Join us

Trending Banarasi Saree: बनारसी साडीवर काशीचा सुंदर घाट! नक्षी अशी सुरेख 'घाट बनारसी साडी' व्हायरल, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 16:29 IST

Trending Banarasi Saree : बनारसी साडीच्या या नव्या प्रकाराला सध्या भलतीच मागणी आहे.. त्यामुळे तिथल्या अनेक विणकरांनी सध्या अशा प्रकारच्या भरपूर साड्या तयार करायला सुरुवात केली आहे...

ठळक मुद्देविशेेष म्हणजे आपल्या साडीवर काशीचा घाट असावा, अशी मागणी करणाऱ्या सर्वाधिक महिला या दक्षिण भारतातल्या आहेत. त्यातही कर्नाटक येथून या नव्या धाटणीची बनारसी विशेष पसंत केली जात आहे. 

बनारसी साड्यांची नजाकत आणि तिचा मृदूपणा खरोखरंच लाजवाब आहे.. त्यामुळे या साडीची चर्चा आता देशभरातच नाही, तर जगभरात होत असते... अशी ही देखणी साडी नेहमीच बघणाऱ्याचं मन मोहून टाकते, यात वादच नाही.. त्यामुळेच तर भारताच्या अनेक प्रांतातील नववधू बोहल्यावर चढतात, ते बनारसी शालूचा (banarasi saree) साज लेवूनच.. या साडीशिवाय आपला वॉर्डरोब पुर्ण नाही, यावर महिलांच्या कित्येक पिढ्या ठाम असायच्या आणि आजदेखील बहुतांश महिलांचं हेच म्हणणं आहे...

 

आजवर वस्त्रोद्योग आणि वस्त्र जगतावर आपली हुकूमत अबाधित ठेवणाऱ्या बनारसीचं आता आणखी एक नवं, मोहक रुप महिलांना खुणावू लागलं आहे. आता बनारस किंवा काशी म्हटलं की बनारसी साडी, बनारसचं पान आणि बनारसचा घाट अशा तेथील प्रसिद्ध गोष्टी हमखास आठवतातच. काही वर्षांपुर्वी या तीन गोष्टीतील बनारसी साडी आणि बनारसचा घाट या दोन गोष्टी एकत्र आणण्याचा घाट काही विणकरांनी घातला. त्यांच्या या प्रयोगानुसार त्यांनी बनारसी साडीचा काठ पारंपरिक पद्धतीने डिझाईन करण्याऐवजी त्यावर काशीचा प्रसिद्ध घाट रेखाटला (Banarasi saree with Kashi Ghat).. तेव्हा त्या साडीचे खूप कौतूक झाले हे खरे.. पण ते तेवढ्यावरच थांबले होते. आता मात्र पुन्हा एकदा नव्याने या साडीचा ट्रेण्ड आला आहे.. 

 

बनारस येथील वस्त्रोद्योग प्रचंड मोठा आहे. दर महिन्याला तेथे कित्येक करोडोंची उलाढाल होत असते. तेथील व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आधी पारंपरिक नक्षी असणाऱ्या बनारसीलाच खूप मागणी होती. पण आता मागील काही महिन्यांपासून ट्रेण्ड बदलत चालला असून बनारसी घाटाची नक्षी असणाऱ्या साड्यांची मागणी वाढली आहे. 'घाटवाली बनारसी आहे का?', अशी मागणी आता त्यांच्याकडे जवळपास रोजच होत आहे.. विशेेष म्हणजे आपल्या साडीवर काशीचा घाट असावा, अशी मागणी करणाऱ्या सर्वाधिक महिला या दक्षिण भारतातल्या आहेत. त्यातही कर्नाटक येथून या नव्या धाटणीची बनारसी विशेष पसंत केली जात आहे. 

 

संपूर्ण साडी आणि पदर यावर काशीचा घाट रेखाटण्यासाठी कमीतकमी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो, असे तेथील विणकरांनी सांगितले. आधीच बनारसी साडी महागडी मग आता त्यावर काशीचा घाट येणार म्हटल्यावर साडीची किंमत आणखीनच वाढणार, असे वाटणे साहजिक आहे. पण ४ ते ५ हजार रुपयांपासून 'घाट बनारसी साडी' उपलब्ध आहे.. त्यामुळे मध्यमवर्गीय महिलाही कधी ना कधी पैसे साठवून 'घाट बनारसी साडी' घेऊच शकते, हे नक्की. साडीचा पोत किती मऊ आहे आणि तिच्यावरची नक्षी किती सुबक आहेत, यावरून बनारसी साडीची किंमत ठरते.  

टॅग्स :व्हायरल फोटोज्वाराणसीफॅशन