ते काय खातात, कुठे जातात, कसं बोलतात, त्यांच सध्याचं स्टेटस काय याविषयी फॉलोअर्सला सगळ्यात जास्त माहित असतं. मी तिला किंवा त्याला ओळखतो, ती माझ्या खूप जवळची आहे. तो माझ्यासाठी खास आहे, अशा एकतर्फी नात्यांचा वाढता ट्रेंड निर्माण झाला आहे. याच ट्रेंडमुळे पॅरासोशल हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत येऊन केंब्रिज डिक्शनरीत त्याचा समावेश झाला. सोशल मीडियावर कमेंट्स, मीम्स आणि रिलेशनशिपमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला.
लग्न ठरलं-चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो नाही? आठवडाभर प्या खास ड्रिंक, त्वचा होईल चमकदार- केस होतील शायनी
इतकंच नाही तर Gen-Z पिढीच्या स्टेट्सपासून स्टोरीवर देखील पॅरासोशल हा शब्द सहज पाहायला मिळतो. “I have a parasocial crush”, “parasocial relationship with a creator” अशी वाक्य रोज पाहायला मिळतात.
AI Slop आणि Delulu सारखे शब्द आजही ट्रेंडमध्ये असले तरी पॅरासोशल हा शब्द लोकांच्या भावनांशी, सामाजिकतेशी आणि डिजिटल माध्यमातून तीनही स्तरांवर महत्त्वाचा ठरला आहे. सध्याच्या जगातील एकतर्फी नाती, आभासी जगातील भावनिक गोष्टी समजून घेण्यासाठी 'पॅरासोशल’ हा शब्द सर्वात अचूक ठरतो. ज्यामुळे त्याला Word of the Year च्या स्पर्धेमध्ये मानाचं स्थान मिळालं.
