Sofa Cleaning: सोफा हा घराच्या हॉलची शान असतो, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. साफ आणि सुंदर सोफा हॉलचा नजाराच बदलून टाकतो. सोफ्याचा वापर रोज बसण्यासाठी, झोपण्यासाठी सतत केला जातो. इतकंच काय लहान मुले त्यावर खेळतात, जेवतात सुद्धा. ज्यामुळे सोफा लवकर मळकट होतो. त्यावर डाग लागतात. अशात चांगला सोफाही जुना दिसू लागतो. अनेकदा साफ करूनही सोफा हवा तसा स्वच्छ होत नाही. पण आपल्याला हे माहीत नसेल की, किचनमध्ये ठेवलेल्या काही गोष्टींच्या मदतीने घरातील मळकट झालेला, डाग पडलेला सोफा पुन्हा नव्यासारखा चमकदार करू शकता. असेच काही घरगुती उपाय आपण पाहणार आहोत.
बेकिंग सोडा
सोफ्यातून येणारी ओलसरपणाची किंवा घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उपयोगी ठरतो. यासाठी संपूर्ण सोफ्यावर बेकिंग सोडा शिंपडा आणि किमान 20 मिनिटं तसाच राहू द्या. तो केवळ डाग शोषून घेत नाही, तर जंतुनाशक म्हणूनही काम करतो. नंतर व्हॅक्यूम क्लिनरने किंवा कोरड्या कपड्याने सोडा काढून टाका. यामुळे सोफ्याचा रंग अधिक स्वच्छ आणि ताजातवाना दिसू लागतो.
व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण
सोफ्यावर चहा, कॉफी किंवा खाण्याचे हट्टी डाग पडले असतील, तर ते काढण्यासाठी स्प्रे बॉटलमध्ये अर्धा कप व्हाईट व्हिनेगर, एक कप कोमट पाणी आणि एक चमचा लिक्विड साबण मिसळा. हे मिश्रण डागांवर स्प्रे करा आणि मऊ कापडाने हलक्या हाताने पुसा. व्हिनेगरमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात, जे सोफ्याच्या फॅब्रिकला नुकसान न करता स्वच्छ करतात.
व्हॅक्यूमिंग आणि डस्टिंग
सोफ्याची साफसफाई कोणत्याही लिक्विड क्लिनरने करण्यापूर्वी त्यावरील कोरडी धूळ काढणे खूप गरजेचे असते. सोफ्याच्या कुशनमधल्या फटींमध्ये बिस्किटांचे कण, केस आणि धूळ साचलेली असते. ही घाण काढण्यासाठी चांगला व्हॅक्यूम क्लिनर किंवा ब्रश अटॅचमेंटचा वापर करावा. जर व्हॅक्यूम क्लिनर नसेल, तर जाड सुती कापडाने सोफा नीट पुसून घ्या. हा स्टेप महत्त्वाचा आहे, कारण ओल्या साफसफाईदरम्यान कोरडी धूळ चिखल बनून सोफा आणखी मळकट होऊ शकतो.
Web Summary : Easily clean sofa stains using baking soda, vinegar solution, and vacuuming. Remove odors and stubborn spots for a fresh, clean sofa.
Web Summary : बेकिंग सोडा, सिरका घोल और वैक्यूमिंग का उपयोग करके सोफे के दागों को आसानी से साफ करें। ताज़ा, साफ सोफे के लिए दुर्गंध और जिद्दी धब्बे हटाएं।