दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई आणि प्रकाशाचा उत्सव! दिवाळी हा सणच मुळात दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीत सगळीकडे दिव्यांचा लख्ख प्रकाश, रोषणाई, झगमगाट पहायला मिळतो. खरंतरं, दिवाळी हा सण दिव्यांशिवाय अधूराच आहे. दिवाळीत आपण घराभोवती रांगोळी काढून दिव्यांची सुंदर अशी आरास करतो. दिवाळीच्या दिवसांत दिव्यांची आरास करण्यासाठी फार मोठया प्रमाणावर तेलातुपाचा वापर केला जातो(light a diwali diya the right way with these 2 easy tricks).
आजकाल वेगवेगळे इलेक्ट्रिक दिवे, पाण्यात चालणारे दिवे, बॅटरीवाले दिवे, वेगवेगळ्या आकर्षक लाईटिंग्ज बाजारात पाहायला मिळतात. आपण त्या मोठ्या हौसेने खरेदीही करतो. पण जोपर्यंत आपली पारंपारिक पणती अंगणात लागत नाही, तोपर्यंत दिवाळीच्या सणाला काहीच महत्त्व नाही. अशाप्रकारे दिवे, पणत्या लावल्या की नेमकी एक अडचण येते. सगळ्यात पहिली अडचण म्हणजे पणत्या खूप जास्त तेल शोषून घेतात, त्यामुळे मग तेलही खूप लागते. याचबरोबर तासंतास हे दिवे - पणत्या तेवत ठेवायचे म्हणजे त्या ठराविक वेळाने तेल - तूप सारखे घालावे लागते. एवढ्या महागाईच्या काळात एवढे तेल पणत्यांसाठी वापरायचे म्हणजे सर्वसामान्य माणसांना खरोखरच जिव्हारी लागते. अशा परिस्थितीत, आपण एक सोपा उपाय करू शकतो. हा उपाय केल्यामुळे एकतर तेल - तुपाचीही बचत होईल तसेच सारखे दिव्यांत तेल - तूप न घालता देवीतील दिवा दीर्घकाळसाठी कायम (Tips & tricks this diwali light diya with water instead of oil save money with simple trick) तेवत राहतो. हा उपाय नक्की काय आहे ते पाहूयात...
दिवे - पणत्या दीर्घकाळ तेवत ठेवण्यासाठी लागेल कमी तेल...
ट्रिक १ :- दिवे - पणत्या दीर्घकाळ तेवत ठेवण्यासाठी तेलाचा वापर नेमका कमी कसा करावा, याबद्दलची सोपी ट्रिक radhikamaroo61या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला ४ ते ५ काचेचे छोटे पारदर्शक ग्लास लागतील. त्यानंतर हे काचेचे ग्लास पाण्याने भरून घ्यावेत. हे दिवे अधिक आकर्षक व सुंदर दिसण्यासाठी आपण ग्लासातील पाण्यांत वेगवेगळ्या प्रकारचे रंग घालून, रंगीबेरंगी पाणी देखील करु शकता. मग या पाण्यात वरुन चमचाभर तेल घालावे. त्यानंतर एक नेहमीच्या वापरातील प्लास्टिकची पिशवी घेऊन त्या ग्लासच्या आकाराच्या गोलाकार चकत्या कापून घ्याव्यात. मग या गोलाकार प्लास्टिकच्या चकत्यांच्या बरोबर मध्यभागी गरम अगरबत्तीच्या मदतीने कापसाची वात जाईल इतके छोटे छिद्र तयार करुन घ्यावे. मग या छिद्रांत कापसाच्या वाती घालाव्यात. मग हे वाती घालून तयार केलेल प्लास्टिकचे रॅप ग्लासातील पाण्यावर ठेवावे आणि दिवे प्रज्वलित करुन घ्यावेत.
दिवाळीचा फराळ झटपट होण्यासाठी खास टिप्स! गडबड - गोंधळ न होता, पदार्थ न बिघडता करा झटकेपट पदार्थ...
ट्रिक २ :- पणत्यांमध्ये कमी तेल वापरूनही दीर्घकाळ तेवत ठेवण्यासाठी ही दुसरी ट्रिक. यात आपण सर्वात आधी कापूस वापरून त्याची वात तयार करून घ्यायची आहे. वात तयार करताना आपण टिश्यू पेपरचा देखील वापर करू शकता. टिश्यू पेपरच्या लांब पट्ट्या कापून घ्याव्यात. कापसाच्या वाती वाळताना सोडून टिश्यू पेपरची एक पट्टी घेऊन कापूस आणि टिश्यू पेपर एकत्र गुंडाळून वात तयार करावी. आपण फक्त टिश्यू पेपरच्या लांब पट्ट्या वापरून देखील दिव्याच्या वाती तयार करू शकता. त्यानंतर एका भांड्यात मेणबत्ती घेऊन तिचे छोटे तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे गॅसच्या मंद आचेवर गरम करून मेण वितळवून घ्यावे, या वितळलेल्या मेणात वात बुडवून संपूर्ण भिजवून घ्यावी. आता दिवे किंवा पणत्यांमध्ये पाणी ओतून घ्यावे. त्यानंतर या पाण्यात तयार वाती ठेवून त्या काडीपेटीच्या मदतीने प्रज्वलित कराव्यात. अशा प्रकारे आपण तेल - तूप न वापरता दीर्घकाळ तेवत राहणारे दिवे - पणत्या लावू शकता.
