Join us  

तुळशी विवाहाचा सण खास, दारात काढा रांगोळी झक्कास. फक्त 'H' काढून भोवतीने रंग भरा, पाहा रांगोळीची सोपी डिझाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2023 4:02 PM

Tulsi vivah rangoli using trick : चिमटीत रांगोळी धरता येत नाही म्हणून, छाप काढू नका. सोप्या पद्धतीची पण आकर्षक रांगोळी काढण्याची ट्रिक पाहा

सध्या सर्वत्र तुळशी विवाहाची (Tulsi Vivah) जय्यत सुरु आहे. याला देव उठनी एकादशी असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, तुळशी विवाहाचा पवित्र सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. दिवाळी (Diwali) सरली की तुळशी विवाहाचे वेध सगळ्यांना लागते. या दिवशी गोडधोड, स्पेशल पदार्थ तयार करण्यात येते. शिवाय दारासमोर रांगोळीही (Rangoli Design) काढण्यात येते.

काही लोकं तुळशी विवाह झाल्यानंतर फटाकेही फोडतात. तुळशी विवाहनिमित्त आपल्याला आकर्षक-सुबक रांगोळी काढायची असेल तर, ही डिझाईन नक्की ट्राय करून पाहा. अनेकांना रांगोळी काढायला जमत नाही. काही जणांना चिमटीत रांगोळीही धरता येत नाही. पण चिंता करू नका, फक्त 'H' काढून आपण सुंदर रांगोळी काढू शकता(Tulsi vivah rangoli using trick).

दारासमोर फक्त 'H' काढून सुंदर रांगोळी काढा

बनियनचा रंग पिवळा झालाय? ३ भन्नाट टिप्स, काही मिनिटात बनियन होईल नव्यासारखी पांढरीशुभ्र

जर आपल्याला चिमटीत रांगोळी धरायला जमत नसेल तर, फेविकॉलची बॉटल स्वच्छ करा, त्यात रांगोळी भरा. पेन प्रमाणे बॉटल धरा, आणि 'H' काढा. 'H' काढून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे तुळशीची कुंडी काढा. तुळशीची कुंडी काढल्यानंतर त्यात आवडीचे रंग भरा. कुंडीच्या भोवतीने नाजूक फुलांची डिझाईन काढा, आपण ही डिझाईन टूथपिकच्या मदतीने देखील काढू शकता.

गॅरेजमध्ये केली बालाजी टेलीफिल्मची स्थापना, मुलांना सांभाळल्याबद्दल वडील-भावाचे मानले आभार, एकताचं निर्माती होणं सोपं नव्हतं

नंतर कुंडीवर तुळशीचं झाड काढा. आपण झाडाची पानं काढण्यासाठी पुन्हा टूथपिकचा वापर करू शकता. कुंडीच्या भोवतीने आपण मोरपीस देखील काढू शकता. यामुळे रांगोळीची आणखी शोभा वाढेल. जर आपल्याला आणखी आयडीया सुचत असतील तर, त्याच्या भोवतीने डिझाईन काढू शकता. 

टॅग्स :दिवाळी 2023रांगोळीसोशल व्हायरलसोशल मीडिया