Join us  

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना 'फुलगोभी मंचुरियन' आवडते? ढाब्यावाल्याने लढवली शक्कल; इराणी म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 6:58 PM

Smriti Irani Shares Her Gobi Manchurian Story : केंद्रीय मंत्री स्मृती इराणींमुळे ढाब्यावाल्याचा झाला फायदा, पाहा त्याची मार्केटिंग टेक्निक..

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची एक पोस्ट सध्या व्हायरल आहे. त्या खाण्यापिण्याच्या शौकिन आहेत. पण सध्या सोशल मिडीयावर स्मृती इराणी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत, आणि कारण काय तर 'फुलगोभी मंचुरियन' (Gobi Manchurian). आता तुम्ही म्हणाल फुलगोभी मंचुरियन आणि स्मृती इराणी यांचा संबंध काय?

एकेकाळचा हा भन्नाट किस्सा स्मृती इराणी यांनी कर्ली टेल्स या युट्युब चॅनेलला शेअर केला आहे. ज्यात त्यांनी स्मृती इराणींना फुलगोभी मंचुरियन आवडते, ही बातमी कशी रातोरात पसरली? याचा फायदा ढाबावाल्याला कसा झाला? त्यांनी फुलगोभी मंचुरियनची मार्केटिंग कशी केली? पाहूयात(Smriti Irani Shares Her Gobi Manchurian Story).

फुलगोभी मंचुरियनचा भन्नाट किस्सा

स्मृती इराणी यांनी अमेठीतील प्रसिद्ध ढाब्याची 'फुलगोभी मंचुरियन' संबंधित एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. अमेठीमध्ये ज्याठिकाणी त्या राहत होत्या, त्याठिकाणी अलोक नावाचा एक ढाबा होता. त्या ठिकाणी मंत्री स्मृती इराणी आणि त्यांचे सहकारी एकत्र काम करायचे. एकेदिवशी स्मृती इराणी यांनी प्रेससोबत ढाब्याला भेट दिली.

सकाळी कोमट पाण्यात मिसळून २ गोष्टी प्या, वजन घटेल भरभर- पोटही होईल सपाट

तेव्हा टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार रोहन दुवा यांनी ढाबा मालकाची भेट घेऊन स्वतःची ओळख सांगितली. तेव्हा ढाबा मालकाने पत्रकाराला स्मृती इराणींना खायला काय आवडते? असा प्रश्न विचरला. तेव्हा पत्रकाराने 'फुलगोभी मंचुरियन' असे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सगळीकडे ही बातमी पसरली, की स्मृती इराणींना 'फुलगोभी मंचुरियन' खायला आवडते. आणि तेव्हापासून प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये स्मृती यांना 'फुलगोभी मंचुरियन' दिले जाते.

टिपिकल गुजराथी पद्धतीचा पारंपरिक खमण ढोकळा खायचाय? करा फक्त १५ मिनिटांत, पाहा रेसिपी

बातमी पसरल्यानंतर, स्मृती यांनी ढाबा मालकाची खुद्द जाऊन भेट घेतली. तेव्हा त्यांनी मालकाला, 'मी फुलगोभी मंचुरियन कुठे खाते?' असा प्रश्न विचारला. तेव्हा ढाब्यावाल्याने उत्तर देताना, 'नाही दीदी, आम्ही नवीन डिश तयार केली आहे. त्यामुळे याची प्राईजही जास्त ठेवली आहे. या पदार्थाची मार्केटिंग व्हावी, म्हणून आम्ही सांगितले, की स्मृती इराणी या 'फुलगोभी मंचुरियन' आवडीने खातात.' तेव्हापासून स्मृती इराणींना प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये 'फुलगोभी मंचुरियन' दिले जाते.'

टॅग्स :स्मृती इराणीसोशल व्हायरलसोशल मीडिया