Lokmat Sakhi >Social Viral > उशीचा अभ्रा तेलकट झाला? पांघरुण खराब झाले? पाहा एक अगदी सोपी टिप, अभ्रे-पांघरुण नव्यासारखे दिसतील

उशीचा अभ्रा तेलकट झाला? पांघरुण खराब झाले? पाहा एक अगदी सोपी टिप, अभ्रे-पांघरुण नव्यासारखे दिसतील

very simple tip, for washing pillow covers and bedsheets : चादरी उशांचे अभ्रे खराब झाल्यावर साफ करण्यासाठी ही टिप वापरा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 15:36 IST2025-04-24T15:35:20+5:302025-04-24T15:36:25+5:30

very simple tip, for washing pillow covers and bedsheets : चादरी उशांचे अभ्रे खराब झाल्यावर साफ करण्यासाठी ही टिप वापरा.

very simple tip, for washing pillow covers and bedsheets | उशीचा अभ्रा तेलकट झाला? पांघरुण खराब झाले? पाहा एक अगदी सोपी टिप, अभ्रे-पांघरुण नव्यासारखे दिसतील

उशीचा अभ्रा तेलकट झाला? पांघरुण खराब झाले? पाहा एक अगदी सोपी टिप, अभ्रे-पांघरुण नव्यासारखे दिसतील

घर स्वच्छ ठेवायचं म्हणजे फक्त झाडू मारणे किंवा लादी पुसणेच नाही तर इतरही कामांचा त्यामध्ये समावेश होतो. ( very simple tip, for washing pillow covers and bedsheets )भांडी रोजच्या रोज घासावी लागतात, तसेच आपण कपडेही रोजच्या रोज धुतो. मात्र काही अशा गोष्टी असतात, ज्या महिन्यातून दोन ते तीनदा धुतल्या जातात. जसे की बेडवर टाकायची चादर असेल किंवा मग अंगावर पांघरायचे पांघरुण असेल. उशीचे अभ्रेही स्वच्छ धुणे गरजेचे असते. चादर पांघरुण आपण रोज वापरतो.  झोपताना उशी वापरतो. शरीराचा घाम चादरींना लागतो. उन्हाळ्यामध्ये तर पांघरुण- चादरींना खुप उबट वास येतो. ( very simple tip, for washing pillow covers and bedsheets )केस रोज धुत नाही त्यावरील काही घाण असेल किंवा मग केसांचे तेल असेल ते सारे उशीला लागते. रोजच्या वापराच्या गोष्टी जर खराब असतील तर घर छान स्वच्छ वाटूच शकत नाही.

तसेच पडदेही फार खराब होतात. त्यावरील हट्टी डाग असतील किंवा मग माती धूळ असेल व्यवस्थित निघत नाही. फक्त पाण्याचे व साबणाने धुऊन उपयोग होत नाही. त्यासाठी इतर काही प्रॉडक्ट मिळतात ती आपण वापरतो. पण या प्रॉडक्ट्समधील रसायनांमुळे कापडाची झीज होते. कापड विरळ होते. त्यामुळे घरगुती उपाय करणे कधीही फायद्याचे ठरेल. ही एक टिप वापरुन बघा. नक्की उपयोग होईल. 


  
 उशांवर अनेकदा तेलाचे डाग लागतात. केसांचे तेल उशीवर बसते हीच एक समस्या उशीबाबत वारंवार उद्भवते. असे झाल्यावर अभ्रे खराब होतात. फारच डागाळ दिसतात. फिकट रंगाचे असतील तर आणखी खराब वाटतात. अभ्रा धुताना किंवा चादरी पांघरुणे धुताना लहानशी टिप लक्षात ठेवा. धुण्याआधी एका बादलीमध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये थोडे मीठ घाला. कपडे धुण्यासाठी जे लिक्विड वापरात चार चमचे त्यातील लिक्विड त्यामध्ये टाका. पावडर वापरली तरी चालेल. लिंबाचे तुकडे टाका. रसही पिळा. सगळं मिक्स झालं की मग त्यामध्ये तासभरासाठी अभ्रे भिजवून ठेवा. नंतर साध्या पाण्यामध्ये तासभर भिजवा. मग हाती धुवा किंवा मशीनमध्ये धुवा. डाग निघतात. चिकटलेली माती इतरही काही डाग असतील तर निघून जातात. 

Web Title: very simple tip, for washing pillow covers and bedsheets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.