घराची गॅलरी, खिडकी किंवा बाल्कनीत सतत वावरणारे कबुतर म्हणजे डोक्याला त्रासच... सुंदर बाल्कनी किंवा गॅलरी कबुतरांच्या सततच्या ये-जा करण्यामुळे आणि त्यांनी केलेल्या विष्ठेमुळे खराब होते. कबुतरांची विष्ठा फरशीवर साचली की ती साफ करणे खूपच त्रासदायक आणि कंटाळवाणे काम असते. कबुतरांनी केलेल्या या विष्ठेमुळे दुर्गंध, डाग आणि अस्वच्छता पसरते. अनेकजण यावर उपाय म्हणून नेट, स्प्रे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून पाहतात पण त्याचा फारसा फायदा होत नाही. जर तुम्ही या समस्येवर कोणताही उपाय न मिळाल्याने कंटाळले असाल, तर तुमच्यासाठी एक अगदी सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे(daffodil plant repels pigeons).
आपण घराच्या बाल्कनीत वेगवेगळ्या प्रकारची रोप मोठ्या हौसेने लावतो. यात फळझाड, फुलझाड त्यांचा समावेश असतो तसेच आपण कबुतरांचा गॅलरीतील वावर कमी करण्यासाठी आपल्या गार्डनमध्ये असेच एक रोप लावू शकतो. हे रोप तुमच्या बाल्कनीत असल्याने कबुतर तुमच्या गॅलरी, बाल्कनी किंवा खिडकीच्या आसपास फिरकणार (Tips & Tricks How Daffodil Plant Keeps Pigeons Away From Home) देखील नाहीत. कबुतरांच्या विष्ठेने घराची बाल्कनी, गॅलरी खराब होऊ नये म्हणून नेमकं कोणतं रोप कुंडीत लावावं ते पाहूयात...
कबुतरांना पळवून लावण्यासाठी नेमकं कोणतं रोप लावावं?
डॅफोडिल हे एक असे रोप आहे ज्याला अत्यंत तीव्र वास असतो. विशेष म्हणजे, हा वास कबुतरांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे, जर तुम्ही हे रोप तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा कबुतरांचा वावर असलेल्या ठिकाणी ठेवले, तर ते कबूतर ते ठिकाण सोडून दुसरीकडे जातील.
शिवाय, डॅफोडिलची फुले (Daffodil Flowers) दिसायला अतिशय सुंदर असल्याने, हे रोप लावल्याने तुमच्या घराची शोभा तर वाढेलच, पण त्यासोबतच तिथले वातावरणही शुद्ध राहील. विशेष म्हणजे, या रोपाला जास्त देखभालीची गरज नसते. अगदी कमी देखभालीमध्येही ते चांगले वाढते.
टूथपेस्ट करेल कमोड मिनिटभरात स्वच्छ! पिवळे डाग, दुर्गंधी होईल दूर - खिशाला परवडेल असा देसी जुगाड...
मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की डॅफोडिलच्या रोपाला सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे हे रोप त्याच ठिकाणी लावा जिथे सूर्यप्रकाशा पुरेशा प्रमाणात पोहचेल. याव्यतिरिक्त, कुंडीमध्ये लहान आकाराचे छिद्र करा, जेणेकरून मातीमध्ये पाणी जास्त प्रमाणात जमा होणार नाही.
केसांना हेअर डाय लावून विकत घेताय कॅन्सरचं दुखणं! १ चूक पडेल महागात - वेळीच व्हा सावध...
अशा प्रकारे, अगदी थोडा खर्च करून तुम्ही कबुतरांमुळे होणारे गंभीर आजार आणि पसरणाऱ्या घाणीपासून कायमची सुटका मिळवू शकता. हा एक पूर्णपणे नैसर्गिक, केमिकल-मुक्त आणि सुंदर उपाय आहे, जो तुमच्या घराची शोभा वाढवतो आणि कबुतरांची समस्याही सोडवतो.
