Join us

आठ लाख रुपये टिप मिळाली आणि नोकरीच गेली! अजब मामला आणि गजबच म्हणायचे लोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2024 15:52 IST

अमेरिकेतल्या हाॅटेलातली ही घटना एका वेटरला लाखांत टिप मिळाली पण नोकरी मात्र गेली.

ठळक मुद्देबघा, म्हणजे जगात काय काय घडत असतं?

हाॅटेलमध्ये जेवायला गेल्यावर तुम्ही टिप देता का? आपल्या देशात टिप देणं सामाजिक संकेताला धरुन सक्तीचं नसलं तरी अमेरिकेसह अनेक देशांत ते सक्तीचं आहे. पण फेब्रुवारीमधली ही एक अजब घटना. एकजण अमेरिकेतील साउर्दन मिशिगन येथील 'मासन जार कॅफे' येथे गेला. त्याला हवे ते पदार्थ त्याने मागवले. खाऊन झाल्यावर त्याच्यासमोर बिल आले ते ३२.४३ डॉलर्स. पण खाणाऱ्याने टिप दिली १०,००० डॉलर्स!भलीमोठी टिप पाहून संबंधित वेट्रेसही हादरुन गेली होती. तिने ते बिल आणि टिप कॅफेच्या मॅनेजरला दिले. ही रक्कम पाहून कॅफेच्या मॅनेजरलाही धक्का बसला.  ग्राहकाने हे चुकून तर नाही ना केलं असं वाटून मॅनेजर त्या ग्राहकाच्या मागे धावला. हे चुकून तर नाही ना झालं? असं विचारलं. तर तो म्हणाला चुकून वगैरे नाही मी स्तव:च एवढी  टिप दिली. आपला एक जवळचा मित्र गेला. त्याच्या अंत्यविधीसाठी म्हणून आपण येथे आलो. त्याची आठवण म्हणून आपण ही टिप दिल्याचं त्याने सांगितलं.

(Image :google)

त्या ग्राहकाच्या सूचनेनुसार ही टिप नंतर कॅफेमध्ये काम करणाऱ्या ९ जणांमध्ये विभागली गेली. एखाद्या हाॅटेलला टिप म्हणून एवढे पैसे मिळणं ही अतिशय असाधारण बाब होती. पण जिला ही टिप मिळाली तिची मात्र नोकरी गेली. मॅनेजरला तिला मेसेज केला कामावर येऊ नको.आपली काहीही चूक नसताना आपल्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं असं का घडलं?तर म्हणे तिने टिपवरचा कर भर नाही आणि ग्राहकाने सांगितले म्हणून तिने पैसे वाटून घेतले नाहीतर एकटीनेच ठेवले असते असे मॅनेजरचे म्हणणे.बघा, म्हणजे जगात काय काय घडत असतं?

टॅग्स :अमेरिकासोशल व्हायरल