Join us

शुभ्र पांढरे कपडे काही दिवसांतच पिवळट, काळपट पडतात? 3 उपाय, कपडे पुन्हा चमकतील नव्यासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2022 15:33 IST

How To Wash White Clothes: पांढरे कपडे काही दिवसांत लगेच पिवळट (yellowish stains) दिसू लागतात. असे कपडे पुन्हा चमकवण्यासाठी करून बघा हे काही सोपे उपाय

ठळक मुद्देपांढऱ्या कपड्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी हे काही उपाय करून बघा.

पांढरेशुभ्र कपडे अंगावर असले की त्यांचा रुबाब काही वेगळाच दिसतो. कोणतीही व्यक्ती मग ती सावळी असो किंवा उजळ असो पांढऱ्या कपड्यांमध्ये उठूनच दिसते, देखणी वाटते. पण पांढरे कपडे मेंटेन करणं, त्यांचा शुभ्र पांढरा रंग टिकवून ठेवणे हे खरोखरच अवघड काम आहे. कारण कितीही स्वच्छ धुतले (How To Wash White Clothes) तरी काही दिवसांतच ते पिवळट- काळपट दिसू लागतात. म्हणूनच पांढऱ्या कपड्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी हे काही उपाय (home remedies) करून बघा.

 

पांढऱ्या कपड्यांवर आलेला पिवळटपणा काढून टाकण्यासाठी...1. लिंबूयासाठी एक बादलीमध्ये गरम पाणी घ्या, त्या पाण्यात एक लिंबू पिळा. साधारण एका कपड्यासाठी अर्धी बादली पाणी आणि एक लिंबू याप्रमाणे वापरा. त्या पाण्यात पांढरे कपडे अर्धा तास भिजत ठेवा आणि नंतर नेहमीप्रमाणे धुवून टाका.

 

2. व्हिनेगरकपड्यांचा पिवळटपणा काढून टाकण्यासाठी लिंबाप्रमाणेच व्हिनेगरही उपयुक्त ठरते.

साडी पिन परफेक्ट कशी लावायची? चुकीच्या पद्धतीमुळे साडी फाटू नये, म्हणून सेलिब्रिटी साडी ड्रेपर डॉली जैन सांगतात..

यासाठी कपडे भिजवताना किंवा मशीनमध्ये लावताना डिटर्जंटसोबत २ ते ३ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर टाकावे. आणि कपडे नेहमीप्रमाणे धुवून टाकावेत. यामुळे कपड्यांचा बदललेला रंग पुन्हा पुर्ववत होण्यास मदत होते. 

 

3. बेकिंग सोडाअर्धी बादली पाण्यात एक कप बेकिंग सोडा टाका. त्यात पांढरे कपडे अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवा.

नवरीची कमाल! प्री- वेडिंग फोटोशूटसाठी निवडलं असं ठिकाण की... तुम्हीही म्हणाल खड्ड्यात गेलं..

त्यानंतर नेहमीप्रमाणे कपडे साबण किंवा डिटर्जंट लावून धुवून टाका. कपड्यांचा पिवळट- काळपटपणा कमी झालेला असेल. कपड्यांचा काळपट- पिवळटपणा काढून टाकायचा असेल, तर स्वच्छ धुतलेले कपडे नेहमी उन्हात, मोकळ्या हवेत वाळू घाला.   

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स