Join us

थाळी महागली! सर्वांचा दावा आता भारतीय माणसांना थाळी खाणे परवडत नाही कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 13:56 IST

Rising thali prices in India: Cost of Indian meals after 2020: २०१९-२० नंतर वाढत्या महागाईनुसार सध्याच्या थाळीच्या किमती जास्त आहे.

२०१९-२० च्या आर्थिक सर्वेक्षणातून भारतीय लोकांचे पोट भरणारी थाळी महागली आहे.(Rising thali prices in India) याचा मागोवा घेण्यासाठी थालिनोमिक्सची ओळख करुन देण्यात आली. २०१५-१६ आणि २०१९-२० दरम्यान शाकाहारी थाळीच्या सरासरी किमतीत घट झाल्याचे दिसून आले.(Food inflation in India) ज्यामुळे देशभरात जेवणाची उपलब्धता सुधारल्याचे समजले. (Indians skipping meals study)थालिनोमिक्समध्ये राष्ट्रीय पोषण संस्थेने २०११ मध्ये भारतीयांसाठी दिलेल्या आहारविषयक मार्गदर्शक तत्वांवर आधारित, थाळीमध्ये ३०० ग्रॅम तांदूळ आणि गहू, १५० ग्रॅम भाज्या आणि ६० ग्रॅम डाळी (मासांहरी थाळीत मांस, अंडी किंवा मासे) इत्यादी पदार्थ होते.(Why Indians can’t afford two veg meals a day) यांच्या किंमतीमध्ये स्वयंपाकाचे तेल, इंधन आणि सामान्यत:वापरले जाणारे मसाले यांचा समावेश होता. यामुळे मुलभूत पौष्टिक जेवणाच्या किंमतींचा अंदात आपल्याला मिळत होता. (Indian diet and rising food costs)

सतत बटर खाणं धोक्याचं! रोजच्या स्वयंपाकात हवं 'हे' तेल, तज्ज्ञ सांगतात तब्येतीसाठी का आवश्यक

वाढती महागाई आणि एलपीजीचे वाढणारे दर याचा परिणाम खाण्यावर अधिक प्रमाणात झालेला पाहायला मिळाला आहे. २०१९-२० च्या आर्थिक सर्वेक्षणातील मूळ थालिनोमिक्सने २०१५-१६ मध्ये शाकाहरी थाळीच्या किमती राष्ट्रीय पातळीवर घट झाल्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु, २०१९-२० मध्ये सुमारे २७ रुपयांवरुन २४ रुपयांवर आला होता. याउलट मांसाहरी थाळीच्या किमती सातत्याने वाढल्या. २०१९-२० पर्यंत ३५ रुपयांवरुन जवळजवळ ३८ रुपयांपर्यंत पोहचला.  HCES २०२३-२४ मधील युनिट व्हॅल्यू डेटा वापरून प्रत्येक राज्यासाठी थाळीच्या किमती ठरवण्यात येतात. २०१९-२० नंतर वाढत्या महागाईनुसार सध्याच्या थाळीच्या किमती जास्त आहे. 

दिवसातून दोन वेळचे जेवण कोणाला परवडेल? 

सर्वेक्षणातून असे समजले की, एक व्यक्ती प्रति दिवस दोन थाळींच्या महिन्याच्या खर्चाची तुलना HCES मध्ये नोंदवलेल्या महिन्याच्या अन्न खर्चाशी करतो. जर एका कुटुंबाचा खर्च त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला थाळी विकत घेणे परवडणार नाही. 

  • ४.७ टक्के कुटुंब दिवसातून दोन वेळा मांसाहरी जेवण जेवू शकत नाही. 
  • २.३ टक्के लोकांना दोन वेळा शाकाहरी जेवण परवडणार नाही. 
  • झारखंडमध्ये १८ टक्के (मांसाहारी) आणि ११ टक्के (शाकाहरी) लोक आहेत. ग्रामीण झारखंडमध्ये , मांसाहारी थाळीची परवड २०.४ टक्क्यांपर्यंत पोहोचते.
  • ओडिशा, मेघालय आणि मणिपूरमध्येही जेवणाची किंमत जास्त आहे .

यातून असे देखील समजले आहे की, अनेकजण पोषणावर पैसे कमी खर्च करतात. दिवसांतून दोन वेळा पुरेशा प्रमाणात पौष्टक अन्न खात नाही. यामध्ये ४६ टक्के भारतीय कुटुंबे मुलभूत, पौष्टिक आहारासाठी आवश्यक असलेल्यापेक्षा कमी खर्च करतात. मिळालेल्या माहितीनुसार २०२३-२४ मध्ये भारतीय कुटुंबाला मोठ्या प्रमाणात अन्नाचा साठा उपलब्ध करुन दिला आहे. परंतु, वाढलेल्या किंमतींमुळे आणि परवडणाऱ्या किमतींमध्ये बरीच तफावत आहे. तसेच पौष्टिकतेचा कमी वापर आहे. संतुलित आहाराचे केंद्रबिंदू असलेल्या डाळी, भाज्या, स्वयंपाकाचे तेल आणि इंधनाची परवडणारी उपलब्धता यावर लक्ष देण्याची तातडीची गरज आहे.

टॅग्स :सोशल व्हायरल