ऑफिस किंवा कुठेही बाहेर जायचं म्हटलं की आपण एक छोटीशी पर्स किंवा हँडबॅग सोबत घेतो. या हँडबॅगमध्ये अनेकींचा अर्धा संसारच असतो असं म्हटलं तरी चालेल. ओठाला (Tips & Tricks To Clean Handbag At Home) लावायच्या लिपस्टिकपासून ते पायाला लावायच्या बँडेज पर्यंत सगळं याच पर्समध्ये असत. आपण रोज ऑफिसला किंवा कुठेही बाहेर जायचं तर ही हँडबॅग (How to clean your handbag at home) सोबत घेतल्याशिवाय घराबाहेर पाऊलच ठेवत नाही. आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे ही बॅग सोबती म्हणून आपल्याजवळ कायम असतेच(How to Clean Purse).
ही छोटीशी हँडबॅग आपल्याला गरजेला लागणाऱ्या वस्तूंनी कायम भरलेली असते. ही हँडबॅग आपण कशीही हाताळतो, कुठेही ठेवतो. अशा या हँडबॅगेत आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू भरुन ही बॅग खांद्यावर घेऊन आपण निघतो. परंतु दररोज वापरल्या जाणाऱ्या या हँड बॅगेच्या स्वच्छतेचा आपण विचारच करत नाही. यामुळे ही हँडबॅग सतत वापरुन खराब होते इतकेच नव्हे तर या हँडबॅगेवर वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया देखील वाढतात. जर वेळच्यावेळीच ही हॅंडबॅग (How to Clean Dirty Hand Bag at Home) स्वच्छ केली नाही तर यावरील बॅक्टेरियांच्या संपर्कात येऊन आपल्याला अनेक प्रकारचे लहान मोठे आजार होण्याची शक्यता असते. यासाठी ही हॅंडबॅग वेळीच स्वच्छ करणे आवश्यक आहे. ही हॅंडबॅग कितीवेळा आणि कशी स्वच्छ करावी ते पाहूयात.
आठवड्यातून किमान एकदा करा हॅंडबॅग स्वच्छ कराच...
रोजच्या वापरातील हॅंडबॅग आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे गरजेचे असते. हॅंडबॅग लेदर, कापड किंवा इतर कोणत्याही मटेरियलपासून तयार केलेली असली तरीही ती आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे गरजेचे असते. साबणाचे पाणी किंवा कोणत्याही प्रकारच्या अँटिसेप्टिक सोल्युशनचा वापर करून आपण ही हँडबॅग स्वच्छ करु शकता. साबणाच्या पाण्यांत किंवा अँटिसेप्टिक सोल्युशन मध्ये ही बॅग तासभर बुडवून ठेवा, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.
लेदरच्या बॅग स्वच्छ करण्यासाठी आपण लेदर क्लिनरचा वापर करु शकता. लेदर क्लिनर हलक्या मऊ कापडावर किंवा स्पंजवर लावा त्यानंतर लेदर बॅगवर हलकेच घासून घ्या. नंतर हँडबॅग स्वच्छ कापडाने पुसून टाका. यानंतर तुम्ही त्यावर लेदर कंडिशनर किंवा लेदर क्रीम देखील लावू शकता. यामुळे ओलावा टिकून राहतो आणि बॅग चमकते. चुकूनही या लेदरच्या बॅग्स उन्हात ठेवू नका. यामुळे त्याचा रंग फिकट पडू लागतो आणि लेदर खराब होते.
कढई ते गॅस बर्नर, स्वयंपाकघरातील कोणती वस्तू किती वर्षे वापरावी ? वेळीच बदला नाहीतर तब्येत बिघडेल...
टूथब्रशची मदत घ्या...
हँडबॅगची चेन देखील स्वच्छ करणे तितकेच आवश्यक असते. यासाठी, एक जुना टूथब्रश घ्या. लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिसळा आणि साखळीवर घासून घ्या. यामुळे साखळीतील घाण निघून जाईल. जर साखळी अडकली असेल तर त्यावर मेण लावा. यामुळे साखळी पुन्हा व्यवस्थित काम करु लागेल.
आता आलाय ‘वन लेग जीन्स’चा ट्रेंड! तुम्हाला काय वाटतं, एकाच पायाच्या पॅण्टची किती असेल किंमत?
हॅंडबॅगवरील डाग असे करा स्वच्छ...
अनेकदा हँडबॅग्जवर डाग दिसतात, जे साफ करणे खूप कठीण असते. जर त्यावर तेलाचे डाग लागले असतील तर १ चमचा बेकिंग सोडा किंवा कॉर्नफ्लोअर घ्या आणि डागावर घासून घ्या. नंतर ते कापडाने पुसून टाका. डाग निघून जाईल. याशिवाय, बॅगवर बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. नंतर ते कोरड्या कापडाने स्वच्छ करा.