Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > "नको रे बाबा"...हॉटेलमध्ये एकटे बसायची भीती वाटते? हा ‘सोलो डायनिंग फोबिया’ म्हणजे आहे तरी काय...

"नको रे बाबा"...हॉटेलमध्ये एकटे बसायची भीती वाटते? हा ‘सोलो डायनिंग फोबिया’ म्हणजे आहे तरी काय...

solo dining anxiety why it feels like everyone is watching you : why does solo dining feel uncomfortable : why eating alone in public feels awkward : एकटे हॉटेलमध्ये जाण्याची ही भीती नेमकी का वाटते आणि त्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2025 14:23 IST2025-12-20T14:05:44+5:302025-12-20T14:23:57+5:30

solo dining anxiety why it feels like everyone is watching you : why does solo dining feel uncomfortable : why eating alone in public feels awkward : एकटे हॉटेलमध्ये जाण्याची ही भीती नेमकी का वाटते आणि त्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी खास टिप्स...

solo dining anxiety why it feels like everyone is watching you why does solo dining feel uncomfortable why eating alone in public feels awkward | "नको रे बाबा"...हॉटेलमध्ये एकटे बसायची भीती वाटते? हा ‘सोलो डायनिंग फोबिया’ म्हणजे आहे तरी काय...

"नको रे बाबा"...हॉटेलमध्ये एकटे बसायची भीती वाटते? हा ‘सोलो डायनिंग फोबिया’ म्हणजे आहे तरी काय...

हॉटेलमध्ये किंवा बाहेर जेवायला जायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मित्र - मैत्रिणी किंवा कुटुंबाचा घोळका येतो. परंतु याउलट कधी आपण एकटे असू किंवा आपल्या सोबत कुणी नसेल तर शक्यतो आपण हॉटेलमध्ये जाणे टाळतोच किंवा जातच नाही. पण कधी विचार केलाय का, की आपल्याला स्वतःला एकट्यानेच हॉटेलमध्ये जाऊन जेवायची भीती का वाटते? 'मी एकटा बसलोय तर लोक माझ्याकडे बघून काय विचार करतील?' किंवा 'सगळे मला जज तर करत नाहीत ना?' हा प्रश्न मनात आला की अनेकजण हॉटेलच्या दारातूनच मागे फिरतात. हॉटेलमध्ये एकटं बसल्यावर आजूबाजूच्या नजरा आपल्याला टोचू लागतात(solo dining anxiety why it feels like everyone is watching you).

जेव्हा आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये एकटे जातो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की सर्वांचे लक्ष फक्त आपल्यावरच आहे. रिकामी खुर्ची आणि समोरची व्यक्ती नसणे हे अनेकांसाठी अस्वस्थ करणारं असतं. एकटे जेवताना येणारा तो संकोच, आजूबाजूच्या टेबलवरून होणारी कुजबुज आणि स्वतःच्याच विचारात अडकून पडण्याची भीती... हे नक्की का होतं? यामागे कोणती (why does solo dining feel uncomfortable) मानसिक कारणं आहेत किंवा एकटे हॉटेलमध्ये जाण्याची ही ( why eating alone in public feels awkward) भीती नेमकी का वाटते आणि त्यातून बाहेर कसं पडायचं ते पाहूयात. 

'सोलो डायनिंग फोबिया' म्हणजे नेमकं काय ?

'सोलो डायनिंग फोबिया’ म्हणजे सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः हॉटेल, कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये एकटे जेवताना वाटणारी तीव्र भीती, अस्वस्थता किंवा संकोच.  मानसशास्त्रात याला कधीकधी 'सोलोमोफोबिया' (Solomophobia) असेही म्हटले जाते. ही भीती प्रामुख्याने लोक आपल्याकडे पाहत आहेत, आपल्याबद्दल काहीतरी मत तयार करत आहेत किंवा एकटे बसलेले विचित्र वाटेल अशा विचारांमुळे निर्माण होते.

नवरा की बायको? भांडणाला आधी सुरुवात कोण करतं... रिसर्च सांगतो 'या' एका कारणामुळे सुरू होतं भांडण...

नातीचेच काय आजीचेही केस दिसतील काळेभोर-चमकदार- ताज्या रसरशीत आवळ्याचं तेल ‘असं’ करा..

या भीतीमागचे मानसशास्त्र काय आहे?

मानसशास्त्रज्ञ या स्थितीला 'स्पॉटलाईट इफेक्ट' (Spotlight Effect) असे म्हणतात. ही एक अशी मानसिक स्थिती आहे, जिथे आपल्याला असे वाटते की आपण एकटेच एखाद्या खूप गर्दी असलेल्या ठिकाणी उभे आहोत आणि सगळ्यांचे लक्ष आपल्यावरच केंद्रीत आहे. आपल्याला असा भास होतो की आपली प्रत्येक हालचाल, आपले एकटे बसणे आणि आपली जेवण्याची पद्धत, याकडे आजूबाजूचे सर्व लोक बारकाईने लक्ष देत आहेत आणि आपल्याला 'जज' करत आहेत. पण खरी वस्तुस्थिती याच्या अगदी उलट असते. हॉटेलमधील इतर लोक त्यांच्या जेवणात आणि आपापसातील गप्पांमध्ये इतके मग्न असतात की, तुम्ही तिथे एकटे बसला आहात की कोणासोबत, याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. थोडक्यात, आपण जितका विचार करतो तितके कोणाचेच आपल्याकडे लक्ष नसते.

सामाजिक दबाव आणि आपली विचारसरणी

लहानपणापासूनच आपल्यावर असे संस्कार केले जातात की, जेवण ही एक 'सामाजिक क्रिया' आहे. सण असो वा पार्टी, आपण नेहमीच आपल्या माणसांच्या घोळक्यात जेवतो. त्यामुळेच जेव्हा आपण कोणाला तरी एकटं जेवताना पाहतो, तेव्हा आपलं मन त्याचा संबंध 'एकटेपणा' किंवा 'दुःखी', 'उदासवाणा' असण्याशी जोडतो. आपल्याला सतत हीच धास्ती वाटते की, जर मी हॉटेलमध्ये एकटा बसलो, तर लोक मला 'बिचारा' किंवा 'दुःखी' समजतील. आपण स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या मतांना अधिक महत्त्व देऊ लागतो. कोणासोबत तरी असणं म्हणजे 'आनंदी असणं' आणि एकटं असणं म्हणजे 'बिचारं असणं' ही आपली विचारसरणीच आपल्याला स्वतःच्या सोबतीचा आनंद घेण्यापासून रोखते.

 

एकट्याने स्वतःच्याच सोबतीने जेवणे हीच तर खरीखुरी सुपरपावर... 

एकट्याने जेवण्याची एक वेगळीच मजा असते. ना कोणाशी बोलण्याची सक्ती, ना जेवण शेअर करण्याची कटकट आणि समोरचा माणूस कधी जेवण संपवेल याची चिंताही नाही. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन एकटेच जेवतो, तेव्हा त्याला आपला एकटेपणा न समजता स्वतःसोबतची डेट म्हणून पाहा. स्वतःच्या विचारांना समजून घेण्यासाठी, स्वतःला वेळ देण्यासाठी आणि कोणत्याही गोंधळाशिवाय अन्नाच्या खऱ्या चवीचा आनंद घेण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे. कोणाच्याही आधाराशिवाय शांतपणे स्वतःच्या सोबतीत सार्वजनिक ठिकाणी वावरणे, ही तुमच्या आत्मविश्वासाची मोठी ओळख आहे, तुमच्या कमकुवतपणाची नाही. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची सोबत आवडू लागेल, त्या दिवशी तुम्हाला हॉटेलमधील रिकाम्या खुर्चीची भीती वाटणार नाही, उलट त्या शांततेचा तुम्ही आनंद घ्याल.

या भीतीवर कशी मात करावी?

१. सुरुवात कॉफी शॉपपासून करा :- मोठ्या रेस्टॉरंटऐवजी सुरुवातीला एखाद्या कॅफेमध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये एकटे जा, जिथे लोक सहसा लॅपटॉपवर काम करत किंवा पुस्तक वाचत एकटे बसलेले असतात.

२. पुस्तक सोबत ठेवा :- मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा एखादे पुस्तक किंवा मॅगझिन वाचल्याने तुमचे लक्ष विचलित होते आणि तुम्हाला कमी अस्वस्थ वाटते.

३. पीक अवर्स टाळा :- खूप गर्दीच्या वेळी जाण्याऐवजी, जेव्हा गर्दी कमी असेल अशा वेळी जा. यामुळे तुम्हाला शांतपणे जागा मिळेल आणि लोकांचे लक्ष कमी असेल, त्यामुळे तुम्हांला संकोचल्यासारखे होणार नाही किंवा एकटेपणाची भावना येणार नाही. 

४. स्वतःच्या सोबतीचा आनंद घ्या :- एकटेच बाहेर जेवायला जाणे ही स्वतःच स्वतःला दिलेली एक 'ट्रीट' आहे. तुम्ही स्वतःचे सर्वोत्तम मित्र आहात ही भावना जोपासा.

हळूहळू तुम्हाला जाणीव होईल की, ती 'काल्पनिक गर्दी' जी तुम्हाला जज करत होती, ती प्रत्यक्षात तिथे नव्हतीच. ज्या दिवशी तुम्ही कोणाच्याही आधाराशिवाय शांतपणे बसून स्वतःच्या जेवणाचा आनंद घ्यायला शिकाल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने या भीतीतून मुक्त व्हाल.

Web Title : अकेले भोजन का डर: सार्वजनिक रूप से अकेले खाने के डर को समझना

Web Summary : अकेले भोजन का डर निर्णय और स्पॉटलाइट प्रभाव के डर से उपजा है। इसे छोटे से शुरू करके, एकांत का आनंद लेकर और आत्म-मूल्य को पहचानकर दूर करें। स्वतंत्र भोजन को अपनाएं!

Web Title : Solo Dining Phobia: Understanding the Fear of Eating Alone in Public

Web Summary : Solo dining phobia stems from fear of judgment and spotlight effect. Overcome it by starting small, enjoying solitude, and recognizing self-worth. Embrace independent dining!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.