Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात लाईटभोवती भरमसाठ किडे घोंघावतात तेव्हा करा 'हा' घरगुती उपाय- दरवर्षीचा त्रास गायब...

पावसाळ्यात लाईटभोवती भरमसाठ किडे घोंघावतात तेव्हा करा 'हा' घरगुती उपाय- दरवर्षीचा त्रास गायब...

tips & tricks rainy season insects remedy save your house from monsoon fly : make homemade spray with 3 ingredients : tips & tricks rainy season insects remedy : पावसाळ्यात लाईटजवळ जमा होणारे लांब पंखांचे कीटक घरात शिरण्यापासून रोखण्यासाठी करा हा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 19:08 IST2025-06-18T18:55:41+5:302025-06-18T19:08:53+5:30

tips & tricks rainy season insects remedy save your house from monsoon fly : make homemade spray with 3 ingredients : tips & tricks rainy season insects remedy : पावसाळ्यात लाईटजवळ जमा होणारे लांब पंखांचे कीटक घरात शिरण्यापासून रोखण्यासाठी करा हा उपाय...

tips & tricks rainy season insects remedy save your house from monsoon fly make homemade spray with 3 ingredients | पावसाळ्यात लाईटभोवती भरमसाठ किडे घोंघावतात तेव्हा करा 'हा' घरगुती उपाय- दरवर्षीचा त्रास गायब...

पावसाळ्यात लाईटभोवती भरमसाठ किडे घोंघावतात तेव्हा करा 'हा' घरगुती उपाय- दरवर्षीचा त्रास गायब...

पावसाळा ऋतू सगळ्यांनाचं आवडतो. पावसाळ्यातील वातावरण आणि गारवा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. पावसाळा ऋतू अल्हाददायक आणि आनंदी वाटत असला तरी तो येताना आपल्यासोबत अनेक समस्या देखील घेऊन येतो. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे अनेक प्रकारचे कीटक, कीड आणि माशा, डास आपल्या घरात हमखास (tips & tricks rainy season insects remedy save your house from monsoon fly) शिरकाव करतात. पावसाळ्यांत आपल्यापैकी बऱ्याचजणांना हा अनुभव आला असेल की, घरात विशेषतः लांब पंखांचे कीटक, जे रात्री लाईटभोवती सतत फिरत असतात यांचे प्रमाण अचानक वाढते. हे कीटक दिसायला इवलुसे असले तरी देखील त्यांचा त्रास हा होतोच. हे कीटक सतत  डोळ्यांपुढे घोंघावतात इतकेच नाही तर कधी कानात किंवा तोंडात देखील जातात(tips & tricks rainy season insects remedy).

काहीवेळा तर हे कीटक भयंकर चावतात त्यामुळे खाज येते तसेच अन्नपदार्थांमध्येही पडण्याची शक्यता असते. असे हे कीटक काहीवेळा अनेक उपाय करूनही घराबाहेर जात नाहीत, त्यामुळे अशा कीटकांपासून घर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे गरजेचे असते. यासाठी काही साधेसोपे आणि उपयुक्त घरगुती उपाय करून आपण या कीटकांना घराबाहेर ठेवू शकतो. पावसाळ्यात विशेषतः रात्रीच्या वेळेस लाईट जवळ जमा होणारे लांब पंखांचे कीटक घरात शिरण्यापासून रोखण्यासाठी काही सोपे उपाय पाहूयात. 

पावसाळ्यात लाइटभोवती गिरक्या घालणारे कीटक पळवण्यासाठी उपाय... 

पावसाळ्यात लाइटभोवती गिरक्या घालणारे कीटक पळवण्यासाठी आपण एक घरगुती स्प्रे तयार करु शकतो. हा खास स्प्रे तयार करण्यासाठी आपल्याला लवंग, बेकिंग सोडा आणि कापूर वड्या इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

किचन सिंकच्या पाईपमधून झुरळं घरभर येतात? वापरा 'हा' होममेड स्प्रे - खिशाला परवडणारा असरदार उपाय...

पावसाळ्यात डास - चिलटं - माशांचा भणभणाट? पाहा लसणाचा असरदार उपाय- घर पावसाळ्यातही वाटेल फ्रेश...

स्प्रे कसा तयार करावा? 

विशेषतः रात्रीच्या वेळेस लाईट जवळ जमा होणारे लांब पंखांचे कीटक घरात शिरण्यापासून रोखण्यासाठी, आपण घरगुती स्प्रेचा वापर करु शकतो. हा स्प्रे तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लवंग पावडर किंवा लवंग काड्या यापैकी एक घालावे. त्यानंतर लवंग पावडर पाण्यांत संपूर्णपणे मिसळून जाईपर्यंत हे पाणी चमच्याने हलवत राहावे तसेच या पाण्याला हलकी उकळी येऊ द्यावी. पाण्याला उकळी आल्यानंतर यात बेकिंग सोडा आणि कापूर वड्या घालाव्यात. आता हे सगळे पदार्थ पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यावे. त्यानंतर तयार द्रावण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. तयार स्प्रे ज्या भागात कीटक आहे त्या भागात शिंपडून घ्यावे.

नारळ फोडायचं अवघड काम सोपं करणारं भांडं, स्वस्तात मस्त-पाहा तुम्हाला आवडतं का?

थोड्याच वेळात आपण फरक पाहू शकता, या कीटकांचे प्रमाण कमी झालेले दिसेल. या स्प्रेमध्ये असणाऱ्या लवंग आणि कापूर वड्यांच्या उग्र गंधामुळे हे कीटक पुन्हा घराकडे फिरकत देखील नाही. या स्प्रेचा कोणताही दुष्परिणाम होत नाही कारण त्यात कोणतेही केमिकल्सयुक्त रसायन वापरलेली जात नाही.

Web Title: tips & tricks rainy season insects remedy save your house from monsoon fly make homemade spray with 3 ingredients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.