Join us

ऐकावं ते नवलच! 'या' देशात मिळतात स्त्रिया भाड्याने, लग्न करण्याची सूट- पर्यटकांची तोबा गर्दी, नेमकं कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2025 16:16 IST

Thailand wife rental: Thai Taboo book: Wife rental culture Thailand: थायलंडसारख्या देशात पत्नी मिळतेय भाड्याने नेमकं कारण काय?

पर्यटकांचा आवडीचा आणि आग्नेय आशियातील सुंदर देश म्हणून जगप्रसिद्ध असणारा देश थायलंड.(Thailand tourist place) या ठिकाणी पर्यटक समुद्रकिनारे आणि नाईटलाइफचा आनंद घेण्यासाठी येतात. पण सध्या थायलंडसारखा देश आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.(Thailand wife rental) भाड्याने घेतलेली पत्नी, या पुस्तकाच्या ट्रेंडमुळे नवीन वाद निर्माण झाला.(Thai Taboo book) थायलंडच्या काही भागात महिला पर्यटकांसोबत भाड्याने घेतलेल्या पत्नी म्हणून या पुस्तकात वर्णन करण्यात आले.(Wife rental culture Thailand) मनोरंजनाची गोष्ट अशी की, जर तुम्हाला एखादी मुलगी खूप आवडत असेल तर लग्नाचा पर्याय देखील असणार आहे. 

घरातल्या टॉयलेट सीटवर काळे- पिवळे डाग पडले? चमचाभर कॉफी पावडर करेल कमाल- खसाखसा न घासताही टॉयलेट सीट चमकेल

रेंटल वाईफचा ट्रेंड काय आहे?

थायलंडमधील पट्टाया शहरात ही प्रथा बऱ्याच काळापासून सुरु आहे. याला 'वाईफ ऑन हायर' किंवा 'ब्लॅक पर्ल' असं देखील म्हटलं जाते. खरं तर हा एक प्रकारचा तात्पुरता विवाहासारखा संबंध आहे, ज्यामध्ये स्त्रियांना पैसे देऊन काही काळासाठी पत्नी केले जाते. त्यावेळेसाठी ती स्त्री पत्नीसारखं सर्व काम करते. स्वयंपाक करण्यापासून ते एकत्र राहाण्यापर्यंत. हा एकप्रकारचा करार असतो पण हा कायदेशीर पद्धतीने विवाह मानला जात नाही. हळूहळू हा एक व्यवसाय बनला आहे. ज्यामध्ये महिला यांमध्ये स्वत:हून सामील होतात. 

लॅव्हर्ट ए इमॅन्युएल यांनी लिहिलेले 'थाई टॅबू - द राईज ऑफ वाईफ रेंटल इन मॉडर्न सोसायटी' हे पुस्तक या विषयाबद्दल सविस्तर माहिती देते. यात थायलंडमधील गरीब आणि गरजू महिला पैसे कमावण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी असे काम करतात असं सांगण्यात आले आहे. या महिला सहसा बार किंवा नाईट क्लबमध्ये काम करतात आणि या ठिकाणाहून ग्राहक यांना मिळतात. यातील ग्राहक हे परदेशी पर्यटक असून सुट्टीसाठी येथे येतात. 

भाड्याने घेतलेल्या बायका बनणाऱ्या महिलांची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यांचे वय, सौंदर्य, शिक्षण आणि कालावधी. काही महिला फक्त काही दिवसांसाठी भाड्याने राहतात तर काही महिने राहतात. मिळालेल्या माहितीनुसार भाडे $१६०० (सुमारे १.३ लाख रुपये) ते $११६००० (सुमारे ९६ लाख रुपये) पर्यंत असण्याची शक्यता आहे. यावर कोणताही कायदा नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी खाजगी पद्धतीने होतात. 

प्रिया मराठेने अकाली घेतला निरोप, ऐन तारुण्यात महिलांमध्ये का वाढतोय कॅन्सरचा धोका- काळजी घ्या..

थायलंडमधील शहरीकरण आणि वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेक लोक खूप एकटे पडले आहेत. अशावेळी कायमस्वरुपी नात्यात अडकण्यापेक्षा लोकांनी या ट्रेंडला दुजोरा दिला. थायलंडमध्ये ही पद्धत नवीन वाटत असली तरी जपान आणि कोरियासारख्या देशांमध्ये ती पूर्वीपासून सुरु आहे. 'गर्लफ्रेंड फॉर हायर' सारख्या आधीपासूनच आहे. थायलंडने हा ट्रेंड स्वीकारला आणि सध्या पर्यटन उद्योगाचा एक भाग बनला आहे. थायलंड सरकार हे मान्य करते की, देशात भाड्याने पत्नी मिळण्याचा ट्रेंड वेगाने वाढतो आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा देखील आणायला हवा. ज्यामुळे या व्यवसायात काम करणाऱ्या महिलांना सुरक्षितता आणि त्यांच्या हक्काचे रक्षण करता येईल.   

टॅग्स :सोशल व्हायरल