Join us

मिटक्या मारत पाणीपुरी खाणाऱ्या कुत्र्याचा व्हायरल व्हिडिओ! पण ते पाहूनच नेटिझन्स म्हणाले... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 17:59 IST

Dog Eating Panipuri: पाणीपुरी हा बहुतेकांच्या आवडीचा पदार्थ. हा पदार्थ जेव्हा कुत्र्याला खाऊ घातला, तेव्हा बघा त्याने नेमकी काय रिॲक्शन दिली...

ठळक मुद्देकाही जणं या व्हिडिओचं कौतूक करत आहेत. तर काही जण मात्र त्यावर टिका करत आहेत.

काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल आणि ते ही कमी पैशात तर त्यासाठी पाणीपुरीशिवाय (panipuri) दुसरा चांगला पर्याय नाही. पाणीपुरी खाऊन अवघ्या १०- २० रुपयांत आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवू शकतो. त्यामुळेच पाणीपुरी लव्हर्सची (panipuri lovers) संख्या भरपूर आहे. काही जण तर अगदी एक दिवसाआड पाणीपुरीचा आस्वाद घेतात. अनेकांना वेडं करणारी ही पाणीपुरी एका बाईंनी चक्क त्यांच्या कुत्र्यालाही (pet dog eating panipuri) खाऊ घातली. त्याचाच हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

 

dheerajchabbra या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक नेहमीसारखा पाणीपुरीचा गाडा दिसतो आहे आणि पाणीपुरी खाण्यासाठी एक बाई त्यांच्या पाळीव कुत्र्याला सोबत घेऊन आल्या आहेत.

चवदार कोल्ड कॉफी करण्याचं सिक्रेट! करून ठेवा कॉफी सिरप, टेस्टी कॉफी ५ मिनिटांत तयार

बाईंनी पाणीपुरी खाल्ली की नाही, ते माहिती नाही. पण त्या मात्र मोठ्या प्रेमाने त्यांच्या डॉगीला पाणीपुरी खाऊ घालत आहेत. कुत्र्यानेही दोन- तीन पाणीपुरी खाल्ल्या आणि त्यानंतर उरलेलं आंबट- गोड पाणी मिटक्या मारत पिऊन टाकलं. त्यावेळी त्या बाई त्यांच्या कुत्र्याकडे मोठ्या आनंदाने आणि कौतूकाने पाहत होत्या. 

 

त्यांच्या पाळीव कुत्र्यावरचं त्यांचं प्रेम या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसून येतं. काही जणं या व्हिडिओचं कौतूक करत आहेत. तर काही जण मात्र त्यावर टिका करत आहेत.

लहान मुलांमध्ये वाढतेय गोवरचे प्रमाण.. ५ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष नको, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

ज्यांच्याकडे पाळीव प्राणी असतात, ते प्रेमापोटी आपल्या घासातला घास काढून प्राण्यांना खाऊ घालतात. पण आपण जे खातो, ते सगळं या प्राण्यांसाठी योग्य नसतं. अनेकांना ते सहन होत नाही. त्यामुळे कुत्र्याला आवडत असली, तरी त्याच्यासाठी पाणीपुरी खाणं अजिबातच योग्य नाही, असं म्हणत अनेकांनी या व्हिडिओवर टिका केली आहे.

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न