Join us  

बघता बघता आईस्क्रिम उडून गेलं भुर्रर्र, बघा आईस्क्रिम खाताना कशी भलतीच झाली गंमत, व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2022 1:01 PM

Viral Funny Video: हा अनुभव आपल्यापैकी काही जणांनी निश्चितच घेतला असणार. एकदा बघाच त्या मुलीसोबत नेमकी काय गंमत झाली ते.. 

ठळक मुद्दे सध्या ट्रेण्डिंग असणारा हा व्हिडिओ एकदा बघायलाच हवा. तिच्यासोबत झालेला हा प्रकार पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. 

एक तरुण मुलगी  मस्तपैकी आईस्क्रिम खाते आहे, अवघे दोनच घास तिने घेतले आणि नंतर जे झालं ते पाहून ती जाम घाबरली. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर (viral video on social media) सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. ती तरुणी घाबरली आहे, पण जे काही झालं, त्यानंतर मात्र तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून बघणाऱ्याला चांगलंच हसू येतं. त्यामुळे सध्या ट्रेण्डिंग असणारा हा व्हिडिओ (trendiang video of a girl and eagle) एकदा बघायलाच हवा. 

 

आपल्याकडे अशी अनेक ठिकाणं, पर्यटनस्थळं आहेत, जिथं माकडांची संख्या खूप आहे. या ठिकाणी गेल्यावर आपण आपली प्रत्येक वस्तू माकडांपासून सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. कारण कधी माकड येईल आणि आपली कोणती वस्तू घेऊन जाईल, हे सांगताच येत नाही.

पाणीपुरी नेहमीच खाता, ही गारेगार बर्फपुरी पाहिली का? पाहा भलताच अचाट पुरीप्रयोग

अशावेळी आपल्या हातात जर काही खाद्य पदार्थ असले, तर झडप घालून माकडांनी ते नेलेच म्हणून समजा. आपल्या लक्षातही येत नाही, इतक्या चटकन हे सगळं होऊन जातं. असंच काहीसं झालं आहे या विदेशी तरुणीसोबत.

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एक तरुणी रस्त्यावर एका मोकळ्या ठिकाणी उभी आहे. तिने नुकतीच आईसकॅण्डी घेतली असून तिने ती फोडली. त्याचा अवघा एकच घास खाल्ला. पुन्हा दुसरा घास घेणार एवढ्यात आकाशातून एका पक्ष्याने तिच्याकडे झेप घेतली आणि अवघ्या काही सेकंदात तिच्या हातातली कॅण्डी घेऊन तो पुन्हा भुर्रकन उडून गेला.

अविवाहित तरुण मुली एकांतात गुगलवर काय शोधतात? गुगलनेच सांगितले सर्च की वर्ड..

अवघ्या एक- दोन सेकंदात तिच्यासाेबत जे काही झालं, त्यामुळे ती चांगलीच घाबरली आणि ओरडली. हातातली आईस कॅण्डी गेली कुठे हेच तिला समजेना.. तिच्यासोबत झालेला हा प्रकार पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया