Join us  

अयोध्या राम मंदिर: गुजरातमध्ये तयार होतेय सीतामाईसाठी खास साडी- बघा साडीची खासियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2024 4:39 PM

Shriram Temple Ayodhya: २२ जानेवारी रोजी होत असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी सीता मातेला जी खास साडी नेसविणार आहेत, ती साडी खास सुरतमधून पाठविण्यात येणार आहे. (Special saree will be sent from Surat to Ayodhya for Janaki mata)

ठळक मुद्देसीतेसाठी ही खास साडी तर सुरतमध्ये तयार होतेच आहे. पण या सोहळ्यात ज्या महिला सहभागी होणार आहेत, त्यांच्यासाठीही श्रीरामाचे, अयोध्येच्या राम मंदिराचे चित्र असणाऱ्या साड्या प्रिंट करण्यात येत आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Shriram Temple Ayodhya) मोठी जय्यत तयारी सुरू आहे. हा सोहळा जिथे होणार ती अयोध्या नगरी तर मोठ्या धामधुमीत तयार होत आहेच, पण देशभरातही मोठा उत्साह दिसून येत आहे. यानिमित्ताने देशभरात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार असून देशाचं सगळ्यात माेठं कपडा मार्केट असणारं सुरत शहरही त्याला अपवाद नाही. खास या सोहळ्यासाठी राम, सीता, अयोध्येचं मंदिर अशी चित्रे असणाऱ्या हजारो साड्या सुरतमध्ये तयार केल्या जात असून सीतामातेसाठीही एका खास साडीची निर्मिती केली गेली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी सीतेला ही साडी नेसविण्यात येणार असून ती साडी नेमकी असणार कशी याबाबत बऱ्याच भक्तांच्या मनात कुतूहल आहे. (Special saree with the pictures of lord Shriram will be sent from Surat to Ayodhya for Sita mata)

 

ndtv.com यांनी दिलेल्या वृत्तानुसार सुरत येथील कपडा उद्योजक ललित शर्मा यांनी सांगितले की या साडीवर श्रीरामाचे मोठे चित्र प्रिंट करण्यात आलेले

मुरमुऱ्यांच्या ३ चवदार रेसिपी- गॅस वापरण्याचीही गरज नाही, ५ मिनिटांत चवदार स्नॅक्स तयार

असून मंदिराचे सुुंदर डिझाईनही त्यावर प्रिंट करण्यात आलेले आहे. कपडा उद्योजक राकेश जैन यांच्या देखरेखीखाली साडी तयार करण्याचे काम झाले आहे. जर आमच्याकडे आणखी मागणी करण्यात आली तर अयोध्येत जी काही इतर छोटी राम मंदिरे आहेत, त्या सगळ्या मंदिरातील सीतेसाठी आम्ही अशी साडी पाठवू, असेही शर्मा यांनी सांगितले.

 

सीतेसाठी ही खास साडी तर सुरतमध्ये तयार होतेच आहे. पण या सोहळ्यात ज्या महिला सहभागी होणार आहेत,

भेळ आणि पाणीपुरीसाठी करुन ठेवा १ महिना टिकणारी गोड चटणी, हवं तेव्हा खा पाणीपुरी

त्यांच्यासाठीही श्रीरामाचे, अयोध्येच्या राम मंदिराचे चित्र असणाऱ्या साड्या प्रिंट करण्यात येत आहे. अशा हजारो साड्यांची निर्मिती सुरतला होत असून त्या भाविकांनी अयोध्यतील दुकानांमध्ये तसेच भारतातील इतर शहरांच्या कपडा बाजारात पाठविण्यात येणार आहेत. 

 

टॅग्स :अयोध्यासाडी नेसणेसोशल व्हायरलगुजरातसूरत