Join us

घरातल्या फर्निचरला वाळवी दिसू लागताच 'हे' काम करा, वाळवी गायब फर्निचर सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2025 15:32 IST

Home Hacks For Termite Attack On Wooden Furniture घरातल्या फर्निचरला वाळवी लागायला सुरुवात झाली आहे, असं लक्षात येताच या काही गोष्टी तातडीने करून पाहा..(home remedies to get rid of termite from wooden furniture)

ठळक मुद्देपेस्ट कंट्रोल करून घेणं तर गरजेचं आहेच. पण त्याआधी या काही गोष्टी नक्की करून पाहा जेणेकरून वाळवी आटोक्यात राहण्यास मदत होईल...

हल्ली घरोघरी फर्निचरच्या वेगवेगळ्या वस्तू असतातच. वॉर्डरोब, बेड, खुर्च्या, टेबल अशा वस्तू तर जवळपास सगळीकडेच दिसतात. काही घरांमध्ये खूप जास्त फर्निचर असतं. अगदी भिंतींनासुद्धा प्लायवूड लावलेलं असतं. पण जर फर्निचरची व्यवस्थित काळजी घेणं झालं नाही आणि त्याच्यात पाणी मुरायला लागलं तर काही दिवसांतच त्याला किडा लागतो. यालाच आपण वाळवी लागणं असं म्हणतो. एकदा फर्निचरला वाळवी लागली आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवसांतच वाळवीचा किडा फर्निचरचा पार फडशा पाडतो आणि सगळ्या लाकडी वस्तू आतून पोकळ करून टाकतो. त्यामुळे घरात वाळवी दिसताच योग्य वेळ पाहून पेस्ट कंट्रोल करून घेणं तर गरजेचं आहेच (tips and tricks to keep furniture safe from termite attack). पण त्याआधी या काही गोष्टी नक्की करून पाहा जेणेकरून वाळवी आटोक्यात राहण्यास मदत होईल...(home remedies to get rid of termite from wooden furniture )

 

घरातल्या फर्निचरला वाळवी लागल्यास काय उपाय करावा?

१. वाळवीला रोखण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे कडुलिंबाच्या तेल. नीम ऑईल म्हणून ते ओळखलं जातं. ज्याठिकाणी वाळवी जास्त प्रमाणात दिसते आहे त्या ठिकाणी हे तेल शिंपडा.

जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यानंतर? डॉक्टर सांगतात पाण्याच्या बाबतीत 'हा' नियम पाळाच

त्याच्या उग्र वासाने आणि त्याच्यातील ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्मांमुळे वाळवीचं प्रमाण कमी होतं.

 

२. कोरफडीचा गर सुद्धा वाळवी कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. यासाठी कोरफडीच्या पानाचा ताजा गर घ्या आणि मिक्सरमधून फिरवून त्याची पातळ पेस्ट करा. ही पेस्ट वाळवी झालेल्या भागाला लावा. २- ३ दिवस सलग हा उपाय करा. वाळवी कमी होईल.

९० टक्के लोकांचं डोकं 'या' एकाच कारणामुळे दुखतं! म्हणूनच डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास टाळण्यासाठी...

३. व्हिनेगर उकळवून घ्या आणि ते स्प्रे बॉटलमध्ये भरून किंवा तसंच चमचा वापरून वाळवी लागलेल्या भागावर शिंपडा. हा उपायही सलग ३ ते ४ दिवस करा. वाळवी कमी होईल.  

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीस्वच्छता टिप्स