Lokmat Sakhi >Social Viral > सोशल मीडियाचा ट्रेंड पडला भारी! 'डस्टिंग चॅलेज' पूर्ण करण्याच्या नादात गमावला जीव, काय आहे हा ट्रेंड?

सोशल मीडियाचा ट्रेंड पडला भारी! 'डस्टिंग चॅलेज' पूर्ण करण्याच्या नादात गमावला जीव, काय आहे हा ट्रेंड?

Dusting challenge death 19‑year‑old US: Viral dusting challenge explained: आपली मुले सोशल मीडियाच्या आहारी तर जात नाही ना? पालकांनी वेळीच काळजी घ्या, अन्यथा गमवावा लागेल जीव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2025 16:49 IST2025-06-08T16:49:19+5:302025-06-08T16:49:54+5:30

Dusting challenge death 19‑year‑old US: Viral dusting challenge explained: आपली मुले सोशल मीडियाच्या आहारी तर जात नाही ना? पालकांनी वेळीच काळजी घ्या, अन्यथा गमवावा लागेल जीव...

social media viral trend huge us girl 19 dies trying viral dusting challenge what is this trend? | सोशल मीडियाचा ट्रेंड पडला भारी! 'डस्टिंग चॅलेज' पूर्ण करण्याच्या नादात गमावला जीव, काय आहे हा ट्रेंड?

सोशल मीडियाचा ट्रेंड पडला भारी! 'डस्टिंग चॅलेज' पूर्ण करण्याच्या नादात गमावला जीव, काय आहे हा ट्रेंड?

सोशल मीडियावर सतत काहींना काही व्हायरल होत असते. काही व्ह्यूज आणि लाईक्ससाठी सोशल मीडिया इन्फ्लूंसर ट्रेंड फॉलो देखील करत असतात.(Dusting chroming huffing danger) अशातच अनेकदा हे ट्रेंड जीवावर बेतण्याची शक्यता देखील असते. असाच एक ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्याचे नाव डस्टिंग. (social media dusting trend)
डस्टिंग नावाच्या या प्राणघातक सोशल मीडिया ट्रेंडमध्ये सहभागी झाल्यानंतर रविवारी अमेरिकेतली १९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.(What is the dusting challenge) द इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार ऑरिझोना येथील रेना ओ'रोर्केचा चार दिवस आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर मृत्यू झाला.(Dusting challenge social media danger) तिच्या पालकांनी सांगितले की, तिने आणि तिच्या प्रियकराने त्यांच्या नकळत एरोसोल कीबोर्ड क्लीनर ऑर्डर केला. कीबोर्ड क्लीनरचा वास घेतल्यानंतर तिला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर ती आठवडाभर आयसीयूमध्ये होते आणि काही काळानंतर तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले.(Huffing aerosol sprays trend) तिचे वडील म्हणाले माझी मुलगी सतत म्हणायची, बाबा मी प्रसिद्ध होणार आहे. फक्त तुम्ही बघाच आणि दुर्देवाने तिला प्राण गमवावे लागले. 

खणाच्या साडीची ‘अशी’ घाला घडी, कपाटातला साड्यांचा ढिग कोसळणार नाही, कायम दिसेल आवरलेल

डस्टिंग व्हायरल ट्रेंड काय? 

डस्टिंग ज्याला क्रोमिंग किंवा हफिंग असेही म्हटले जाते. हा एक व्हायरल ट्रेंड आहे. ज्यामध्ये घरगुती स्वच्छता कामगारांना ऑनलाइन व्ह्यूजसाठी याचा वास घ्यावा लागतो. परंतु, क्षणिक आनंदासाठी आपला जीव गुदरमरु लागतो किंवा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आपल्याला प्राण गमवावे लागते. 

क्लिनिंग स्प्रेचा वास घेतल्याने रेनाला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. तिची आई म्हणते की, हा स्प्रे खरेदी करण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज लागत नाही. तो गंधहीन आहे, मुले जे काही बघतात त्याप्रमाणे वागायला लागतात. आई-वडिलांना याची जरा देखील कल्पना नसते. 

रेनाचे वडिल म्हणतात की, माझ्या मुलीला गाण्याची खूप आवड होती. तिच्या हास्याने आणि चुलबूल वागण्यामुळे घरातील प्रत्येक खोली ही उजळून निघायची. ती गेल्यानंतर तिचे पालक या हफिंगच्या ट्रेंडबद्दल जनजागृती करत आहेत. ते पालकांना सांगताय की, आपली मुले नेमकं काय पाहतात आणि कशाप्रकारे त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो याकडे लक्ष द्या. आम्ही आमच्या मुलीला वाचवू शकलो नाही पण तुम्ही निदान तुमच्या मुलांना वाचवू शकता. तिच्या वडीलांन GoFundMe नावाचे पेज सुरु केले आहे, ज्यामार्फत वैद्यकीय बिल आणि इतर उपचारांचा खर्च करता येईल. तसेच डस्टिंग आणि कीबोर्ड क्लिनरसारख्या श्वास घेण्याच्या पद्धतीच्या धोक्यांबद्दल देखील सांगितले. या ट्रेंड वर्षानुवर्षे सुरु आहे. मागच्या वर्षी देखील ११ वर्षाच्या मुलाचा सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंडमुळे जीव गेला. 

Web Title: social media viral trend huge us girl 19 dies trying viral dusting challenge what is this trend?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.