Join us

Social Viral : बाबौ! स्तनपान करताना अचानक गुलाबी रंगाचं दूध बाहेर आलं; महिलेनं शेअर केला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 18:32 IST

Social Viral : ती महिला आपल्या बाळाला ६ महिन्यांपासून स्तनपान करत होती.  अचानक दूध पाजत असताना तिनं आपल्या दुधाच्या रंगात बदलेला पाहिला आणि खूप घाबरली.

बाळाला स्तनपान करणं हा प्रत्येक स्त्रीसाठी खास अनुभव असतो. ६ महिन्यांपासून आपल्या बाळाला स्तनपान करत असलेल्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहिल्यांदाच आई झालेल्या या महिलेनं आपल्या दुधाचा रंग गुलाबी झालेला पाहिला आणि आश्चर्यचकीत झाली. आता या महिलेला आपल्या बाळाला दूध पाजायला खूप भीती वाटते. (Mother panics after her breast milk turns pink)

जो जॉनसन ओवरबी नावाची महिला आपल्या बाळाला ६ महिन्यांपासून स्तनपान करत होती.  अचानक दूध पाजत असताना तिनं आपल्या दुधाच्या रंगात बदलेला पाहिला आणि खूप घाबरली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये महिलेनं सांगितलं की,'' कोणीच मला हे सांगितलं नव्हतं की, मला बाळ होणार आहे आणि मी त्याला स्तनपान करेल तेव्हा माझ्या दुधाच्या रंगात बदल होईल.'' आता पर्यंत १ कोटी  २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोत २ पिशव्या दिसत आहेत. एकात पांढरं तर दुसऱ्या पिशवीत गुलाबी रंगाचं दूध आहे. ती महिला हे स्टॉबेरी दूध असल्याचं म्हणते. फोटो व्हायरल होताच अनेकांनी दुधाचा रंग गुलाबी का झालाय? असा प्रश्न त्या महिलेला विचारला आहे  तर काहींनी शरीरात रक्ताचं प्रमाण जास्त असल्यानं दुधाचा रंग गुलाबी झाल्याचं म्हटलंय.

''मैं शादी के खिलाफ नहीं थी'', समोर आलं मलालानं लग्नाचा विचार बदलण्याचं कारण

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका वेबसाईटनं सांगितलं की, आईचं दूध गुलाबी होणं हे दुधात रक्त मिसळल्याचे संकेत आहेत. तसंच काही दिवसांनी असं दूध का बाहेर आलं याचा खुलासा व्हायला हवा. असं म्हटलंय तर  अनेकांनी या महिलेनं बाळाला दूध पाजणं थांबवू नये असा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्तनांची काळजीमहिला