Join us

पत्रकाराच्या प्रश्नावर सनीचे भन्नाट उत्तर, "तुम्ही माझी चेष्टा करता", म्हणत फटकारले..पहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2022 13:02 IST

Sunny Leone सनीने नुकतंच पापाराझींसमोर पोझ दिली, तिथे उपस्थित असलेल्या पत्रकाराला दिले भन्नाट उत्तर, व्हिडिओ व्हायरल

ग्लॅमरस - हॉट अभिनेत्री सनी लिओनी तिच्या क्यूट आणि हटके अदांसाठी ओळखली जाते. ती बी टाऊनमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी मुलांसोबत तर कधी पती डॅनियलसोबत ती सार्वजनिक ठिकाणी दिसते. ती प्रत्येकवेळी  फोटोग्राफर्सना हसत खेळत फोटो देते. आता नुकतंच तिला विमानतळावर पाहण्यात आलं, तेव्हा तिने पत्रकारांसह संवाद साधला. ज्यात तिने पत्रकाराला असे काही उत्तर दिले, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

सनी तिच्या हसत्या खेळत्या स्वभावामुळे फोटोग्राफर्सची आवडती बनली आहे. फोटोग्राफर्सही तिचे फोटो काढण्यासाठी नेहमी सज्ज असतात. तिही मोकळेपणाने संवाद साधते. आता नुकतीच ती विमानतळावर दिसली. तिथला एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.

सनी जेव्हा विमानतळावर पोहोचली तेव्हा पापाराझींनी तिचे फोटो काढायला सुरुवात केली. पण सनी समोर असलेल्या कॅमेर्‍याकडे अजिबात पाहत नव्हती. म्हणून कॅमेरामन म्हणाला, ‘मॅडम तुम्ही इकडे बघतच नाहीत. फोटोग्राफरचं हे बोलणं ऐकताच सनीने आधी खूप प्रेमाने पोज दिली, आणि मग क्यूट अंदाजात म्हणाली, “आता मी तुमच्याकडे बघणार नाही. तुम्ही  माझी चेष्टा करता.” हे बोलून सनी हसू लागते आणि तिथे उपस्थित लोकही हसू लागतात.

सनी पुढच्या वर्षी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक आवर्जून वाट पाहत आहेत.

टॅग्स :सनी लिओनीसोशल व्हायरलमाध्यमे