Join us

वाढदिवसाच्या दिवशी अचानक लेकीला समोर पाहून वडिलांना आलं रडू... काय झालं नेमकं? व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 13:53 IST

Emotional Video of Daughter And Father: परदेशातल्या या बाप- लेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिला हा व्हिडिओ?

ठळक मुद्देपालकांचं प्रेम कसं असतं आणि वय वाढत जातं तसे ते किती इमोशनल होत जातात, हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ एकदा बघाच. 

वाढदिवसाच्या दिवशी एकटं रहावं असं कुणालाच वाटत नाही. फार काही जंगी पार्टीच करावी, असं नाही. पण त्यादिवशी तरी आपल्यासोबत आपले सगळे कुटूंबिय असावेत, मित्रमंडळींनी शुभेच्छा द्याव्या आणि सगळा दिवस कसा शुभेच्छांनी आपल्या आवडत्या माणसांनी भरून गेलेला असावा असं वाटतं. थोड्या फार फरकाने सगळ्यांनाच असं वाटत असतं. त्या व्हिडिओमधल्या (Emotional video) काकांनाही तसंच वाटत होतं. त्याचं झालं असं की त्या दिवशी त्यांचा ६० वा वाढदिवस होता आणि ते तो सेलिब्रेट करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले हाेते. तिथं नेमकं काय झालं, हे सांगणाराच तो व्हिडिओ आहे. (Surprise visit of a daughter on the 60th birthday of her father)

 

majicallynews या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं दिसत आहे एक गृहस्थ वाढदिवस साजरा करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेलेले आहेत. तिथे त्यांच्यासोबत आणखी कोणीतरी आहे.

 

आरामात टीव्ही पाहत बसा, तरी होईल सुटलेलं पोट कमी! कसं? - करा फक्त १ सोपी गोष्ट

ते जेवायला सुरुवात करणार ताेच त्यांच्या मागून त्यांची लेक येते. वाढदिवसाला आपली मुलगीही येत आहे, याची त्यांनी अजिबात कल्पना नव्हती. ती आली आणि तिने मागून त्यांना अलगद मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिला अचानक असं समोर आलेलं पाहून काकांना सुखद धक्काच बसला. क्षणभर ते आवाक झाले आणि पुढच्याच क्षणी मात्र त्यांना त्यांचे आनंदाश्रू आवरणं कठीण झालं. 

 

त्यानंतर वडिलांनी मोठ्या प्रेमाने लेकीला जवळ घेतलं. बाप- लेकीची ही इमोशनल भेट नेटिझन्सला खूपच भावून गेली.

साडी अंगावर खूप फुगलेली दिसते- निऱ्या घालताना गोंधळ होतो, १ सोपी ट्रिक- दिसाल स्मार्ट- आकर्षक 

तो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून तो पाहून अनेक पित्यांना त्यांच्या लेकीची तर लेकींना त्यांच्या वडिलांची आठवण आली. पालकांचं प्रेम कसं असतं आणि वय वाढत जातं तसे ते किती इमोशनल होत जातात, हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ एकदा बघाच. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल फोटोज्