Lokmat Sakhi >Social Viral > खणाच्या साडीची ‘अशी’ घाला घडी, कपाटातला साड्यांचा ढिग कोसळणार नाही, कायम दिसेल आवरलेल

खणाच्या साडीची ‘अशी’ घाला घडी, कपाटातला साड्यांचा ढिग कोसळणार नाही, कायम दिसेल आवरलेल

Saree organization tips: How to store sarees in cupboard: Saree folding ideas: साड्यांची कितीही व्यवस्थित घडी घातली तरी एखादी दुसरी गोष्ट शोधताना घड्या मोडल्या जातात किंवा विस्कटतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2025 16:17 IST2025-06-02T16:14:17+5:302025-06-02T16:17:00+5:30

Saree organization tips: How to store sarees in cupboard: Saree folding ideas: साड्यांची कितीही व्यवस्थित घडी घातली तरी एखादी दुसरी गोष्ट शोधताना घड्या मोडल्या जातात किंवा विस्कटतात.

tips and tricks for organize saree in cupboard 2 tips for saree folding ideas cabinet will clean | खणाच्या साडीची ‘अशी’ घाला घडी, कपाटातला साड्यांचा ढिग कोसळणार नाही, कायम दिसेल आवरलेल

खणाच्या साडीची ‘अशी’ घाला घडी, कपाटातला साड्यांचा ढिग कोसळणार नाही, कायम दिसेल आवरलेल

साडी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. अगदी कोणत्याही खास क्षणी आपल्याला सगळ्यात आधी साडी नेसावीशी वाटते.(Organize saree collection) साडीचे विविध प्रकार आहेत. कोणताही सण-समारंभ असला किंवा घरात लग्नकार्य असलं की आपण आवर्जून साडी खरेदी करतो. (Saree organization tips)
अनेकदा कपाटात ढीगभर साड्या असल्या तरी खास प्रसंगी आपल्याला नवी कोरी साडी हवी असते.(How to store sarees in cupboard) कपाटातील साड्यांचा पसारा कितीही आवरला तरी ते कधी नीट लावले जात नाही.(Saree folding ideas) या गोंधळात अनेकदा साडीवरील मॅचिंग गोष्टी गायब होतात.(Saree storage solutions) कधी ब्लाऊज मिळत नाही तर कधी परकरच हरवतो. घाईच्या वेळी नेमकं काय करावं हे देखील आपल्याला सुचत नाही.(Cupboard organization for sarees) 

केस सतत थोडे ट्रिम केले तर भरभर वाढतात? ब्यूटी एक्सपर्टचा सल्ला, केसांचं वाटोळं होतंच कारण..


साड्यांची कितीही व्यवस्थित घडी घातली तरी एखादी दुसरी गोष्ट शोधताना घड्या मोडल्या जातात किंवा विस्कटतात. इतक्या महागड्या साड्या आपण खरेदी तर करतो परंतु, त्याची देखभाल करताना आपल्या नाकी नऊ येते. साड्यांना डाग लागणे- चुरगळणे, डिझाइन्स किंवा हेव्ही वर्क, धागा वर्क खराब होण्याची शक्यता असते. आपल्याकडे खणाची किंवा खोप्याची साडी असते. साड्या कपाटांत नीट ऑर्गनाईझ करुन ठेवण्यासाठी साड्यांची कशी घडी घालायची ते पाहूयात.

साडीची घडी घालण्याच्या दोन पद्धती आहेत. आपण साडीला व्यवस्थित फोल्ड करुन त्याचा एक कोपरा घेऊन त्रिकोण पद्धतीने घडी घालू शकतो.  शेवटचा जो कोपरा राहिल त्याला आतमधल्या साइडला दुमडवा. यामध्ये आपण परकर किंवा ब्लाऊज देखील सहज ठेवू शकतो. ही साडी घडी घालण्याची पद्धत खण म्हणून ओळखली जाते. अशा पद्धतीने घडी घातल्यास आपल्या कपाटात जास्तीची जागा राहिल. 


आपल्या खोपा पद्धतीने साडीची घडी घालायची असेल तर साडीची व्यवस्थित घडी घालून घ्या. त्यानंतर एकावर एक दुमडून घ्या. साडीची शेवटची काठ घेऊन पॉकेटसारखी साइड घडी घाला. अशा पद्धतीने घडी घातल्यास आपली साडी व्यवस्थित राहिल. सतत इस्त्री करण्याची देखील गरज पडणार नाही. 


 

Web Title: tips and tricks for organize saree in cupboard 2 tips for saree folding ideas cabinet will clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.