Join us

यूपी गर्लचा मुंबईच्या फॅशन शोमध्ये जलवा! फुलांचा ड्रेस पाहून म्हणाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 10:45 IST

Nancy Tyagi fashion: Indian fashion influencer: Statement floral outfits: Dramatic long trails: ढऱ्या रंगाच्या मिनी ड्रेसला फुलांनी सजवले होते. तिच्या या ड्रेसने अनेक कलाकारांची नजर तिच्यावर खिळली.

फॅशन म्हटलं की आपल्या डोक्यात बॉलीवूड कलाकार हमखास येतात. अशातच सोशल मिडिया स्टार्स मागे कसे राहातील. (Couture street style) कान्स फेस्टिव्हलमध्ये पोहोचलेल्या नॅन्सी त्यागीने आता बॉलीवूडमध्येही पदार्पण केले आहे. तिने स्वत:शिवलेले कपडे घालून जगभरात तिची नव्याने ओळख निर्माण केली. ( Nancy Tyagi fashion) तिच्या नवनवीन डिझाइन्सची अनेकजण वाटत पाहत आहे. अशातच तिने नवीन व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. ती बॉलिवूड स्टार्सच्या पार्टीत पोहोचली. (Indian fashion influencer)

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात राहणारी नॅन्सी विवियन वेस्टवुडच्या पहिल्या फॅशन शोसाठी मुंबईत आली होती. या फॅशन शोमध्ये तिचा वेगळा लूक पाहायला मिळाला. पांढऱ्या रंगाच्या मिनी ड्रेसला फुलांनी सजवले होते. तिच्या या ड्रेसने अनेक कलाकारांची नजर तिच्यावर खिळली. नॅन्सी ही प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वत:चे कपडे स्वत: डिझाइन करते. परंतु, या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिची स्टाइल जरा वेगळी दिसत होती. तिने शॉर्ट बलून स्टाईल रफल ड्रेस फुलांनी सजवला आणि त्यात एक मोठा ट्रेल जोडला, ज्यामुळे त्याला शोस्टॉपर व्हायब्स मिळाले. हा ड्रेस घातल्यानंतर तिने तिचा स्टायलिश लूक  सगळ्यांसमोर दाखवला. 

">

नॅन्सीने ड्रेसला पांढऱ्या लेसच्या डिटेलिंगने सजवले होते. कंबरेपर्यंत बॉडी फिट ठेवताना, स्कर्टच्या भागात फ्लेअर्स जोडले.  ज्यामध्ये रफलसह बलून स्टाईलचा पफी लूक तिच्या सौंदर्यात भूरळ घालत आहे. नेकलाईनला फेदर जोडून हायलाईट केले. उजव्या हाताच्या खांद्यावर फुले लावून आणि डाव्या बाजूच्या कंबरेवर फुले लावून तिच्या लूकमध्ये आणखी भर पडला. तिच्या ड्रेससह ज्वेलरीने देखील अनेकांची मन जिंकली आहेत. फुलांसारखे रंगीबेरंगी कानातले आणि हलक्या निळ्या रंगाच्या सॅण्डलने आपला लूक तिने पूर्ण केला. 

मेकअप लूकमध्ये तिने ब्लश, आयलाइनर आणि मस्करा लावून डोळ्यांना सुंदर केले. ओठांनी लिपस्टिक लावून सौंदर्यात आणखी भर घातली. अनेकांनी तिला ऊर्फेची बहिण असे देखील म्हटले आहे. तिच्या फॅशन डिझाइनमुळे कौतुकही केले आहे. आपण देखील अशा पद्धतीचा फुलांचा ड्रेस शिवू शकतो किंवा आपल्या फॅशन स्टाइलमध्ये भर घालू शकतो. 

टॅग्स :सोशल व्हायरलफॅशन