सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही व्हिडीओ असे असतात जे केवळ हसवत नाही तर आपल्या पंरपरा संस्कृती, भावभावनेमुळे लोकांच्या मनात घर करुन जातात.(Manipur bride viral video) सध्या असाच एक व्हिडीओ मणिपुरमधून समोर आला असून तो पाहणाऱ्यांना अक्षरश: मंत्रमुग्ध करतो आहे.(Viral wedding video India)
या व्हिडिओमध्ये एक नववधू पारंपरिक विवाह वेशात सजलेली दिसत आहे.(Traditional Manipuri bride) तिच्या चेहऱ्यावरचे शांत भाव, डोळ्यांतील सौम्यता आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्वातून झळकणारे तेज पाहून अनेकांनी तिला ‘देवी लक्ष्मीचे रूप’ असे म्हटले आहे. कोणताही भडक मेकअप नाही, हालचाली नाहीत, तरीही तिचं सौंदर्य आपसूकच लक्ष वेधून घेतं.
५० रुपये खर्च आणि घ्या हळदी- कुंकवाच्या वाणासाठी १० हटके पर्याय, कमी खर्चात- कामाची वस्तू
मणिपुरच्या पारंपरिक विचारधारणेनुसार लग्नात येणारी नववधू ही समृद्ध, शांतता आणि सौभाग्य घेऊन येते. त्यामुळे तिला थेट देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. लग्नाच्या दिवशी नववधूला देवीसारखा सन्मान देऊन तिचे स्वागत केले जाते. मणिपुरमध्ये वैष्णव धर्माचा सगळ्यात मोठा प्रभाव खूप मोठा आहे. श्रीकृष्ण-राधा भक्ती, भजन, नृत्य (रासलीला) या परंपरांचा विवाह संस्कारांवरही परिणाम दिसतो.
या व्हिडीओमध्ये नववधुने परिधान केलेले पारंपरिक वस्त्र आणि बारीक नक्षीकाम केलेले दागिने हे मणिपुरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक दागिन्यामागे एक परंपरा, एक कथा दडलेली असल्याचं जाणवतं. नववधुचा संपूर्ण लूक अत्यंत सोज्वळ आणि साधेपणातही उठून दिसणारा आहे.अशाच साधेपणाने आणि परंपरेला प्राधान्य देत अभिनेता रणदीप हुड्डानेही मणिपुरमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केलं होतं. त्या वेळीही सोशल मीडियावर “साधेपणाचं खरं सौंदर्य” अशीच चर्चा रंगली होती. आज पुन्हा एकदा हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना रणदीप हुड्डाच्या लग्नाची आठवण झाल्याचं दिसत आहे
नेटकऱ्यांनी म्हटलं उत्तर-पूर्व भारतातील विवाह परंपरा किती वेगळी आणि सुंदर आहे, यावर मत मांडलं. तर काही युजर्सनी “बॉलिवूडच्या चमकधमक लग्नांपेक्षा हे लग्न जास्त सुंदर वाटतं” अशी तुलना देखील केली आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे मणिपुरच्या संस्कृतीकडे पुन्हा एकदा देशाचं लक्ष वेधलं गेलं आहे. अनेकांना या प्रदेशातील लग्नाच्या रितीरिवाजांविषयी, पोशाखांविषयी आणि परंपरांविषयी जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा व्हिडीओ उत्तर-पूर्व भारताच्या सांस्कृतिक श्रीमंतीची, साधेपणाच्या सौंदर्याची आणि परंपरेच्या गोडव्याची झलक दाखवणारा ठरतो आहे.
