बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन ही तिच्या काळातली एक अतिशय स्टायलिश अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. तिचे कपडे, दागिने, हेअरस्टाईल यांची नेहमीच चर्चा असे. आताही रविना चित्रपट सृष्टीमध्ये म्हणावी तशी ॲक्टीव्ह नसली तरीही तिच्या फॅशन सेन्सचे जबरदस्त चाहते आहेत आणि तिच्या लूकची नेहमीच चर्चा होत असते. आता हेच बघा ना मुंबई येथे नुकताचा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (NMACC) वर्धापन दिन सोहळा पार पडला. या सोहळ्यात रविनाने गळ्यात घातलेल्या माता राणी नेकलेसची भलतीच चर्चा झाली. ते नेकलेस नेमकं कसं होतं ते पाहा..(viral photos of Raveena Tondon's mata rani necklace)
या सोहळ्यासाठी बाॅलीवूडचे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील कित्येक मान्यवर उपस्थित होते. रविनाही खास तिच्या युनिक शैलीमध्ये तयार होऊन या कार्यक्रमाला आली होती. यावेळी तिने हलक्याशा गुलाबी रंगाचा चमचमता पंजाबी ड्रेस घाला होता. पण त्यावर तिने जाे दागिना घाला होता तो अतिशय लक्षवेधी ठरला. अगदी गळ्याशी ६ पदर आणि त्याच्या खाली लांब ६ पदर असा एकूण १२ पदरी तो दागिना होता. हा दागिना जेवढा मोठा होता तेवढंच त्याचं पेंडंटही ठसठशीत होतं. कारण त्यावर सिंहारुढ दुर्गा होती. अतिशय वेगळं गळ्यातलं असल्याने सध्या त्याचीच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
रविनाने या आधीही असेच वेगवेगळे पेंडंट असणारे स्पिरिच्युअल गळ्यातले घातले आहेत. काही दिवसांपुर्वी तिने एक गळ्यातलं घातलं होतं ज्यामध्ये श्रीकृष्णाचं पेंडंट होतं. त्यावेळीही तिच्या गळ्यातल्याची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर सलग काही दिवस ते नेकलेस तिच्या गळ्यामध्ये दिसून आलं.
तसेच रविनाचा हा फोटोही पाहा. यामध्येही तिने दुर्गेचं पेंडंट असणारं मोठं गळ्यातलं घातलं आहे. या सगळ्या तिच्या कलेक्शनमधून रविनाची धार्मिक वृत्ती दिसून येते अशी चर्चाही यानिमित्ताने सोशल मीडियावर होत आहे.
