खूप जणांचे इअर बड्स, इयर फोन किंवा चार्जिंगसाठी असणाऱ्या पांढऱ्या वायर सुरुवातीचे ३ ते ४ महिने अगदी स्वच्छ असतात. पण नंतर त्यांचा जसा जसा वापर वाढायला लागतो, तशी तशी त्यांच्यावर घाण चढायला लागते. काही दिवसांनी तर त्यांच्यावर धुळीचा चिकट थर जमा होतो आणि ते अगदी कळकट्ट दिसायला लागतात. सर्वांसमोर असे घाण झालेले इअर बड्स, इयर फाेन वापरायलाही मग नकोसे वाटते. शिवाय ते पुन्हा नवे घेणेही शक्य नसते. म्हणूनच आता पुढे सांगितलेले काही सोपे उपाय पाहा आणि इअर बड्स, इअर फोन किंवा चार्जरच्या पांढऱ्या वायर अगदी नव्यासारख्या स्वच्छ करून टाका.(simple tips and tricks to clean dirty ear phone, head phone and charging wire)
काळे पडलेले इअर बड्स, इअर फोन कसे स्वच्छ करायचे?
१. हेड फोन, इअर बड्स यांचा जो भाग आपण कानात घालतो तो देखील हळूहळू काळपट पडून जातो. तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टुथपिकचा वापर करू शकता. टुथपिक वापरून बड्स, हेड फोन्सच्या बारीक छिद्रांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करता येते.
दिवाळीत लक्ष्मीपुजनासाठी आणलेल्या लाह्या खूप उरल्या? करा ३ चवदार पदार्थ- हा हा म्हणता लाह्या संपतील
पण हे काम अतिशय हळूवारपणे करा नाहीतर टुथपिकच्या टोकदारपणामुळे ते खराब होऊ शकतात. त्यानंतर कापसाचा एक बोळा घ्या. तो मीठ घातलेल्या कोमट पाण्यात बुडवून घट्ट पिळून घ्या आणि त्यानंतर त्याने ते स्वच्छ करा. यामुळेे त्या भागावर असणारे बारीक बॅक्टेरियाही निघून जातील.
२. आता वायर असतात किंवा चार्जिंगची जी वायर असते त्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट तयार करा.
विद्या मालवदे सांगते वेटलॉस न होण्याचं मुख्य कारण- तिच्यासारखी फिगर मिळविण्यासाठी दिल्या ३ टिप्स
त्यात दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घाला. ही पेस्ट वायरवर लावून ठेवा. त्यानंतर एखाद्या मिनिटाने ओलसर कपड्याने पुसून घ्या. वायर अगदी नव्यासारख्या स्वच्छ दिसायला लागतील.
