अहमदाबाद येथील प्लेन क्रॅशच्या घटनेला महिना उलटून गेला. पण आजही ते आठवलं तरी अंगावर काटा उभा राहातो. एवढा भयानक प्रसंग हेच शिकवून जातो की पुढच्याच क्षणी आपल्यासमोर साक्षात मृत्यूही येऊन उभा राहू शकतो, आपली लोक आपल्यापासून कायमची दुरावली जाऊ शकतात.. ज्या लोकांनी या अपघातात त्यांचे जिवलग गमावले आहेत, त्यांच्या दु:खाला तर अंतच नाही. अगदी अशाच दु:खातून अभिनेत्री विद्या माळवदेलाही जावं लागलं होतं. तिचे पती अरविंग बग्गा हे पायलट होते. तब्बल २५ वर्षांपुर्वी झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.(Vidya Malavade remembers 1st husband who died in plane crash 25 years ago)
याविषयीची एक पोस्ट विद्याने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली होेती. ती एअर होस्टेस होती आणि तिचे पती पायलट होते. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या या दाम्पत्याच्या लग्नाला अवघी ३ वर्षेच झाली होती.
आर.माधवन सांगतो, माझा मुलगा रोज रात्री ८ वाजता झोपतो-पहाटे ४ वाजता उठतो! बाप म्हणून मी फक्त..
प्लेन क्रॅशमध्ये पतीचे निधन झाल्याची बातमी जेव्हा आली तेव्हा विद्या जर्मनीला होती. वृत्त ऐकताच ती पुर्णपणे कोसळून गेली. त्यानंतर तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला. पण काळ हेच औषध आहे, असं म्हणतात त्याप्रमाणे ती हळूहळू सावरत गेली. त्यातून बाहेर येत गेली. पण असं असलं तरी आजही ती घटना आणि त्यानंतर उध्वस्त झालेलं आयुष्य अतिशय क्लेशदायी आहे असं ती म्हणते..
सोशल मीडियाद्वारे मन मोकळं करताना विद्या म्हणते आजही मला त्या ३ वर्षांतला एकेक प्रसंग जशासतसा आठवतो. अगदी त्या प्रसंगी मला काय वाटलं होतं, त्या भावनाही अजून ताज्या आहेत.
ना जीम ना डाएट, तारक मेहता-फेम जेठालालले दिड महिन्यात घटवलं १६ किलो वजन-ते कसं?
जे काही घडलं ते स्विकारायचं आणि आलेल्या परिस्थितीला पुर्णपणे समर्पित व्हायचं, जे काही मिळालं होतं त्याबद्दल आभार मानायचे.. हेच तत्त्व स्वीकारून मी जगते आहे. त्या घटनेने मला शिकवलं की आयुष्य किती अनमोल आहे आणि तुमच्या प्रिय व्यक्तींना जपणं किती महत्त्वाचं आहे.. मला विश्वास आहे की आजही माझ्यासाठी एखाद्या guardian angel आहे माझा guiding light आहे..