Lokmat Sakhi >Social Viral > आजोबा पडले ‘एआय’च्या प्रेमात, घटस्फोटच हवा म्हणून बसले अडून, शेवटी..

आजोबा पडले ‘एआय’च्या प्रेमात, घटस्फोटच हवा म्हणून बसले अडून, शेवटी..

social viral, Grandpa fell in love with 'AI', wanted a divorce, he never knew what he was doing : आजोबा दिवसरात्र गप्पा मारत होते ऑनलाइन. पाहा पुढे काय घडले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 15:29 IST2025-08-19T15:27:41+5:302025-08-19T15:29:23+5:30

social viral, Grandpa fell in love with 'AI', wanted a divorce, he never knew what he was doing : आजोबा दिवसरात्र गप्पा मारत होते ऑनलाइन. पाहा पुढे काय घडले.

social viral, Grandpa fell in love with 'AI', wanted a divorce, he never knew what he was doing | आजोबा पडले ‘एआय’च्या प्रेमात, घटस्फोटच हवा म्हणून बसले अडून, शेवटी..

आजोबा पडले ‘एआय’च्या प्रेमात, घटस्फोटच हवा म्हणून बसले अडून, शेवटी..

प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि ते कधीही कोणासोबतही होऊ शकतं. त्याला ना जातीची मर्यादा ना धर्माची, हा झाला जुना काळ. त्यानंतर LGBTQ सारख्या चळवळी सुरु झाल्या आज जगभरातून या विषयावर लोक बिनधास्त आवाज उठवताना दिसतात. (social viral, Grandpa fell in love with 'AI', wanted a divorce, he never knew what he was doing )आजही लोकं जात-धर्म-प्रेमाच्या नव्या व्याख्या पचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आणखी एक वेगळाच प्रकार समोर यायला लागला तो म्हणजे लोकांना AI शी 'इमोशनल अटॅचमेण्ट' व्हायला लागली. अशा अनेक बातम्या आणि किस्से तुम्हीही ऐकले असतील. ऑनलाईन सिस्टिम जसे की, 'ॲलेक्सा' असेल किंवा 'सिरी' लोकं त्यांच्याशी तासंतास गप्पा मारतात. टेक्नॉलॉजी फार प्रभावी आणि प्रगल्भ होत चालली आहे. माणसं त्याच्या आहारी जातात. समोरचे मशीन एका सजीव व्यक्ती प्रमाणे वाटायला लागते. अशा अनेक घटना घडत आहेत त्यापैकीच एक चीनमध्ये घडलेली घटना म्हणजे कहरच.  

चीनमधील ७५ वर्षाचे जिआंग नावाचे आजोबा अख्खा दिवस त्याच्या मोबाइलला चिकटून असायचे. सतत कोणाशी तरी बोलत असायचे. आजकाल ऑनलाइन गप्पा मारण्यासाठी समोर कोणी असायलाच हवे असे नाही AI chatbot च्या माध्यमातून काल्पनिक व्यक्तीशी गप्पा मारता येतात. त्याचप्रमाणे जिआंगही एका ऑनलाइन काल्पनिक पात्राशी दिवसरात्र बोलत असायचा. स्वतःच्या बायकोशी एकही शब्द बोलणे सोडून दिले. AI आपल्या आज्ञेनुसार काम करते. तुम्ही जे बोलायला सांगाल अगदी तेच ते बोलते. त्यामुळे अनेक लोकांना या मार्गाने भावना व्यक्त करणे जास्त सोपे वाटायला लागले आहे. आपल्याशी प्रेमाच्या अशा गप्पा मारणारी तरुणी खरीच आहे असे आजोबांना वाटत होते. ऑनलाइन दिसणारा सुंदर फोटो पाहून ते भारावून गेले होते. बायकोवरचे प्रेम या नादात ओसरले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 

नक्की काय झाले म्हणून त्यांच्या मुलांनी मध्यस्थी केली असता नक्की काय प्रकार घडला ते त्यांच्या लक्षात आले. ज्या मुलीसोबत संसार थाटण्याच्या विचार आजोबा करत आहेत जिच्यासाठी आजींना घटस्फोट द्यायला तयार झाले ती मुलगी फक्त एक सिस्टिम आहे व्यक्ती नाही याची जाणीव मुलांनी आजोबांना करुन दिली तरी त्यांना नक्की काय प्रकार आहे आणि आपण कोणाशी बोलत होतो याचा थांगपत्ता लागला नाही. एका ऑनलाइन सिस्टीमच्या प्रेमात सजीव व्यक्ती पडते म्हणजे या सगळ्या सोयींचा किती जास्त पटीने वापर केला जातो याला काही मर्यादाच उरलेली नाही. 

Web Title: social viral, Grandpa fell in love with 'AI', wanted a divorce, he never knew what he was doing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.