Join us

ॲडल्ट व्हिडिओ पाहणं हेच ‘तिचं’ काम, पगार तासाला १५०० रुपये! २२ वर्षांच्या तरुणीला मिळाली हायटेक नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 16:25 IST

Girl get 1500 rupees per hour salary for watching Adult videos : ॲडल्ट कंटेट तयार करणं, ते व्हिडिओ मार्केट करणं या नव्या क्षेत्रात रिसर्चचं काम करण्यासाठी ९० हजार जणांमधून एका तरुणीची निवड झाली आहे.

ठळक मुद्दे९० हजार लोकांमधून तसल्या कामासाठई निवड होणे ही खरंच कौतुकास्पद बाब आहेआपण छंद म्हणून ज्या कामात फुकट तासनसात घालवतो त्या कामासाठी ती घेते बक्कळ पगार

ॲडल्ट व्हिडिओ  तासंतास पाहण्याचं व्यसन अनेकांना असतं. त्यात स्त्री-पुरुष सगळेच आले. काहीजणांना तात्पुरता उत्साह वाटतो, किक बसते. मात्र त्याचं व्यसन लागतं आणि काहीच काम न करता फक्त तसले व्हिडिओ पाहणं सुरु होतं. त्याहून वाईट म्हणजे अनेकदा आपल्या जोडीदाराकडून प्रत्यक्ष तशा अपेक्षा ठेवणंही काहीजणांचं सुरु होतं. त्यानंही मानसिक-शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. कुणी रागानं म्हणतंही की तसले व्हिडिओ पाहून तुला काय पैसे मिळतात का? तर त्याचं उत्तर एका तरुणीकडे आहे. तिला खरंच तसले व्हिडिओ पाहण्याचे पैसे मिळतात. वाचून आश्चर्य वाटलं ना, पण एका तरुणीला ॲडल्ट व्हिडिओ पाहण्याचे पैसे मिळतात. तेही थोडेथोडके नाही तर तासाला १५०० रुपये(Girl get 1500 rupees per hour salary for watching Adult videos).

(सौजन्य - Indiaglitz.com)

हुबेहुब आलिया भटसारखी दिसणारी कोण ही मुलगी? ती का म्हणतेय, मला आलिया म्हणू नका..

ही तरुणी स्कॉटलंड येथील असून बेड बायबल या कंपनीसाठी काम करतेय. आता तिला असे काम का देण्यात आले असेल असा प्रश्नही साहजिकच पडला असेल. तर ही कंपनीच असा ॲडल्ट व्हिडिओ कंटेंट तयार करते. या व्हिडिओवर रिसर्च करुन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तिला हे काम देण्यात आले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. तिचे नाव रेबेका डिक्सन. वय २२ वर्षे. ज्या नोकरीसाठी ९० हजार जणांनी ॲप्लिकेशन केले होते त्यातून तिची निवड करण्यात आली . हे एक आव्हानात्मक काम असल्याचे रेबेकाने माध्यमांशी बोलताना सांगितले. रेबेकाला व्हिडिओमधील पोझिशन्स, त्यात येणारे आवाज आणि या व्हिडिओमध्ये असलेल्या महिला आणि पुरुषांची संख्या यांची नोंद ठेवायची आहे.

(Image : Google)

तिने बाहुल्याशी लग्न तर केलेच, पण मूल झाल्याचाही केला दावा; काय आहे ही अजब प्रेमकहाणी

ॲडल्ट व्हिडिओ रिसर्च हेड अशी रेबेकाची पोस्ट असेल असेही सांगण्यात आले आहे. यामुळे रेबेकाला लोकांची ऑनलाईन आवड समजण्यास मदत होईल असेही कंपनी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन रेबेकाचे अभिनंदन आणि स्वागत केले. तसले व्हिडिओही पहा आणि तासाला १५०० रुपये पगारही मिळवा हे म्हणजे अनेकांना हेवाच वाटण्याचे काम आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलनोकरी