Join us

काकूंनी केला भन्नाट कोंबडी डान्स! लग्नात इतक्या जबरदस्त नाचल्या की... पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 15:58 IST

Viral Video of a Kombadi Dance: लग्नात डान्स करायचा म्हटलं की अनेक जण देहभान विसरून नाचतात... असंच काहीसं या काकूंचं झालं आहे. 

ठळक मुद्देत्यांचा त्यांच्याच धुंदीत मस्त डान्स सुरू आहे. बाकीच्या महिलांना आणि नेटिझन्सला मात्र त्यांचे हे नृत्य पाहून हसू आवरत नाहीये. 

सध्या लग्नसराई जोरदार सुरू आहे. त्यामुळे लग्नाच्या वराती किंवा मेहंदी, हळद या कार्यक्रमांना होणारे डान्सचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. जमलेल्य वऱ्हाडींपैकी काही जण असे असतात, ज्यांना मुळीच डान्स येत नसतो. त्यामुळे ते चारचौघात नाचायला नकार देतात आणि बाकीच्या मंडळींचा डान्स एन्जॉय करतात. काही जण खरोखरच उत्तम डान्स करणारे असतात. तर तिसऱ्या प्रकारचे लोक असेही असतात, ज्यांना डान्स करता येत नाही पण डान्स करायला भारीच आवडतं. त्यामुळे मग ते अगदी दिलखुलासपणे इतर कोणाचाही विचार न करता मनमोकळेपणाने नृत्य करत असतात.(Aunty is doing funny murga dance in a marriage)

 

सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधल्या काकूही अशाच आहेत. त्यांना फार काही नाचता येत नसावं, असं त्यांच्या नृत्याकडे पाहून वाटतं.

थायरॉईडचा त्रास असेल तर खाण्याच्या बाबतीतली ७ पथ्ये पाळाच, आजार नियंत्रणात ठेवायचा तर....

पण त्या जे काही नाचत आहेत, ते मनापासून करत आहेत आणि आपला हा पुर्णपणे एन्जॉय करत आहेत. त्यांच्या या भन्नाट कोंबडी डान्सचा व्हिडिओ maheshdewatwal01 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक लग्नघर दिसत आहे. आजूबाजूला अनेक महिला घोळका करून उभ्या आहेत. डोक्यावर पदर घेऊन काही जणी लाजत आहेत तर काही जणी डान्स एन्जॉय करत आहेत.

 

अशी सगळी धमाल सुरू असताना एक काकू मध्यभागी येतात आणि चक्क कोंबडी डान्स सुरू करतात. हा डान्स करण्यासाठी त्यांनी त्यांची साडीही नऊवारी साडी खोचतात, त्यापद्धतीने मागच्या बाजूने खोचून घेतली आहे.

अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय टोमॅटो खाण्याचे ७ फायदे, सौंदर्य- आरोग्य दोन्हींसाठी उपयुक्त 

दोन्ही हात एका विशिष्ट पद्धतीने हलवत आणि कंबरेत जरासं वाकत त्यांचा त्यांच्याच धुंदीत मस्त डान्स सुरू आहे. बाकीच्या महिलांना आणि नेटिझन्सला मात्र त्यांचे हे नृत्य पाहून हसू आवरत नाहीये. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलनृत्य