भात जर उरला असेल तर त्याला आपण फोडणी देतो. किंवा हल्ली भाताला नुसतीच फोडणी देण्यापेक्षा त्यापासून फ्राईड राईस, टोमॅटो राईस केला जातो. काही जणी भाताचे वडे किंवा कटलेट्स करतात. पण आता उरलेल्या भाताचा या सगळ्यापेक्षा वेगळा उपयोग कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती नसेल पण उरलेल्या भातांचा खूप चांगला उपयोग घरातील झुरळांना पळवून लावण्यासाठी केला जातो (Use Of Leftover Rice To Get Rid Of Cockroaches). घरामध्ये एकदा एखादं झुरळ दिसलं की लगेच त्यापुढच्या काही दिवसांतच घरात झुरळांचा सुळसुळाट होऊन जातो.(best home remedy to get rid of cockroaches)
झुरळं मारण्यासाठी अनेक केमिकलयुक्त पदार्थ बाजारात मिळतात. पण ते पदार्थ वापरणं अनेकांना सुरक्षित वाटत नाही. कारण त्यांचा वास खूप जास्त उग्र असल्याने घरातल्या लहान मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो.
स्वयंपाकघरातलं गॅस सिलेंडर किती दिवस पुरेल हे कसं ओळखायचं? ३ टिप्स- वेळीच घ्या अंदाज
त्यामुळे त्या स्प्रे व्यतिरिक्त इतर काय उपाय करता येऊ शकतात, याचा अनेक जण शोध घेत असतातच. त्या सगळ्यांसाठी हा उरलेल्या भाताचा उपाय खूप फायदेशीर ठरणारा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या वाटीभर थंड भात लागणार आहे.
घरातील झुरळं पळवून लावण्यासाठी भाताचा उपयोग
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात साधारण वाटीभर भात घ्या.
त्यानंतर त्यामध्ये १ चमचा डिटर्जंट, १ चमचा ब्राऊन शुगर टाका. थोडं पाणी टाकून हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्या.
डाएटींग तर करता पण ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही कसं ओळखावं? एक्सपर्ट सांगतात ३ टिप्स..
त्यानंतर भाताचे साधारण पेढ्याच्या आकाराचे गोळे करा आणि ते जिथे झुरळं जास्त फिरतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्या.
ब्राऊन शुगरच्या गोड वासामुळे झुरळं भाताकडे आकर्षित होतात. जेव्हा ते हा भात खातात तेव्हा डिटर्जंटमध्ये असणारे उग्र पदार्थ त्यांच्या पोटात जातात आणि त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा प्रकारे हळूहळू त्यांचा उच्छाद कमी होतो आणि घरातल्या झुरळांची संख्या कमी कमी होत जाते.
झुरळांना पळवून लावण्यासाठी हा एक अतिशय सोपा आणि सुरक्षित उपाय एकदा नक्की करून पाहा..