Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > Virosh Wedding: रश्मिका मंदानाचे सुंदर दागिने पाहिले का? कासूमाला, वड्डानम दक्षिणी पारंपरिक दागिन्यांनी सजली नवरी

Virosh Wedding: रश्मिका मंदानाचे सुंदर दागिने पाहिले का? कासूमाला, वड्डानम दक्षिणी पारंपरिक दागिन्यांनी सजली नवरी

Virosh Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांनीही लग्नात पारंपरिक पद्धतीचे अतिशय सुंदर दागिने घातले होते...(traditional jewellery of Rashmika Mandana and Vijay Devarkonda)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2026 17:34 IST2026-02-27T17:33:52+5:302026-02-27T17:34:48+5:30

Virosh Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांनीही लग्नात पारंपरिक पद्धतीचे अतिशय सुंदर दागिने घातले होते...(traditional jewellery of Rashmika Mandana and Vijay Devarkonda)

traditional jewellery of rashmika mandana and Vijay devarkonda in marriage | Virosh Wedding: रश्मिका मंदानाचे सुंदर दागिने पाहिले का? कासूमाला, वड्डानम दक्षिणी पारंपरिक दागिन्यांनी सजली नवरी

Virosh Wedding: रश्मिका मंदानाचे सुंदर दागिने पाहिले का? कासूमाला, वड्डानम दक्षिणी पारंपरिक दागिन्यांनी सजली नवरी

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा शाही विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. आता लग्नसमारंभ म्हटलं की कपडे, दागदागिने यांची रेलचेल असतेच.. तशीच ती रश्मिका आणि विजय यांच्या लग्नातही दिसून आली. हल्ली अभिनेत्रींमध्ये लग्नसमारंभात कमीतकमी दागिने घालण्याचा ट्रेण्ड दिसून येतो. पण रश्मिकाचं लग्न मात्र याला अपवाद ठरलं. कारण रश्मिका आणि विजय या दोघांनीही या लग्नात पारंपरिक धाटणीचे अतिशय सुंदर दागिने घातले होते. त्यामुळे जेवढी चर्चा रश्मिकाच्या दागिन्यांची झाली तेवढीच चर्चा विजयच्या दागिन्यांचीही होत आहे..(traditional jewellery of Rashmika Mandana and Vijay Devarkonda)


 

रश्मिका मंदानाने लग्नात घातलेले पारंपरिक दागिने

लग्नामध्ये रश्मिका अगदी लक्ष्मीप्रमाणे दागदागिने घालून सजली होती. तिच्या गळ्याशी टेम्पल ज्वेलरी प्रकारातलं एक मोठं चोकर होतं. त्याखालोखाल कासू माला हा दक्षिणेतल्या दागिन्यांचा एक प्रकार होता. लक्ष्मीहार असतो त्याप्रमाणे तो एकाखाली एक असा ५ पदरी होता.

केसांच्या सगळ्याच तक्रारी होतील गायब, आठवड्यातून एकदा 'हा' उपाय करा- केस होतील दाट, लांब, काळेभोर

त्या माळेचं वरचं आणि खालचं पदक एकसारखं होतं आणि त्यावर लक्ष्मीचा शिक्का असतो. मध्यभागी एकाखाली एक अशा तीन कोरऱ्या होत्या. त्यानंतर तिने घातलेल्या आणखी एका पारंपरिक दागिन्याची चर्चा झाली आणि तो दागिना म्हणजे वड्डानम. आपल्याकडच्या कंबरपट्ट्याला दक्षिणेमध्ये वड्डानम म्हणतात. तिथे नवरीच्या अंगावर वड्डानम असायलाच हवा असं मानलं जातं. रश्मिकाचा वड्डानम तिच्या गळ्यातल्या कासुमालेशी मिळताजुळता होता. याशिवाय तिने बिंदी, बांगड्या, कानात मोठे झुमके, माठपट्टी, वेल, मोरणी, हातफुलं असे बरेच दागिने घातले होते. 

 

विजय देवरकोंडाच्या दागिन्यांनी वेधलं लक्ष

एखाद्या चित्रपटात हिरोच्या अंगावर शोभून दिसावेत असे दागिने रश्मिका मंदानाचा नवरा म्हणजेच विजय देवरकोंडा याच्या अंगावर दिसून आले. हातामध्ये अतिशय हेवी वर्क असणारे कडे होते. जे सहसा आपण पौराणिक कथांमधील राजे महाराजे यांच्या हातात बघतो..

रोपांना कधीच विकतचं खत घालावं लागणार नाही, 'या' पद्धतीने गुळाचं पाणी द्या, रोपं राहतील हिरवीगार

याशिवाय विजयने गळ्यात दोन मोठमोठे हार घातले होते. ओडियानम म्हणजे पुरुषांनी घालायचा कंबरपट्टाही विजयच्या अंगावर दिसून आला. याशिवाय पायातही त्याने तोडे घातले होते. तो एक पारंपरिक तेलगू दागिना असून त्याला कोलुसू असं म्हणतात. कानात टॉप्स आणि दंडात बाजुबंद अशा थाटात विजय अगदी राजकुमार दिसत होता. 


 

Web Title : विरोश वेडिंग: रश्मिका मंदाना के पारंपरिक गहनों ने लूटी महफिल।

Web Summary : रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा की शादी में पारंपरिक दक्षिण भारतीय गहने आकर्षण का केंद्र रहे। रश्मिका कासू माला और वड्डानम से सजी थीं। विजय भारी कड़ा, हार, ओडियानम और कोलुसु पहने राजकुमार दिख रहे थे।

Web Title : Virosh Wedding: Rashmika Mandanna's traditional jewelry steals the show.

Web Summary : Rashmika Mandanna and Vijay Devarakonda's wedding featured traditional South Indian jewelry. Rashmika adorned herself with a kasu mala and vaddanam. Vijay sported heavy kadas, necklaces, an odianam, and kolusu, looking every bit the prince.