उन्हाळा सुरु झाल्यामुळे हिवाळ्यात वापरलेल्या जाडजूड ब्लँकेट आणि रजई कपाटात ठेवण्याची तयारी आपली सुरुच झाली असेल. (Clean blanket without water)या मऊसुत ब्लँकेट धुताना अक्षरश: आपल्या नाकी नऊ येतात. उबदार, लोकरीचे कपडे आपल्याला घरात सहज धुतात येतात. परंतु, ब्लँकेट आणि रजई धुण्यासाठी बाहेर ड्राय क्लिनिंगसाठी देतो, ज्यात आपले खूप पैसे जातात.(Summer blanket cleaning hacks)
परंतु, आपण पाणी आणि सूर्यप्रकाशाशिवाय ब्लँकेंट स्वच्छ धुवून नीटनीटके ठेवू शकतो. (Quick blanket freshening tricks) हिवाळ्यात वापरलेल्या जड ब्लँकेट, रजाई स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ३ टिप्सचा वापर करुन आपण आपली मेहनत आणि वेळ वाचवू शकतो. ज्यामुळे घरही लवकर स्वच्छ होईल आणि ब्लँकेट-रजईमधील कुबट वासही निघून जाण्यास मदत होईल. (Summer cleaning without washing)
धान्याला लागणार नाही कीड- पडणार नाही अळ्या, वर्षभर टिकतील डाळ-तांदूळ - ३ उपाय
या पद्धतीने करा ब्लँकेट- रजाई साफ
1. बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामध्ये कपडे स्वच्छ करण्याचे गुणधर्म आहेत. जे आपल्याला ब्लँकेट स्वच्छ करण्यास मदत करतील. जर आपल्या ब्लँकेटवर डाग असतील तर ती जागा भिजवून त्यावर थोडा बेकिंग सोडा टाकून पसरवून घ्या. २० ते ३० मिनिटे ब्लँकेट तशीच ठेवा. यानंतर मऊ ब्रश किंवा कापडाने स्वच्छ करा. ब्लँकेटवरील डाग हलके होण्यास मदत होईल.
2. व्हॅक्यूम क्लिनर वापरा
ब्लँकेटवर साचलेली धूळ आणि घाण काढून टाकण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनरची मदत होईल. यामुळे ब्लँकेट काही मिनिटांत स्वच्छ होईल. तसेच ड्राय क्लिनिंग टाळण्यासाठी घरच्या घरी ब्रशने किंवा क्लिनरने साफ करा. ब्लँकेट घाण होऊ नये म्हणून कव्हरने झाकून ठेवा. त्यामुळे ब्लँकेट ऐवजी फक्त आपल्याला कव्हर धुवावे लागेल.
3. ब्लँकेट क्लिनिंग स्प्रे वापरा
ब्लँकेट क्लिनिंग स्प्रे बाजारात सहज मिळतात. याच्या मदतीने पाणी आणि उन्हाशिवाय आपण ब्लँकेट स्वच्छ करु शकतो. ब्लँकेट स्प्रे करा आणि काही वेळाने स्वच्छ कापडाने किंवा ब्रशने स्वच्छ करा. या सोप्या पद्धतीने ब्लँकेट-रजई साफ करा. यामुळे धुण्याची आणि वाळवण्याची गरज भासणार नाही.