Join us

कशासाठी? पोटासाठी? मुंबईच्या लोकलपाठी! दोन घास खायलाही निवांतपणा न देणारा मुंबई लोकलमधला व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 13:28 IST

Heart touching moment in local train viral: Local train man food video: viral video in local train : घराची जबाबदारी, आर्थिक गणित आणि न जुळलेल्या गोष्टी पेलवताना आपण आपल्यालाही विसरुन जातो. दिवसभर तो काय करतो? काय खातो ? याविषयी अनेकांना माहितच नसते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या लोकल ट्रेनमध्ये लाखो प्रवासी प्रवास करत असतात.(viral video in local train) या स्वप्नांच्या शहरांमध्ये लाखो लोक रोज प्रवास करत असतात.नुकत्याच झालेल्या लोकलच्या दुर्घटनेनंतर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.(Local train man food video)  सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही तरी व्हायरल झालेले पाहायला मिळते. त्यातील काही मनाला चटका लावून जाते तर काही मनोरंजनाचा भाग म्हणून आपण सोडून देतो. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Heart touching moment in local train viral)

जाळी असलेला की नसलेला कोणता फ्रीज चांगला? खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा , वीज बिल येईल कमी

कष्ट करताना आपल्याला अनेकदा बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. घराची जबाबदारी, आर्थिक गणित आणि न जुळलेल्या गोष्टी पेलवताना आपण आपल्यालाही विसरुन जातो. आपल्या घरच्यांना, मुलांना कोणत्याही गोष्टींची कमी पडू नये म्हणून दिवस-रात्र मेहनत करणारा पुरुष कोणालाही दिसत नाही. जितके खडतर जीवन स्त्रियांचे असते तितकेच पुरुषांचे देखील. पण त्याचा हा संघर्ष प्रत्येकाला माहित नसतो. दिवसभर तो काय करतो? काय खातो ? याविषयी अनेकांना माहितच नसते. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून त्या व्यक्तीचे दु:ख समजेल. ही व्यक्ती लोकलच्या गर्दीत खाली बसून टिफिन खात आहे. सर्व जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या या व्यक्तीला दिवसाला दोन वेळचे व्यवस्थित खायलाही निवांतपणा नाही.   सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओने अनेकांच्या मनात कालवाकालव केली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आपल्या जीवाची पर्वा न करता घरातील जबाबदाऱ्यांच्या ओझ्यासोबत धावणाऱ्या वडिलांचे आयुष्य. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या. वडिलांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे, तर दुसऱ्याने म्हटलं मला वडील नाही पण आज त्यांचे महत्त्व कळले. तर एकाने कमेंट केली वडील आपल्या जीवनाचा आधार आहे. पण ही व्यक्ती कोणाचा तरी मुलगा, नवरा किंवा बापही असू शकतो.  

टॅग्स :सोशल व्हायरलमुंबईलोकल