घरात जर माशा - डास सतत घोंगावत असतील तर ते कुणालाही आवडत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत, या ऋतूंत विशेषतः घरात माशा - डास येतात. घरात माशा - डास यांचे प्रमाण वाढले (Smell Of This Plant Will Keep Mosquitoes & Flies Away Use It For Cleaning) की त्यांच्या त्रासाने नकोसे वाटते. उन्हाळ्यात अशा प्रकारच्या माशा - डास सतत घरात वावरत असतील तर त्यांच्यामुळे घरात आजारपण येऊ शकते. घरातील (What plant keeps mosquitoes and flies away) माशा - डासांचे प्रमाण असेच सतत वाढत राहिले तर, डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, फूड पॉयझनिंग यांसारख्या गंभीर आजारांची समस्या सतावते. यासाठीच, घरांतील माशा - डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे महागडे क्लिनर्स, फिनाईल विकत आणून त्यांचा वापर करतो( Plants That Repel Bugs & Mosquitoes Naturally).
घरातील फरशी पुसून स्वच्छ ठेवण्यासाठी आपण पाण्यांत महागडे क्लिनर्स, फिनाईल घालतो. परंतु काहीवेळा याचाही काहीच फायदा होत नाही. अशावेळी तुमच्या बागेतील कुंड्यांमधील दोन रोपांची पानं करतील जादू... ही पानं तोडून पाण्यांत घातल्यास आणि या पाण्याने फरशी पुसल्यास घरातील माशा - डासांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. ही दोन रोपं नेमकी कोणती हे पाहूयात...
फरशी पुसताना पाण्यात टाका 'ही' २ पानं...
१. लेमनग्रास :- काही अशी रोपं असतात ज्यांच्या पानांमध्ये माशा - डास मारण्यासाठीचे विशेष गुणधर्म असतात, यापैकी लेमनग्रास हे एक रोपं. आत्तापर्यंत आपण लेमनग्रासची पानं चहात घालून त्याचा स्वाद वाढवण्यात येतो हे ऐकले असेल. परंतु घरातील डास - माशांचा वावर कमी करण्यासाठी देखील या रोपांची पानं वापरणे फायदेशीर ठरते. यासाठी, एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लेमनग्रासची ३ ते ४ पानं घालून हे पाणी व्यवस्थित उकळवून घ्यावे. त्यानंतर फरशी पुसण्याच्या पाण्यांत हे पाणी ओतावे, आणि या पाण्याने फरशी स्वच्छ पुसून घ्यावी. या उपायामुळे घरातील माशा आणि डास यांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. यासोबतच, लेमनग्रासच्या पानांचा हलका, मनमोहक सुगंध घरातील वातावरण देखील प्रसन्न ठेवण्यास फायदेशीर ठरतो. फरशी पुसताना त्या पाण्यात आपण लेमनग्रास ऑईलचे काही थेंब देखील घालू शकतो, यामुळे माशा आणि डास घरात फिरकत देखील नाहीत. इतकेच नाही तर घरात एक लेमनग्रासचे रोप लावल्यास देखील घरातील माशा आणि डास यांचा वावर कमी होण्यास मदत होते.
किचन ट्रॉली, फ्रिजमध्ये झुरळांचा सुळसुळाट? करून पाहा खास घरगुती उपाय - झुरळं पळतील घराबाहेर...
२. कडुलिंबाची पाने :- लेमनग्रासच्या पानांप्रमाणेच कडुलिंबाची पाने देखील माशा आणि डासांच्या समस्येवर फारच उपयोगी ठरतात. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्याचे पाणी फरशी पुसताना पाण्यांत ओतले आणि त्या पाण्याने फरशी पुसली तर घरातील माशा - डासांना दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. कडुलिंबाच्या पानांचा उग्र वास आणि त्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तुमच्या घराचे वातावरण स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. विशेष म्हणजे, कडुलिंब आणि लेमनग्रासच्या पानांचा एकत्रित वापर केल्यास, हा एक स्वस्त, प्रभावी आणि कोणतेही दुष्परिणाम न करणारा नैसर्गिक पर्याय ठरतो, जो माशी आणि डास दूर ठेवण्यास उपयुक्त आहे.