Lokmat Sakhi >Social Viral > शॉवरच्या छिद्रांमध्ये घाण साचली, पाण्याचे प्रेशर एकसमान नाही ? १ सोपी युक्ती - शॉवर दिसेल नव्यासारखा चकचकीत...

शॉवरच्या छिद्रांमध्ये घाण साचली, पाण्याचे प्रेशर एकसमान नाही ? १ सोपी युक्ती - शॉवर दिसेल नव्यासारखा चकचकीत...

Shower Head Cleaning Tips : How To Cean Shower Head : Unclog Shower Holes : Deep Clean Shower Head : शॉवरच्या छिद्रांमधील घाण फारसे कष्ट न घेता, कमी खर्चात कशी काढायची, ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 15:12 IST2025-08-14T14:54:09+5:302025-08-14T15:12:00+5:30

Shower Head Cleaning Tips : How To Cean Shower Head : Unclog Shower Holes : Deep Clean Shower Head : शॉवरच्या छिद्रांमधील घाण फारसे कष्ट न घेता, कमी खर्चात कशी काढायची, ते पाहूयात...

Shower Head Cleaning Tips How To Cean Shower Head Unclog Shower Holes Deep Clean Shower Head | शॉवरच्या छिद्रांमध्ये घाण साचली, पाण्याचे प्रेशर एकसमान नाही ? १ सोपी युक्ती - शॉवर दिसेल नव्यासारखा चकचकीत...

शॉवरच्या छिद्रांमध्ये घाण साचली, पाण्याचे प्रेशर एकसमान नाही ? १ सोपी युक्ती - शॉवर दिसेल नव्यासारखा चकचकीत...

आपल्या सगळ्यांच्याच बाथरुममध्ये शॉवर असतोच. रोजच्या धावपळीनंतर शॉवरखाली उभं राहून गरम पाण्याची अंघोळ करणं खरंच खूप आरामदायी असतं. पण जर शॉवरच्या हेडमधील छिद्रांमधून पाण्याची धार कमी येत असेल किंवा पाणी एकाच दिशेने येत नसेल, तर नक्कीच शॉवर हेडमध्ये काहीतरी बिघाड (Shower Head Cleaning Tips) झाला आहे असं समजा. पावसाळ्यात अनेकदा ही समस्या सतावते, पावसाळ्यात पाणी बरेचदा गढूळ येते. अशा पाण्यातून बारीक मातीचे कण, अगदी बारीक (How To Cean Shower Head) डोळ्यांना न दिसणारे खडे देखील असतात. अशी ही गढूळ पाण्यातील घाण (Unclog Shower Holes) शॉवर हेड्सच्या बारीक छिद्रांत जाऊन अडकते, ज्यामुळे पाण्याला व्यवस्थित प्रेशर येत नाही. अशावेळी भयंकर चीडचीड होतेच. शॉवरच्या छिद्रांमध्ये घाण साचते त्यामुळे पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होतो यामुळे आंघोळ करताना अनेक अडचणी येऊ शकतात( Deep Clean Shower Head).

ही समस्या दूर करण्यासाठी खरंतरं, संपूर्ण शॉवर हेड बदलण्याची गरज नाही. आपण काही घरगुती सोप्या उपायांच्या मदतीने अगदी मिनिटभरात देखील या शॉवर हेडच्या छिद्रांमधील साचलेली घाण पटकन काढू शकतो. शॉवरच्या छिद्रांमधील घाण फारसे कष्ट न घेता आणि कमी खर्चात कशी काढायची, ते पाहूयात. यासाठी एक घरगुती सोपी ट्रिक एकदम फायदेशीर आणि असरदार ठरेल. नेमका उपाय काय करायचा ते पाहा... 

शॉवर हेडच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण काढण्याची सोपी ट्रिक... 

अनेकदा शॉवर हेडच्या छिद्रांमध्ये बरीच घाण, शेवाळ किंवा गढूळ पाण्यातील मातीकण अडकून बसतात. यासाठी एक सोपी घरगुती ट्रिक masalakitchenbypoonam या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला १ टेबलस्पून टूथपेस्ट, १/२ कप पाणी आणि व्हिनेगर तसेच १ टेबलस्पून बेकिंग सोडा, १ झिपलॉक बॅग इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

पाहा पोळपाट लाटणं धुण्याची योग्य पद्धत-१ ट्रिक, साबण-पावडर नको-टिकेल अनेक वर्ष...

खीर केली, करपून गेली? घाबरु नका-घ्या ६ टिप्स, दुधाचा जळका वास होईल गायब...

आता उपाय नेमका काय करायचा ?

सगळ्यात आधी आपल्या नेहमीच्या वापरातील थोडीशी टूथपेस्ट आपल्या बोटांवर घ्या. त्यानंतर शॉवर हेडच्या छिद्रांवर ही टूथपेस्ट व्यवस्थित पसरवून लावा. त्यानंतर, हा हेड शॉवर एका प्लास्टिकच्या झिपलॉक बॅगमध्ये तो संपूर्णपणे पाण्यांत भिजेल इतके पाणी पिशवीत घ्यावे. मग त्या पाण्यात बेकिंग सोडा, व्हिनेगर घालावे या मिश्रणात शॉवर तासभर व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवून द्यावा. या झिपलॉक बॅगचे तोंड रबर बँड ने बंद करून घ्यावे. तासाभरानंतर झिपलॉक बॅग उघडून शॉवर स्वच्छ पाण्याखाली व्यवस्थित धुवून घ्यावा. त्यानंतर आपण पाहू शकता की शॉवर हेडच्या छिद्रांमधील घाण बाहेर पाहून छिद्र मोकळी झालेली असतील. या सगळ्या छिद्रांमधून अगदी योग्य प्रेशरने पाणी येऊ लागलेले असेल. अशी ही साधीसोपी ट्रिक वापरुन आपण शॉवर हेडच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण अगदी झटपट पद्धतीने फारशी मेहेनत न घेताच स्वच्छ करु शकता.


Web Title: Shower Head Cleaning Tips How To Cean Shower Head Unclog Shower Holes Deep Clean Shower Head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.