घरात एका जरी उंदराने शिरकाव केला तरी अख्ख्या घराची शांतता भंग पावते. महागडे कपडे कुरतडणे असो किंवा अन्नपदार्थांची नासाडी, उंदरांचा हैदोस सहनशक्तीच्या पलीकडे जातो. इतकंच नाही, तर उंदीर अनेक आजारांचं कारणही ठरू शकतात. त्यामुळे घरात एक जरी उंदीर दिसला तरी लगेच त्यावर उपाय करणं गरजेचं ठरतं. अनेकदा आपण उंदरांना घरातून पळवण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त औषधांचा वापर करतो, पण त्यामुळे लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी काही सोपे, सुरक्षित आणि घरगुती उपाय खूपच फायदेशीर ठरू शकतात. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या मदतीने उंदरांना घरापासून दूर ठेवणं अगदी सहज शक्य आहे. आता प्रश्न असा येतो की त्यांना पळवून कसे लावायचे? कारण बाजारामध्ये जी औषधे मिळतात, त्याने उंदीर थेट मरून पडतात. यामुळे संपूर्ण घरात दुर्गंधी पसरते आणि मग काही लोकांना उंदरांना मारणे देखील आवडत नाही. सर्वात मोठी समस्या तेव्हा येते, जेव्हा हे उंदीर घराच्या कोपऱ्यात मरतात आणि घरभर दुर्गंधी पसरते. हा सर्व मनस्ताप टाळण्यासाठी घरगुती उपायांचा आधार घेणे हा सर्वात उत्तम पर्याय ठरतो(simple home remedy for rat problem in house).
उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी आपण केमिकल स्प्रे किंवा पेस्ट कंट्रोल करतो परंतु याच्या वासाने आपल्यालाच खूप त्रास होतो, तर या उन्हाळ्यात आपण काही नैसर्गिक उपाय करून उंदरांना घरातून बाहेर हकलवू शकतो. घरातील उंदरांच्या त्रासापासून कायमची सुटका हवी असेल, तर काही सहजसोपे घरगुती उपाय जाणून घेणं नक्कीच फायदेशीर ठरेल. इंस्टाग्रामवर योग एक्सपर्ट कैलाश बिश्नोई यांनी एक भन्नाट ट्रिक शेअर केली आहे, ज्यामुळे घरातील (how to get rid of rats naturally) सर्व उंदीर पळून जातील. एक ग्लासवाली ही ट्रिक तुम्ही घरच्याघरीच करू शकता आणि उंदरांना न मारता (simple home remedy for rat problem in house) घराबाहेर पळवून लावू शकता.
फक्त एका ग्लासभर पाण्याने घरातील उंदरांना पळवून लावा...
जर तुम्ही देखील उंदरांच्या त्रासाने हैराण झाला असाल आणि त्यांना न मारता घराबाहेर पळवण्याचा उपाय शोधत असाल, तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवी. उंदरांना न मारता घरातून पळवून लावण्यासाठी आपल्याला १ ग्लास पाणी, २ चमचे पुदिन्याचा रस, २ चमचे व्हिनेगर, १ चमचा लिंबाचा रस इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. एका मोठ्या स्प्रे बॉटलमध्ये १ ग्लास पाणी घेऊन त्यात पुदिन्याचा रस, व्हिनेगर, लिंबाचा रस असं सगळं साहित्य मिसळून स्प्रे तयार करा.
उंदीर असलेल्या जागांवर स्प्रे करा...
घरगुती तयार केलेला स्प्रे अशा प्रत्येक ठिकाणी शिंपडा जिथे उंदरांचा वावर जास्त असतो. विशेषतः किचनचे कोपरे, सिंकच्या खाली, गॅसच्या मागे, स्टोअर रूम आणि खिडकी-दरवाजांच्या जवळ याचा वापर नक्की करा. रात्रीच्या वेळी याचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरते, कारण या वेळी उंदीर जास्त फिरत असतात.
दात पांढरेशुभ्र आणि हिरड्या मजबूत करणारं दंतमंजन, खिशाला परवडणारा घरगुती सुरक्षित उपाय...
ही ट्रिक उंदरांना पळवण्यासाठी फायदेशीर का मानली जाते ?
खरं तर, या स्प्रेमध्ये पुदिना, व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळलेला आहे. या सर्वांचा वास खूप तीव्र असतो. हे उंदरांच्या मज्जासंस्थेवर (Nervous System) परिणाम करतात, ज्यामुळे ते पुन्हा त्या ठिकाणी अजिबात येत नाहीत. या ट्रिकचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर केलेला नाही, त्यामुळे जर घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असतील तर त्यांच्यासाठीही हे सुरक्षित आहे.
Web Summary : Tired of rats? A simple homemade spray using water, mint juice, vinegar, and lemon juice can repel them without harming them. Spray in rat-prone areas for best results, especially at night.
Web Summary : चूहों से परेशान हैं? पानी, पुदीने का रस, सिरका और नींबू के रस का एक सरल घरेलू स्प्रे उन्हें बिना नुकसान पहुंचाए दूर कर सकता है। सर्वोत्तम परिणामों के लिए, विशेष रूप से रात में, चूहे-प्रवण क्षेत्रों में स्प्रे करें।