पश्चिम बंगालमधील नबाद्वीपमध्ये घडलेली घटना माणुसकीला चटका लावणारी आहे. समाजात वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नुकताच हायकोर्टाने भटक्या कुत्र्यांना खाऊ देऊ नका, त्यांना सांभाळू नका असा कठोर आदेश जारी केला होता.(Nabadwip newborn rescue) कुणी या निर्णयाचं समर्थन केलं, तर काहींनी टीका केली. मात्र नबाद्वीपमध्ये घडलेला प्रसंग या सर्व चर्चांना पूर्णपणे वेगळं रूप देऊन गेला आहे. (stray dogs save baby)
स्वरूपनगर रेल कॉलनीत एका घराच्या शौचालयाबाहेर नवजात बाळाला टाकून दिलं गेलं होतं. रात्रीच्या काळोखात, कडाक्याच्या थंडीत ते बाळ असहायपणे रडत होतं. पण त्याच्या भोवती पाच–सहा भटके कुत्रे वर्तुळ करून बसले होते. जणू काही स्वतःची पिल्लं जपावी तसा त्यांनी त्या बाळाला कवच दिलं होतं. जंगली प्राणी किंवा थंडी काहीही त्याच्याजवळ जाऊ नये म्हणून त्यांनी संपूर्ण रात्र जागत पहारा दिला.
५०० रुपयांची मल्टिव्हिटामिन पावडर नको, फक्त १०० रुपयांत घरी करा महिनाभर पुरणारी पावडर, पाहा रेसिपी
तीर्थक्षेत्र मायापूरपासून जवळ असलेल्या या परिसरातील रहिवाशांना पहाटेच्या सुमारास रडण्याचा आवाज येत होता. लोकांना वाटलं की शेजारच्या घरातील बाळ असेल. पण खरी परिस्थिती समोर आली ती राधा भौमिक यांच्या नजरेतून. पहाटे शौचालयात जाताना त्यांनी कुत्र्यांच्या वर्तुळात एक नवजात बालिका पडलेली पाहिली. क्षणभरही घाबरून न जाता राधा यांनी ती मुलगी उचलली आणि मदतीसाठी आवाज दिला.
कुठल्याही पार्टीत मिळेल फुल अटेंशन, दिसाल क्लासी, पाहा ५ ड्रेस- व्हा पार्टी की शान
त्यांची भाची प्रीती भौमिक तात्काळ बाळाला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली. प्राथमिक उपचारांनंतर तिला पुढील निरीक्षणासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सुदैवाने बाळाला गंभीर दुखापत नव्हती. मात्र तिच्या पालकांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिस सर्व दृष्टींनी तपास करत आहेत.
हा प्रसंग मनाला चटका देणारा आहे. ज्या प्राण्यांना आपण दगड मारतो, हुसकावतो. त्या भटक्या कुत्र्यांनीच एका नवजात बाळाचा जीव वाचवला. मग माणुसकी नेमकी कोणात असा प्रश्न देखील उभा राहतो. हायकोर्टाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक विचार करायला लावणारी आहे. समाजासाठी धोका निर्माण करणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, हेही तितकेच खरं. पण त्याचबरोबर ही वस्तुस्थिती विसरून चालणार नाही. प्रेम आणि माया हे रक्ताच्या नात्यांनी बनत नाही. कधी कधी प्राण्यांमध्येही इतकी संवेदना असते की मानवजातही लाजून जाईल.
